WhatsApp India Action eSakal
विज्ञान-तंत्र

WhatsApp India Action : व्हॉट्सअ‍ॅपची मोठी कारवाई.. भारतातील तब्बल 69 लाख अकाउंट्स केले बॅन!

WhatsApp Report : यूजर्सच्या तक्रारींवर विचार करून, तसंच व्हॉट्सअ‍ॅपच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या अकाउंट्सची पडताळणी करून ही कारवाई करण्यात आली असल्याचं कंपनीने आपल्या मासिक अहवालात म्हटलं आहे.

Sudesh

WhatsApp Accounts Banned : जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप असणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅपचे भारतात कोट्यवधी यूजर्स आहेत. मात्र व्हॉट्सअ‍ॅपने आता भारतातच मोठी कारवाई केली आहे. कंपनीने भारतातील तब्बल 69 लाख अकाउंट्स बॅन केले आहेत. नवीन आयटी नियम 2021 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

ही आकडेवारी 1 ते 31 डिसेंबर या काळातील असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. यूजर्सच्या तक्रारींवर विचार करून, तसंच व्हॉट्सअ‍ॅपच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या अकाउंट्सची पडताळणी करून ही कारवाई करण्यात आली असल्याचं कंपनीने आपल्या मासिक अहवालात म्हटलं आहे. (WhatsApp Bans Indian Accounts)

एकूण कारवाई केलेल्या अकाउंट्सपैकी काहींवर निर्बंध लाागू करण्यात आले आहे, तर काही अकाउंट्सवर कायमची बंदी लागू करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात भारतातून व्हॉट्सअ‍ॅपला तब्बल 16,366 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, असंही या अहवालातून स्पष्ट झालं आहे. एका महिन्यात प्राप्त झालेल्या या आतापर्यंतच्या सर्वाधिक तक्रारी असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. (WhatsApp Action)

नवीन फीचर्स

दरम्यान व्हॉट्सअ‍ॅप आपल्या यूजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स लाँच करत आहे. व्हिडिओ कॉलमध्ये स्क्रीन आणि ऑडिओ शेअरिंग फीचरमुळे यूजर्स एकमेकांसोबत व्हॉट्सअ‍ॅप कॉलवर व्हिडिओ आणि मूव्हीज पाहू शकणार आहेत. तसंच इतर अ‍ॅप्समधून व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करता येणाऱ्या फीचरची चाचणी देखील सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav 2025 : गणरायाच्या आगमन अन् विसर्जनाच्या दिवशी पुण्यात 'ड्राय डे', जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय...

Manoj Jarange : मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास सरकार उलथवेन...मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा..

Karad fire Accident: पुणे- बंगळूर महामार्गावर ढेबेवाडी फाट्यावर ई-बाईक खाक; चालक दुचाकी रस्त्याकडेला लावून दूर

Latest Marathi News Updates: गणरायाच्या आगमन आणि विसर्जनाच्या दिवशी पुणे जिल्ह्यात "ड्राय डे" घोषित

हो, मी डेट करतेय... घटस्फोट अन् ब्रेकअपनंतर रुपाली भोसले पुन्हा प्रेमात! म्हणाली, 'जो माझ्या आयुष्यात येईल त्याला...

SCROLL FOR NEXT