Whatsapp  esakal
विज्ञान-तंत्र

Whatsapp चॅनेल जॉईन केल्यावर युझर्सला येत होत्या ‘या’ अडचणी, कंपनी लवकरच आणणार नवे फिचर्स

चॅनेल फिचर चालू झाल्यापासून युझर्सना व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसचे अपडेट्स पाहताना अडचणी येत होत्या.

Monika Lonkar –Kumbhar

Whats app : काही महिन्यांपूर्वी व्हटॅस्अ‍ॅपने त्यांचे चॅनेल फिचर भारतात लॉंच केले होते. त्यानंतर, काही दिवसांपूर्वी चॅनेल लाईव्हचे फिचर देखील लॉंच केले होते. या फिचरमुळे युझर्स त्यांच्या आवड्त्या सेलिब्रिटींना, क्रिएटर्सना आणि सुप्रसिद्ध संस्थांना, व्यक्तींना, न्यूज चॅनेल्सलना फॉलो करत आहेत.

मोबाईल नंबर नसतानाही युझर्स जगभरातील सेलिब्रिटींना, क्रिएटर्सना फॉलो करून त्यांच्याशी कनेक्ट व्हायचे. यासाठी, युझर्सला फक्त त्या व्यक्तींचे, सेलिब्रिटींचे आणि क्रिएटर्सचे नाव सर्च करावे लागायचे आणि त्यांच्या चॅनेलसोबत कनेक्ट होता यायचे.

मात्र, हे चॅनेल फिचर चालू झाल्यापासून व्हॉट्सअ‍ॅपच्या युझर्सना व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसचे अपडेट्स पाहताना अडचणी येत होत्या. यावरच, आता व्हॅट्सअ‍ॅप कंपनीने नव्या फिचरचा पर्याय शोधला आहे. यावर कंपनीचे सध्या काम सुरू आहे.

युझर्सला या अडचणी यायच्या

जर तुम्ही कोणत्याही व्हॉट्सअ‍ॅपच्या चॅनेलशी कनेक्ट असाल तर, तुमच्या हे लक्षात आले असेल की, तुम्ही स्टेटस टॅबवर गेल्यावर तुमचे सर्व स्टेटस हे आडव्या स्वरूपात दिसू लागतात.

हेच स्टेटस अपडेट्स पूर्वी उभ्या रेषेच्या स्वरूपात (एकाखाली एक) दिसत होते. मात्र, चॅनेल जॉईन केल्यानंतर हे स्टेटस अपडेट्स आडव्या स्वरूपात दिसू लागले, म्हणजेच हे स्टेटस सगळे एका रेषेप्रमाणे सरळ पुढे दिसतात आणि यामुळे, युझर्सला त्रास होतो.

शिवाय, तुम्ही कोणते स्टेटस पाहिले आहेत आणि कोणते स्टेटस म्यूट केले आहेत ? हे युझर्सला समजण्यास अडचणी येत होत्या. युझर्सची हीच समस्या दूर करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप एका नवीन फिचरवर काम करत आहे. या फिचरद्वारे युझर्स त्यांचे स्टेटस फिल्टर करू शकतात.

या फिचरमुळे लवकरच तुम्हाला स्टेटस फिल्टर करण्यासाठी व्हॉट्स्अ‍ॅपमध्ये वरच्या बाजूला All, Recent, Viewed आणि Muted चा पर्याय मिळेल.

युझर्सना मिळणार हे ४ नवे फिल्टर

या फिचरमधील All सेक्शन अंतर्गत तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील सर्व कॉन्टॅक्ट्सचे स्टेटस पाहता येतील. त्यानंतर, Recent टॅबमध्ये गेल्यावर तुम्हाला लोकांनी नुकतेच टाकलेले स्टेटस अपडेट्स पाहता येतील आणि Viewed टॅबमध्ये तुम्ही पाहिलेल्या सर्व स्टेटस अपडेट्सची लिस्ट पाहता येईल.

Muted टॅबमध्ये तुम्ही जे स्टेटस अपडेट्स म्यूट केले आहेत. त्याची लिस्ट या टॅबमध्ये युझर्सला पाहता येईल. जे चॅनेलशी कनेक्टेड आहेत आणि आतापर्यंत त्यांना स्टेटस अपडेट्स पाहण्यात अडचणी येत होत्या, त्यांच्यासाठी व्हॉट्स्अ‍ॅपचे हे फिचर फायदेशीर ठरणार आहे.

सध्या व्हॉट्स्अ‍ॅप कंपनीने हे अपडेट्स Android बीटा टेस्टर्ससाठी जारी केले आहेत. आगामी काळात प्रत्येक युझरसाठी कंपनी हे अपडेट्स रोलआऊट करू शकते. तोपर्यंत युझर्सना मात्र, याची वाट पाहावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NPS गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! एक्झिट नियमांत बदल; PFRDA चा मोठा निर्णय, नवे नियम काय?

Gen Z Workplace Trends 2025: ‘जॉब हगिंग’पासून ‘कॉन्शस अनबॉसिंग’पर्यंत; 2025 मध्ये Gen Z ने अशी बदलली करिअरची व्याख्या

Year-Ender 2025 : क्रॅश ते कमबॅक! 2025 मधील शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची झोप उडविणारे टॉप 10 चढ-उतार

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये एसटी बसला आग लागल्याची घटना

2025 मध्ये ट्रेकिंगचं चित्र बदललं! भारतातील ‘या’ 5 नव्या ट्रेक्सनी थराराची उंची गाठली

SCROLL FOR NEXT