Indonesia Earthquake sakal
विज्ञान-तंत्र

Indonesia Earthquake : इंडोनेशियामध्ये वारंवार भुकंप का होतात?

इंडोनेशियामध्ये वारंवार भुकंप का होतात? सविस्तर जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

इंडोनेशियाची जुनी राजधानी जकार्ता बेटावर सोमवारी भुकंप झाला. या भुकंपाने 46 लोकांचा जीव घेतला, 700 लोक जखमी झाले तर इतर नुकसान झाल ते वेगळंच. आपण नेहमी जपान, सुमात्रा, फिलिपाईन्स आणि इंडोनेशियाया या बेटांवर भुकंप, त्सुनामी आल्याचा आणि अनेकांनी जीव गमावल्याच्या बातम्या ऐकतच असतो. पण या बेटांवरच इतके भुकंप का होतात? चला तर जाणून घेऊया. (Why Earthquake always happen in Indonesia)

पॅसिफिक महासागराच्या आजुबाजुच्या देशांचा एक कडा तयार होतो जेथे पृथ्वीवरील 75 टक्क्यांहून अधिक ज्वालामुखी आणि 90 टक्क्यांहून अधिक भूकंप येतात. त्यामुळेच या भागाला “Ring of Fire” म्हणतात. खरतर ही एकदम परफेक्ट गोल रिंग नाही. घोड्याच्या नालसारखा हा आकार तयार झालाय.

तुम्हाला माहीत आहे का आपल्या पायाखालील जमीनीचे म्हणजे पृथ्वीचे 7 मोठे तुकडे पडले आहेत. या तुकड्यांना प्लेट्स म्हणतात. या प्लेट्स जेव्हा एकमेकांवर धडकतात तेव्हा भुकंप येतो. हाच भुकंप जर समुद्राखाली झाला तर त्याला त्सुनामी म्हणतात. आत्ता या “Ring of Fire” मध्ये कित्ती प्लेट्सची गर्दी आहे ते बघितल्यावर तिथे इतके भुकंप का होतात, ते समजेल.

पॅसिफिक प्लेट, उत्तर अमेरिकन प्लेट, इंडो-ऑस्ट्रेलियन प्लेट, दक्षिण अमेरिकन प्लेट,कोकोस प्लेट, जुआन डी फुका प्लेट, नाझका प्लेट, फिलिपिन्स सी प्लेट या त्या सर्व प्लेट्स. या विचित्र नावांच्या प्लेट्स धडकल्या की झटका तर बसणारच. याआधी सुध्दा 2004 मध्ये हिंदी महासागरात इंडो–बर्मा प्लेट धडकुन एक जबरदस्त त्सुनामी आला होता. तेव्हा 14 देशांमधील 2 लाख पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला होता.

याचा मोठा इम्पॅक्ट इंडोनेशिया आणि सुमात्रा या बेटांनाच बसला होता. यावेळीही तसच झालय इंडोनेशियात आलेला भुकंप “Ring of Fire” च्या प्लेट धडकल्याने आलाय. ही एक नैसर्गीक घटना असल्याने आपण खबरदारी घेण्याशिवाय अधिक काही करु शकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: युती ठरली, पण महायुतीचे राजकारण पुन्हा उघडे; 122 जागांवर एकमत, मनसे 50–55 जागा लढवणार

Pune Water Issue : वारजे मुख्य जलवाहिनीत गळती; चांदणी चौक, बाणेर-बालेवाडी परिसराचा पाणीपुरवठा विस्कळीत!

Ohh Shit: रोहित शर्मा मॅच खेळत होता अन् 'तो' अचानक कोसळला; तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, पळापळ झाली अन् सर्वच घाबरले

New Year Trip Places : कमी खर्चात नव्या वर्षाची ट्रीप प्लॅन करताय? 'ही' आहेत 5 बेस्ट ठिकाणे..कमी पैशात डबल मजा

Latest Marathi News Live Update : बर्च बाय रोमियो लेन आग प्रकरणातील लुथरा ब्रदर्स यांच्या पोलीस कोठडीत वाढ

SCROLL FOR NEXT