आपल्याला कधी फार उकाडा जाणवत असेल तर आपण चटकन सॉफ्ट ड्रिंक घेतो. या थंड सॉफ्ट ड्रिंकमुळे आपल्याला अगदी तृप्त झाल्यासारखे वाटते. उन्हाळ्याच्या दिवसात सॉफ्ट ड्रिंक म्हणजे वरदानच. पण, ज्या सॉफ्ट ड्रिंकच्या भरवशावर आपण उकाड्यावर मात करण्याचा प्रयत्न करतो, त्याचा शोध कोणी लावलाय हे माहिती आहे का? (Do you know Joseph Priestley Who invented the soft drink)
जोसेफ प्रिस्टली, असे या शास्त्रज्ञाचे नाव. त्यांना 'सॉफ्ट ड्रिंकचा जनक' मानले जाते. त्यांनी १७६७ साली कार्बोनेटेड वॉटर म्हणजे सोडायुक्त पाण्याचा शोध लावला. जोसेफ यांनी पाणी चाखून पाहिल्यानंतर पाण्यात कार्बनडॉयऑक्साइड मिसळण्याची एक पद्धत सापडली. त्यानंतर कार्बोनेटेड पाण्याचा जन्म झाला. त्यानंतरच्या काळात १९२० ते १९३० च्या सुमारास बाटलीत तयार होणारे सोडा सिफन प्रचंड लोकप्रिय होते. त्याचा वापर बिअर बारमध्ये कॉकटेल्स बनविण्यासाठी होत होता. प्रिस्टलीने कार्बोनाटेड पाण्यावर केलेल्या प्रयोगावरचा आपला रिसर्च पेपर प्रकाशित केला. तो रिसर्च पेपर चांगलाच गाजला होता. त्यानंतर त्यांना या शोधासाठी १७७२ साली कोपली पदक मिळाले होते.
जोसेफ यांचा जन्म १७३३ मध्ये एक इंग्रजी कुटुंबात झाला. ते सर्व सहा भावंडांपैकी मोठे होते. काही वर्षात त्यांची आई त्यांना सोडून गेली. त्यानंतर जोसेफ यांनी त्यांच्या काका-काकूंकडे राहून चुलत भावाच्या व्यवसायात हातभार लावला. सोबतच त्यांनी शिक्षण सुरू केले. त्यांनी रसायन शास्त्राचा अभ्यास केला. एकदा असेच त्यांनी पाणी चाखले त्यावेळई पाण्यात कार्बन डायऑक्साईड मिसळण्याची पद्धत सापडली. त्यावरूनच सोडायुक्त पाण्याचा शोध लागला. सोडायुक्त पाण्याचे सूत्र वापरून सॉफ्ट ड्रिंक्स तयार केले गेले. त्यामुळेच जोसेफ यांना सॉफ्ट ड्रिंकचे जनक म्हणातात. आज आपला घसा ओला झाल्यावर जी शांतता मिळते ते फक्त जोसेफ यांच्यामुळेच. त्यामुळे सॉफ्ट ड्रिंक पिताना जोसेफ यांच्या नावाने दोन थेंब उडवायला विसरू नका.
नैसर्गिक स्त्रोतात आढळणाऱ्या मिनरल वॉटरमध्ये सॉफ्ट ड्रिंकचा इतिहास लपलेला आहे. सध्याच्या तंत्राज्ञानानुसार, कार्बनडायॉक्साईड गॅसचा उच्च दाब आणि कमी तापमान या दोन गोष्टींमुळे कार्बन पाण्यात विरघळतो. जेव्हा मिनरल वॉटरमध्ये लाईमस्टोन मिसळले जाते त्यावेळी वायू आणि कार्बन डॉयऑक्साइडसोबत प्रक्रिया होऊन बुडबुडे तयार होतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.