WhatsApp Video Skip Feature eSakal
विज्ञान-तंत्र

WhatsApp New Feature : यूट्यूबचं खास फीचर आता व्हॉट्सअ‍ॅपवरही येणार; मोठे व्हिडिओ पाहणं होणार सोपं

WhatsApp Video Skip Feature : यूट्यूबसह अन्य काही प्लॅटफॉर्मवर देखील हे फीचर उपलब्ध आहे.

Sudesh

व्हॉट्सअ‍ॅपवर दररोज कित्येक प्रमाणात व्हिडिओ शेअर केले जातात. तुमच्या फॅमिली ग्रुपवर किंवा मित्रांच्या ग्रुपवर कित्येक वेळा अगदी मोठ्या लांबीचे व्हिडिओही येतात. हे व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करता येत नसल्यामुळे, कित्येक वेळा ते संपूर्ण पहावे लागतात. मात्र, आता यावर कंपनीने एक उपाय शोधला आहे.

मोठे व्हिडिओ पाहताना तुम्हाला जर पुढे जायचं असेल, तर यूट्यूबवर त्यासाठी खास सोय करण्यात आली आहे. डाव्या किंवा उजव्या बाजूला डबल टॅप करून तुम्ही व्हिडिओमध्ये दहा सेकंद पुढे किंवा मागे जाऊ शकता. यूट्यूबसह अन्य काही प्लॅटफॉर्मवर देखील हे फीचर उपलब्ध आहे. आता असंच फीचर व्हॉट्सअ‍ॅपवर देखील येणार आहे.

WAbetainfo या वेबसाईटने याबाबत माहिती दिली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर येणाऱ्या नवनवीन फीचर्सबद्दल ही वेबसाईट रिपोर्ट पब्लिश करत असते. व्हिडिओ फॉरवर्डिंग फीचर कसे असेल याचा एक स्क्रीनशॉट देखील या वेबसाईटवर शेअर करण्यात आला आहे.

WhatsApp New Feature

हे फीचर सध्या व्हॉट्सअ‍ॅप अँड्रॉईड बीटा 2.23.24.6 या अपडेटवर उपलब्ध आहे. इतर यूजर्सना हे फीचर कधी उपलब्ध केलं जाईल याबाबत अद्याप कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही. लवकरच या फीचरची चाचणी पूर्ण होऊन, ते सर्वांसाठी उपलब्ध होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Tech News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Rajapur Tragedy : नाणारमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत कालवे काढण्यासाठी गेलेली एकाच घरातील ४ भावंडे बुडाली; तिघांचे मृतदेह हाती

SCROLL FOR NEXT