Car Bike Tyre Change : टायर म्हणजे गाडीतील अविभाज्य आणि सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. गाडीचे टायर व्यवस्थित नसतील तर त्याचा परिणाम वाहनाच्या एकूण परफॉर्मन्सवर तर होतोच, शिवाय त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनेही मोठा धोका उत्पन्न होऊ शकतो. पण गाडीचे टायर खराब झाले आहेत किंवा त्याकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे, हेच अनेकांना समजत नाही. मग हे ओळखायचं कसं?
रस्त्यावरील वाहनाची सुरक्षितता ही बऱ्याच अंशी टायरच्या सुस्थितीवर अवलंबून असते. यामुळे आपल्या गाडीच्या टायरमध्ये होत असलेले बदल आणि वेळीच घेण्याची काळजी, याविषयी जाणून घ्या.
सर्वसाधारणत: नव्या टायरवरील ट्रेड डेप्थ ८ ते ९ मिलीमीटर इतकी असते. रबराची ही जाडी नंतर कमीकमी होत जाते. टायर ट्रेड डेप्थ १.६ मिलीमीटर किंवा त्यापेक्षा कमी झाली तर तो टायर बदलण्याची वेळ आली आहे, हे लक्षात घ्या.
ट्रेड डेप्थ कमी झाल्यावर टायर का बदलायचा, असा प्रश्न स्वाभाविकपणे पडू शकतो. रस्त्यावरून वाहन धावत असताना टायरची ग्रीप महत्त्वाची असते. ट्रेड डेप्थ कमी झाल्याने टायरची ग्रीप कमी होऊ शकते. विशेषत: ओल्या किंवा निसरड्या रस्त्यांवर हा धोका जास्त असतो.
आपल्या गाडीचे टायर वेळोवेळी तपासत राहा. टायर कुठे कापला गेला आहे का, भेगा पडल्या आहेत का किंवा मध्येच टायर फुगला आहे का, याकडे नियमित लक्ष द्या. यामुळे त्या टायरचा आकारही बदलू शकतो आणि त्यातून सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो.
गाडी चालवताना अनेकदा विनाकारण व्हायब्रेशन्स जाणवू लागतात. तसेच कधी कधी वाहनावर नियंत्रण राखणेही थोडे अवघड होऊ लागते. असे होत असल्यास तातडीने टायरची स्थिती तपासून घ्यावी.
टायरमध्ये नियमित हवा भरणे महत्त्वाचे असते. टायर जुना झाला असेल तर हवा धरून ठेवण्याची क्षमताही कमी होऊ लागते. यामुळे वारंवार हवा भरण्याची गरज भासू लागते. याचा परिणाम इंधनाच्या वापरावरही होऊ लागतो.
वाहन चालवण्यात काही बदल न होताही अचानक गाडीचे मायलेज कमी होत असल्याचे निदर्शनास आले तर टायर तपासून घ्या. कारण खराब झालेल्या टायर्समुळे सर्वांत पहिला परिणाम वाहनाच्या कामगिरीवर होऊ शकतो.
- दर पाच ते सहा वर्षांनी गाडीचे टायर बदलणे श्रेयस्कर असते.
- वाहनाचा अपघात झाला असेल आणि त्यात चाकांना धक्का बसला असेल तर टायर बदलणे महत्त्वाचे असते
- तुम्ही सातत्याने खराब रस्त्यांवर वाहन चालवत असाल तर टायरची स्थितीही लवकर खराब होऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.