WhatsApp Update
WhatsApp Update esakal
विज्ञान-तंत्र

WhatsApp Update : व्हॉट्सअॅप आणणार हटके फीचर, थेट फेसबुकशी होणार कनेक्ट

सकाळ डिजिटल टीम

WhatsApp Update : इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप आपल्या युझर्ससाठी एकदम हटके फीचर आणणार आहे. या भन्नाट फीचरमुळे युजर्स आपले व्हॉट्सअॅप स्टेटस थेट फेसबुकवर पोस्ट करु शकतात. सध्या व्हॉट्सअॅपकडून या नवीन फीचरवर काम सुरु आहे. हे फिचर लोकांसाठी 'status privacy' सेक्शनमध्ये उपलब्ध असणार आहे.

याठिकाणी युजर्सना स्वत:चे फेसबुक अकाऊंट अॅड करता येणार आहे. समजा, जर तुम्हाला व्हॉट्सअॅप स्टेटस फेसबुकवरही शेअर करायचा असेल तर यासाठी 'facebook to share' हा ऑप्शन ऑन ठेवावा लागणार आहे.

या व्हॉट्सअॅप फीचरमधील चांगली गोष्ट म्हणजे युजर्सना आपल्या प्रत्येक स्टोरीसाठी सेटिंग्समध्ये बदल करण्याची सुविधा देण्यात आली आहे. जर तुम्हाला एकच स्टेटस फेसबुकवर शेअर करायचा असेल तर तेही शक्य आहे. विशेष म्हणजे या फीचरमुळे लोकांच्या वेळेची बचत होणार आहे. कंटेट क्रिएटर्स आणि इन्फ्लूएन्सर्ससाठी हे फीचर जबरदस्त फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.

दरम्यान, व्हॉट्सअॅप वापरताना अनेकदा एखाद्या व्यक्तीला आपण मेसेज पाठवत असताना त्यात टायपिंग एरर होतात. यामुळे अनेकदा चुकीचा मेसेजही समोरच्या व्यक्तीला जातो. तो जाऊ नये म्हणून बरेच लोक तो मेसेज डिलीट करतात.

जर तुम्हालाही व्हॉट्सअॅपवर ही अडचण येत असेल तर लवकरच व्हॉट्सअॅप त्यासाठी देखील एक नवं फीचर आणणार आहे. व्हॉट्सअॅप अशा आणखीन एका खास फीचरवर काम करत आहे. हे फीचर आल्यानंतर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअॅप एखादा मेसेज चुकीच्या पद्धतीने सेंड झालं असेल, तर तुम्हाला तो डिलीट न करता एडिट करायचं ऑप्शन मिळणार आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Certificates: केंद्राकडून CAAची प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात; कोणाला मिळालं पहिलं प्रमाणपत्र? जाणून घ्या

Nashik Modi Rally: "मोदीजी आता कांद्यावर बोला" मोदींनी भाषण मध्येच थांबवलं! पिंपळगाव बसवंतच्या सभेत काय घडलं?

PVR Inox: T20 विश्वचषकासाठी पीव्हीआर आयनॉक्सचा मोठा प्लॅन; चित्रपटांनी निराश केल्यावर घेतला 'हा' निर्णय

PM Modi Nashik: नाशिकमध्ये पंतप्रधान अखेर कांद्यावर बोललेच; ऑपेरेशन ग्रीन, निर्यात बंदी आणि बफर स्टॉकबाबत म्हणाले...

Mumbai Metro: पंतप्रधान मोदींच्या रोड शोसाठी मुंबईत मेट्रो बंद; सुरक्षेचे कारण देत घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT