WhatsApp Message Pin Feature eSakal
विज्ञान-तंत्र

WhatsApp New Feature : आता व्हॉट्सअ‍ॅपवर महत्त्वाचे मेसेज हरवणार नाहीत; कंपनी आणतेय खास फीचर

WhatsApp Message Pin Feature : व्हॉट्सअ‍ॅपवर सध्या चॅट्स पिन करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

Sudesh

WhatsApp Beta New Feature : व्हॉट्सअ‍ॅप हे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप्सपैकी एक आहे. भारतात देखील याचे कोट्यवधी यूजर्स आहेत. आपल्यापैकी बहुतांश लोक याचा दैनंदिन वापर करतात. तुम्हीही व्हॉट्सअ‍ॅप वापरत असाल, तर ऐनवेळी महत्त्वाचा मेसेज हरवण्याची समस्या तुम्हीही अनुभवली असेल. आता यावरच कंपनी एक उपाय आणत आहे.

लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवर महत्त्वाचे मेसेज पिन करण्याची सुविधा मिळणार आहे. ज्याप्रमाणे आपण महत्त्वाचे चॅट्स पिन करून ते सर्वात वरती ठेऊ शकतो, त्याचप्रमाणे आता महत्त्वाचे मेसेजही वरती पिन करता येतील. टेलिग्रामवर हे फीचर आधीपासून उपलब्ध आहे.

WaBetaInfo या वेबसाईटने याबाबत माहिती दिली आहे. ही वेबसाईट व्हॉट्सअ‍ॅपवर येणाऱ्या फीचर्सवर लक्ष ठेऊन असते. मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅप एकापेक्षा अधिक मेसेज पिन करण्याच्या फीचरची चाचणी करत आहे. चाचणी झाल्यानंतर हे सर्वांसाठी उपलब्ध होईल, असं सांगण्यात येत आहे.

सध्या हे फीचर व्हॉट्सअ‍ॅप बीटा 2.23.26.9 या व्हर्जनमध्ये मिळत आहे. तुम्हालाही जर व्हॉट्सअ‍ॅपचे नवनवीन फीचर्स सर्वात आधी हवे असतील, तर तुम्ही बीटा प्रोग्राममध्ये नाव नोंदवू शकता. यासाठी प्लेस्टोअरवर जाऊन, व्हॉट्सअ‍ॅप सर्च करावं लागेल. यानंतर अ‍ॅप इन्स्टॉल करतो त्याशेजारी जॉईन बीटा हा पर्याय निवडावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China agreement : भारत-चीन करारामुळे नेपाळ संतप्त, डिप्लोमॅटिक नोट पाठविण्याची तयारी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 21 ऑगस्ट 2025

Israel War On Gaza: गाझातील इस्राइल करीत असलेला नरसंहार त्वरित थांबवा, सर्वपक्षीय नेत्यांची मागणी

गोष्ट एका ‘शिदोरी’ची

बोलताना ठेवा भान

SCROLL FOR NEXT