WhatsApp New Creation Tools for Status Updates esakal
विज्ञान-तंत्र

WhatsApp New Features : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये जबरदस्त फीचरची एंट्री; इंस्टाग्राम सारखं म्युझिक टूल कसं वापराल? पाहा एका क्लिकवर

WhatsApp latest update : व्हॉट्सअ‍ॅप नवीन क्रिएशन टूल्सवर काम करत आहे, ज्यामुळे स्टेटस अपडेट्ससाठी अधिक कस्टमायझेशन ऑप्शन्स मिळतील. या नवीन वैशिष्ट्याच्या चाचणी फेजनंतर लवकरच अपडेट मिळणार आहे.

Saisimran Ghashi

WhatsApp New Features : व्हॉट्सअ‍ॅप लवकरच आपल्या युजर्ससाठी स्टेटस अपडेट अधिक आकर्षक बनवण्यासाठी नवे क्रिएशन टूल्स आणणार आहे. हे टूल्स सध्या चाचणी टप्प्यात असून लवकरच अपडेटच्या स्वरूपात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

WhatsApp स्टेटससाठी आणखी खास अपडेट

जगातील सर्वात मोठ्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या WhatsApp कडे 3.5 अब्जांहून अधिक युजर्स आहेत. वापरकर्त्यांचा अनुभव अधिक सुधारण्यासाठी WhatsApp सातत्याने नवनवीन वैशिष्ट्ये जोडत आहे. अलीकडेच स्टेटस अपडेटमध्ये म्युझिक आणि मेंशन जोडल्यानंतर आता कंपनी युजर्ससाठी आणखी सर्जनशील क्रिएशन टूल्स विकसित करत आहे.

बीटा व्हर्जनमध्ये नवे टूल्स

WABetaInfo च्या अहवालानुसार, व्हॉट्सअ‍ॅपने अँड्रॉइड बीटा व्हर्जन 2.25.3.2 मध्ये नव्या स्टेटस क्रिएशन टूल्सची चाचणी सुरू केली आहे. उपलब्ध माहितीनुसार, स्टेटससाठी गॅलरी सेक्शनमध्ये दोन नवीन शॉर्टकट्स दिसणार आहेत. हे शॉर्टकट्स विशेषतः टेक्स्ट स्टेटस आणि व्हॉइस मेसेज स्टेटस साठी असतील, ज्यामुळे युजर्सना त्यांच्या अपडेट्स अधिक सहज शेअर करता येतील.

वेगळ्याव्हॉइस मेसेज स्टेटसचा पर्याय

युजर्ससाठी सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे स्वतंत्र व्हॉइस मेसेज स्टेटस पर्याय. सध्या युजर्सना स्टेटसवर व्हॉइस नोट्स जोडण्याचा पर्याय आहे, मात्र त्यासाठी कोणताही खास शॉर्टकट उपलब्ध नाही. आगामी अपडेटमध्ये स्टेटस सेक्शनमध्ये वेगळ्या व्हॉइस मेसेजचा पर्याय उपलब्ध होईल, जो फोटो, व्हिडिओ आणि टेक्स्ट स्टेटसच्या सोबत असेल.

ही नवी सुविधा कधी उपलब्ध होणार?

सध्या ही सुविधा बीटा चाचणी टप्प्यात असून लवकरच अपडेटच्या स्वरूपात रोलआउट केली जाण्याची शक्यता आहे. व्हॉट्सअ‍ॅपआपल्या स्टेटस फिचर्समध्ये सातत्याने सुधारणा करत असून हे नवे टूल्स युजर्सना अधिक सर्जनशीलता आणि लवचिकता प्रदान करतील. अधिकृत लॉन्चसाठी अपडेट्ससाठी लक्ष ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT