10 digits Mobile Number Esakal
विज्ञान-तंत्र

Mobile Number: आपला मोबाईल नंबर १० अंकीच का असतो? जाणून घ्या

10 digits Mobile Number: आपण कुणालाही कॉल करताना मोबाईल दहा अंक झालेत का हे आधी तपासतो.

सकाळ डिजिटल टीम

मोबाईल नंबर १० अंकीच का असतो? (Why is mobile number only 10 digits?)-

मोबाईल ही आताची काळाची गरज झाली आहे. लहानापासून थोरांपर्यंत सर्वजण आता मोबाईल वापरतात. आपणही खुप वर्षापासून मोबाईल वापरत असाल आणि तुमचा मोबाईल नंबर दहा अंकी असतो, हेही तुम्ही पाहिलं असेल. आपण कुणालाही कॉल करताना मोबाईल दहा अंक झालेत का हे आधी तपासतो. जर चुकून एखादा अंक कमी जास्त झाला तर नंबर लागत नाही. यावरुन मोबाईल नंबर दहा अंकी असतो हे तुमच्या लक्षात आले असेलच, परंतु तो १० अंकी का असतो हे तुम्हाला माहीत आहे का? नाही ना? चला तर मग जाणून घेऊया.

नॅशनल नंबरिंग स्कीम (NNP)-(National Numbering Scheme)-

भारतातील मोबाईल १० अंकी (10 digits) असण्याचं कारण आहे, सरकारची नॅशनल नंबरिंग स्कीम म्हणजेच NNP. अगदी साध्या शब्दात सांगायचं तर ० ते ९ या दहा संख्या घेऊन आपल्याला फक्त १० वेगवेगळे नंबर बनवता येतात आणि फक्त १० लोकच त्यांचा वापर करू शकतील. दुसरीकडे, २ अंकी मोबाइल क्रमांक असला तरीही ० ते ९९ पर्यंतचे फक्त १०० नंबर बनवता येतात आणि ते फक्त १०० लोक वापरू शकतील. परंतु १० अंकी नंबर असल्यामुळे १ अब्ज नंबर बनू शकतात.

मोबाईल नंबर आणि लोकसंख्या (Mobile numbers and population-)-

भारतात (India) मोबाईल नंबर (Mobile Number) दहा अंकी (10 digit) असण्यामागील आणखी एक प्रमुख कारण म्हणजे भारताची लोकसंख्या. सध्या देशाची लोकसंख्या सुमारे १३० कोटींच्या पुढे आहे आणि लोकसंख्या दिवसेंदिवस भर पडत आहे. अगदी त्याचप्रमाणे मोबाईल युजर्संमध्येही दिवसेंदिवस भर पडत आहे. त्यामुळे जर नऊ अंकी मोबाईल वापरला गेला असता तर पुढे अडचणीचं ठरलं असतं. परंतु मोबाईल नंबर जर १० अंकी असेल, तर त्यापासून तेव्हा गणनानुसार एक हजार कोटी वेगवेगळे नंबर बनवता येतात. त्यामुळेच भविष्यात नंबर्सची वाढती मागणी लक्षात घेऊन मोबाईल नंबर १० अंकी करण्यात आला.

पुर्वी मोबाईल नंबर 9 अंकी असायचा (Mobile number used to be 9 digits)-

सध्या जरी मोबाईल नंबर १० अंकी असले, तरी २००३ पर्यंत मात्र देशात फक्त ९ अंकी मोबाईल क्रमांक होते. पण वाढती लोकसंख्या पाहता ट्रायने त्यात १० अंकांचा नंबर सुरु केला आहे. त्याच वेळी, १५ जानेवारी २०२१ पासून, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (Telecom Regulatory Authority of India) लँडलाइनवरून कॉल करताना नंबरसमोर शून्य ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. डायलिंग पद्धतीतील हा बदल दूरसंचार कंपन्यांना मोबाइल सेवांसाठी २५४.४ दशलक्ष अतिरिक्त क्रमांक तयार करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT