WhatsApp New Feature eSakal
विज्ञान-तंत्र

WhatsApp : आता चुकून ग्रुपमध्ये जाणार नाही प्रायव्हेट मेसेज! दोन्ही चॅट्स दिसणार वेगवेगळे; व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फीचर

Group Chat Filter : व्हॉट्सअ‍ॅप आता एक नवीन अपडेट देणार आहे.

Sudesh

व्हॉट्सअ‍ॅप हे जगातील सर्वात लोकप्रिय चॅटिंग अ‍ॅप्सपैकी एक आहे. भारतात देखील याचे कोट्यवधी यूजर्स आहेत. बऱ्याच वेळा व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट करताना एखाद्या व्यक्तीला पाठवायचा मेसेज चुकून एखाद्या ग्रुपमध्ये पाठवला जातो. तुमच्याकडूनही तसं होत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

व्हॉट्सअ‍ॅप आता एक नवीन अपडेट देणार आहे. यामुळे ग्रुप चॅट्स आणि पर्सनल चॅट्स हे वेगवेगळे दिसणार आहेत. Wabetainfo वेबसाईटने याबाबतची माहिती दिली आहे. याचा सर्व यूजर्सना मोठा फायदा होणार आहे.

न वाचलेले मेसेज दिसणार वेगळे

या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट्स आता चार कॅटेगरीमध्ये दिसतील. यामध्ये All, Unread, Contacts आणि Group अशा कॅटेगरींचा समावेश आहे. यात Unread कॅटेगरीत तुम्ही न वाचलेले मेसेज वेगळे दिसतील.

WABetainfo Screenshot

यासोबतच, पर्सनल मेसेज आणि ग्रुप मेसेज वेगवेगळे दिसत असल्यामुळे, यूजर्सना मोठा फायदा होईल. सर्व एकाच ठिकाणी असल्यामुळे चॅट्स शोधण्यात होणारी अडचण सुटणार आहे. सोबतच, इकडचे मेसेज तिकडे जाण्याचा धोकाही टळणार आहे.

बीटा यूजर्ससाठी उपलब्ध

हे फीचर सध्या केवळ व्हॉट्सअ‍ॅपच्या बीटा यूजर्ससाठी उपलब्ध आहे. याची चाचणी सुरू असून, लवकरच ते सर्व यूजर्ससाठी उपलब्ध होईल अशी शक्यता आहे. Beta Android 2.23.19.7 या अपटेडमध्ये हे फीचर दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT