WhatsApp
WhatsApp 
विज्ञान-तंत्र

WhatsAppवर पाठवू शकता 2GBपर्यंतच्या फाईल, फक्त 'या' यूजर्सला वापरता येणार फिचर

सकाळ डिजिटल टीम

WhatsApp वर 2GB पर्यंतच्या फाईल्स ट्रान्सफर करू शकतील

याक्षणी फक्त 100MB पर्यंतच्या फाइल्स पाठवल्या जातात

बीटा व्हर्जनमध्ये एक नवीन फीचर दिसले आहे

WhatsApp जगभरामध्ये सर्वात जास्त वापरले जाणारे इंस्टंट मेसेजिग अॅप आहे. पण कित्येक असे फिचर्स आहे जे उपलब्ध नाही. असेच एक फिचर आहे मोठ्या साईजच्या फाईल ट्रान्सफर करण्याचे. जर तुम्ही एक मोठी फॉईल व्हॉट्स अॅपच्या मदतीने करून ट्रान्सफर करू इच्छित आहात असाल तर ते शक्य होत नाही त्यासाठी तुम्हाला क्लाऊड स्टोरेज अॅप किंवा टेलिग्रामची (Telegram)मदत घ्यावी लागते. आता व्हॉटस् ही समस्या दुर करण्याचा विचार करत आहे.

WABetaInfo नुसार, लवकरच व्हॉट्सअॅपवर 2GB पर्यंत फाईल ट्रान्सफरसाठा करता येऊ शकते. अॅपचे हे फिचर टेस्ट करत आहे. पण सध्या हे फिचर सर्वांसाठी उपलब्ध नसणार आहे. फक्त आयफोन यूजर्ससाठी सध्या हे फिचर टेस्ट केले जात आहे. रिपोर्टनुसार, WhatsApp चे हे फिचर iOS बीटा आवृत्ती 22.7.0.76 वर स्पॉट झाली आहे.

सध्या 100MB पर्यंतच्या फाइल्स ट्रान्सफर केल्या जातात

सध्या तुम्ही WhatsApp वर फक्त 100MB पर्यंतच्या फाइल्स ट्रान्सफर करू शकता, जे काही वर्षांपूर्वीपर्यंत पुरेसे होते. मात्र, आता लोकांना 100MBपेक्षा जास्त आकाराच्या फाइल्स ट्रान्सफर कराव्या लागणार आहेत. हे फीचर व्हॉट्सअॅपच्या प्रतिस्पर्धी अॅप टेलिग्रामवर आधीपासूनच अस्तित्वात आहे, त्यामुळे व्हॉट्सअॅपवरही हे फीचर आणण्याची तयारी सुरू आहे.

रिपोर्ट्सनुसार, व्हॉट्सअॅप सध्या अर्जेंटिनामध्ये या फीचरची चाचणी करत आहे. WABetaInfo ने या फीचरचा एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये WhatsApp वापरकर्त्यांना सतर्क करत आहे की आयफोन वापरकर्ते 2GB साईजपर्यंत कागदपत्रे पाठवू शकतात. मात्र, व्हॉट्सअॅपचे हे फीचर कधी येणार हे माहीत नसले तरी या फीचरचा यूजर्सला चांगलाच उपयोग होऊ शकतो.

आणखी अनेक सुविधांवरही काम सुरू आहे

याशिवाय व्हॉट्सअॅप इतरही अनेक फीचर्सवर काम करत आहे. यात मेसेज रिअॅक्शन रिप्लाय समाविष्ट आहे. व्हॉट्सअॅपवर लवकरच फेसबुक आणि इन्स्टाग्रामप्रमाणे इमोजी रिप्लायचा पर्याय उपलब्ध होणार आहे. दुसरीकडे, कंपनीने मल्टी-डिव्हाइस सपोर्ट आणला आहे. अनेक युजर्सना हे अपडेट मिळत आहे, त्यानंतर व्हॉट्सअॅप यूजर्स त्यांचे अकाउंट एकाच वेळी चार डिव्हाईसमध्ये वापरू शकतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''सुनीतासारखी बायको मिळाल्याबद्दल देवाचे आभार मानतो, माझ्यासारख्या...'' अरविंद केजरीवाल नेमकं काय म्हणाले?

Shikhar Dhawan Retirement: क्रिकेटला करणार गुडबाय? दुखापतीवर अपडेट देत शिखर धवन स्पष्टच बोलला...

Aishwarya Narkar: "हे तुम्हाला शोभतं का? असं म्हणू नका!"; ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्या नारकरचं सडेतोड उत्तर

Pune Porsche Accident: पुणे अपघात प्रकरणातील विशाल अग्रवालसह इतरांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीनाचा अर्ज मोकळा

Latest Marathi News Live Update : पुणे कार अपघात प्रकरणी आरोपींचा जामिनासाठी अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT