WhatsApp New Feature  eSakal
विज्ञान-तंत्र

WhatsApp New Feature : आता व्हॉट्सअ‍ॅपवर जुने मेसेज शोधणं झालं सोपं; लवकरच येणार कॅलेंडर फीचर

केवळ मित्रांना किंवा कुटुंबीयांना मेसेज करण्यासाठीच नाही, तर ऑफिसच्या कामासाठी देखील कित्येक ठिकाणी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर केला जातो.

Sudesh

जगातील सर्वात लोकप्रिय चॅटिंग अ‍ॅप्सपैकी एक असलेलं व्हॉट्सअ‍ॅप आता आपल्या जीवनाचा एक मोठा भाग झालं आहे. केवळ मित्रांना किंवा कुटुंबीयांना मेसेज करण्यासाठीच नाही, तर ऑफिसच्या कामासाठी देखील कित्येक ठिकाणी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर केला जातो. यूजर्सच्या सोयीसाठी व्हॉट्सअ‍ॅप कित्येक नवीन फीचर्स देखील आणत आहे.

आता व्हॉट्सअ‍ॅपने आणखी एका नवीन फीचरवर काम सुरू केलं आहे. याच्या मदतीने जुने मेसेज शोधणं हे अगदी सोप्पं होणार आहे. जुने मेसेज शोधण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने सर्च बारमध्ये एक कॅलेंडर अ‍ॅड केलं आहे. यामुळे एखाद्या ठराविक तारखेचे मेसेज आपल्याला शोधता येणार आहेत.

WABetaInfo या वेबसाईटने याबाबत माहिती दिली आहे. याठिकाणी व्हॉट्सअ‍ॅपच्या अपडेट्स बाबत माहिती दिली जाते. कंपनीने आपल्या एक्स हँडलवरून या नवीन फीचरची माहिती दिली आहे. सध्या हे फीचर केवळ बीटा 2.2348.50 या व्हर्जनवर उपलब्ध आहे. चाचणी झाल्यानंतर लवकरच हे सर्व यूजर्ससाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

आयपी अ‍ॅड्रेस लपणार

कंपनीने काही दिवसांपूर्वीच एक नवीन सिक्युरिटी फीचर देखील लाँच केलं आहे. यामुळे व्हॉट्सअ‍ॅप कॉल करताना यूजर्स आपला आयपी अ‍ॅड्रेस लपवू शकणार आहेत. त्यामुळे समोरची व्यक्ती तुमचा कॉल कुठून येत आहे याचं लोकेशन शोधू शकणार नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT