WhatsApp sakal
विज्ञान-तंत्र

WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅपची मुजोरी, शेअर केला भारताचा चुकीचा नकाशा; केंद्रीय मंत्र्यांनी फटकारलं

मेटाच्या मालकीचे इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपने भारताचा नकाशा चुकीच्या पद्धतीने शेअर केला आहे. यावरून आता केंद्रीय मंत्र्यांनी कंपनीला झापले आहे.

सकाळ डिजिटल टीम

WhatsApp tweets video with incorrect India map: मेटाच्या मालकीचे इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपने भारताचा नकाशा चुकीच्या पद्धतीने शेअर केला आहे. कंपनीने ट्विटरवर एक व्हीडिओ शेअर केला असून यामध्ये भारताच्या नकाशा चुकीचा दाखवण्यात आला आहे. यामुळे व्हॉट्सअ‍ॅपवर आता यूजर्सच्या रोषाचा सामना करावा लागत आहे.

चुकीचा नकाशा शेअर केल्यानंतर आता केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी देखील WhatsApp ला फटकारले आहे. तसेच, योग्य नकाशा शेअर करण्यास सांगितले आहे. काही दिवसांपूर्वीच राजीव चंद्रशेखर यांनी व्हीडिओ कॉलिंग प्लॅटफॉर्म झूमचे सीईओ एरिक युआन यांना देखील याच कारणामुळे फटकारले होते.

राजीव चंद्रशेखर यांनी व्हॉट्सअ‍ॅपच्या व्हीडिओवर रिप्लाय दिला आहे. चंद्रशेखर ट्विट करत म्हणाले की, 'नकाशामध्ये झालेली चूक त्वरित दुरुस्त करावी. तसेच, जे प्लॅटफॉर्म्स भारतात व्यवसाय करत आहेत अथवा व्यवसाय करू इच्छित आहेत, त्यांनी अचूक नकाशा वापरणे गरजेचे आहे.'

हेही वाचा: Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी झूमचे सीईओ एरिक युआन यांनी देखील आपल्या ट्विटर हँडलवरून भारताचा चुकीचा नकाशा शेअर केला होता. यानंतर चंद्रशेखर यांनी युआन यांनी ट्विटरवर फटकारले होते. भारताचा चुकीचा नकाशा शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी ट्विटरने देखील चुकीचा नकाशा शेअर केला होता.

हेही वाचा: Smartphone Offer: फक्त 5 हजारात मिळतोय 5000mAh बॅटरीसह येणारा पॉवरफुल स्मार्टफोन, ऑफर एकदा पाहाच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Blockade: अमेरिकेची नाकेबंदी निष्फळ? समुद्री मार्ग बंद, तरी इराणचा नवा डाव; रेल्वेने चीन आणि पाकिस्तानला तेल पुरवठा

३० फेब्रुवारीला जन्म, कागदपत्र पाहून मुस्लीम महिलेची याचिका फेटाळली; भारतीय मानण्यास हायकोर्टानं दिला नकार

प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये; राहुरीत समर्थकांचा जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी

Religious Tourism Bus Service : शिवशाही, आरामदायीमधून पर्यटकांसाठी विशेष बस सेवा, सहलींमध्ये निवास व भोजन व्यवस्था

Gadchiroli: दिल्ली येथे शैक्षणिक सहलीसाठी नागपूर विमानतळावरून प्रस्थान करताना विद्यार्थी.गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे विमानाने 'दिल्ली उड्डाण'; संसद भवन आणि राष्ट्रपती भवनाला देणार भेट !

SCROLL FOR NEXT