WhatsApp Transcribe Feature eSakal
विज्ञान-तंत्र

WhatsApp Transcribe Feature : आता हेडफोन शोधत बसण्याची गरज नाही, चक्क 'वाचता' येतील ऑडिओ मेसेज! व्हॉट्सअ‍ॅप आणतंय खास फीचर

WhatsApp New Feature : कित्येक वेळा आपल्याला एखादी व्यक्ती ऑडिओ मेसेज पाठवते. मात्र मीटिंगमध्ये असल्यामुळे, किंवा काही कामात असल्यामुळे आपण तो मेसेज ऐकू शकत नाही.

Sudesh

WhatsApp Transcribe Audio Messages : जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप असणारं व्हॉट्सअ‍ॅप नेहमी नवनवीन फीचर्स आणत असतं. यामुळेच व्हॉट्सअ‍ॅपचे जगभरात तब्बल दोन अब्जांहून अधिक यूजर्स झाले आहेत. आता कंपनीने आपल्या यूजर्ससाठी आणखी एक खास फीचर सादर केलं आहे. यामुळे ऑडिओ मेसेज हे न ऐकताच समजणार आहेत.

कित्येक वेळा आपल्याला एखादी व्यक्ती ऑडिओ मेसेज पाठवते. मात्र मीटिंगमध्ये असल्यामुळे, किंवा काही कामात असल्यामुळे आपण तो मेसेज ऐकू शकत नाही. काही मित्रच असे असतात ज्यांचे ऑडिओ मेसेज तुम्ही हेडफोनशिवाय ऐकूच शकत नाही. मात्र, आता ऑडिओ मेसेज आल्यानंतर हेडफोनची शोधाशोध करावी लागणार नाही.

व्हॉट्सअ‍ॅपच्या या नवीन फीचरचं नाव 'ट्रान्स्क्राईब' असं आहे. याच्या मदतीने यूजर्स व्हॉइस मेसेजला टेक्स्ट फॉर्ममध्ये पाहू शकतील. म्हणजेच समोरच्या व्यक्तीने जो ऑडिओ मेसेज पाठवला आहे, तो तुम्हाला ऐकण्यापूर्वी टेक्स्ट मेसेजच्या स्वरुपात वाचता येईल. WABetainfo या वेबसाईटने याबाबत माहिती दिली आहे. (WhatsApp Transcribe Feature)

हे फीचर सध्या अँड्रॉईड 2.24.7.8 या बीटा व्हर्जनवर उपलब्ध करून देण्यात आलं आहे. व्हॉट्सअ‍ॅप बीटा इन्फोने आपल्या एक्स हँडलवरुन याबाबत माहिती दिली. फोनमध्ये हे फीचर कसं दिसेल याचा स्क्रीनशॉट देखील या पोस्टमध्ये देण्यात आला आहे. या फीचरची बीटा चाचणी पूर्ण झाल्यानंतर भविष्यात हे सर्व यूजर्सना उपलब्ध होईल असं सांगण्यात आलं आहे.

अ‍ॅपलमध्ये आधीपासून फीचर

व्हॉट्सअ‍ॅपचं हे फीचर iOS यूजर्सना आधीपासून उपलब्ध आहे. 2023 साली मे महिन्यातच हे फीचर आयफोनवर लाँच करण्यात आलं होतं. आतापर्यंत केवळ आयफोनवर उपलब्ध असणारं हे फीचर आता लवकरच अँड्रॉईड यूजर्सना देखील मिळणार असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP नेत्यांचा मोठा विजय! आंदोलनाला वेग; अखेर अभिजीत दिपके यांच्यासह तिघांची सुटका, आता सर्वोच्च न्यायालयात काय घडणार?

Navratri 2026 Wishes in Marathi: 'उदे ग अंबे उदे'... नवरात्रीनिमित्त व्हॉट्सॲपवर शेअर करा देवी दुर्गेच्या आशीर्वादाचे हे सुंदर शुभेच्छा संदेश

Maharashtra Live News :सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मतदानाला सुरुवात...

IND vs WI 3rd T20: इंदूरमध्येही आज बॅट विरुद्ध बॅट? दुसऱ्या सामन्यात ५०१ धावांचा पाऊस, आता तिसऱ्या टी-२०मध्येही फलंदाजांचे वर्चस्व राहणार?

Madhya Pradesh: अकराशे विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप; टीबी रुग्णांना ८ किलोची पोषण आहाराची टोपली

SCROLL FOR NEXT