Why E-PAN card is important and how to download e pan card on smartphone easily
Why E-PAN card is important and how to download e pan card on smartphone easily  
विज्ञान-तंत्र

E-PAN कार्ड महत्वाचे का आहे? घरबसल्या कसे करू शकता डाउनलोड, वाचा

सकाळ डिजिटल टीम

भारतात आधार कार्ड (Aadhaar Card) सारखे पॅन कार्ड (PAN Card) हे देखील एक अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे, जो वैध फोटो आयडी प्रुफ म्हणून वापरला जातो. बँक खाते उघडण्यापासून ते इतर अनेक कामांसाठी पॅन कार्ड आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, ते हरवणे आपल्यासाठी अडचणीचे ठरु शकते.

तुमचे पॅन कार्ड हरवले असेल, तर तुम्ही ई-पॅनचा लाभ देखील घेऊ शकता. ई-पॅन कार्ड हे फिजिकल पॅन कार्ड म्हणून काम करते आणि ते सर्व फिजीकल व्यवहार आणि जेथे पॅन दाखवणे अनिवार्य आहे तेथे वापरता येत. ज्यांच्याकडे वैध आधार क्रमांक आहे आणि आधारशी लिंक केलेला रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक आहे ते आता ई-पॅनचा लाभ घेऊ शकतात. दरम्यान ज्यांच्याकडे फिजिकल पॅन कार्ड नाही तेच लोक ई-पॅन कार्डसाठी अर्ज करू शकतात. प्राप्तिकर कायदा, 1961 च्या कलम 272B च्या तरतुदीनुसार, एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असल्यास 10,000 रुपये दंड आकारला जाऊ शकतो.

पॅन कार्ड ऑनलाइन डाउनलोड करणे ही अतिशय सोपी प्रक्रिया आहे. तुम्ही घरी बसल्या तुमच्या फोनवर सहज डाउनलोड करू शकता. त्याची प्रोसेस पुढीलप्रमाणे आहे.

ई-पॅन कार्ड कसे डाउनलोड करावे:

  • जर तुम्हाला ई-पॅन कार्ड डाउनलोड करायचे असेल तर तुम्हाला प्रथम NSDL च्या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल. यासाठी तुम्ही https://www.onlineservices.nsdl.com/paam/requestAndDownloadEPAN.html वर क्लिक करू शकता.

  • होमपेजवर Apply for PAN वर क्लिक करा आणि आपले आवश्यक डिटेल्स एंटर करा. त्यानंतर डिक्लेरेशन बॉक्सवर टिक करा आणि कॅप्चा सबमिट करा.

  • आता तुमच्या पॅनच्या सर्व आवश्यक डिटेल्स व्हेरिफाय करा ज्या तुमच्या स्क्रीनवर दिसतील. आता पॅन व्हेरिफिकेशनसाठी कोणत्याही एका मोडवर क्लिक करा. त्यानंतर डिक्लेरेशन बॉक्सवर टिक करा आणि जनरेट OTP वर क्लिक करा.

  • OTP व्हेरिफाय करा आणि Continue With Paid ई-पॅन डाउनलोड फॅसिलिटी वर क्लिक करा

  • आता कोणताही एक पेमेंट गेटवे निवडा आणि पेमेंट कन्फर्म करण्यासाठी ऑप्शनवर क्लिक करा.

  • प्रोसेसींग फी म्हणून 9 रुपये भरा. पेमेंट यशस्वी झाल्यानंतर कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करा.

  • पेमेंट रिसिप्ट तयार झाल्यानंतर, डाउनलोड ई-पॅन वर क्लिक करा. तुमचे ई-पॅन कार्ड तुमच्या मोबाईल फोन किंवा पीसीमध्ये डाउनलोड केले जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT