Smartphone esakal
विज्ञान-तंत्र

Smartphone : 'ग्राहकांना जुन्या फोनच्या बदल्यात नवा फोन' ही ऑफर कंपनीला कशी परवडते? वाचा त्यांची स्कीम

फ्लिपकार्ट किंवा अॅमेझॉन सारख्या प्लॅटफॉर्मवर जाऊन एक्सचेंज ऑफर निवड करावी लागते

सकाळ ऑनलाईन टीम

Smartphone : मोबाइल एक्सचेंज ऑफरचे बरेच फायदे असतात. जसं की, तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असता तेव्हा बऱ्याचदा जुने फोन एक्सचेंज मध्ये देण्याचा पर्याय आपल्याकडे असतो. बऱ्याच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्ममध्ये फोन एक्सचेंज ऑफर्स सुरू असतात. मग युजर्स जुने फोन देऊन डिस्काउंटसह नवीन फोन खरेदी करतात. यासाठी फ्लिपकार्ट किंवा अॅमेझॉन सारख्या प्लॅटफॉर्मवर जाऊन एक्सचेंज ऑफर निवड करावी लागते.

पण तुम्हाला प्रश्न पडतो का? की या जुन्या फोनचं या ई-कॉमर्स कंपन्या करतात काय? किंवा मग त्यांना अशा एक्सचेंज ऑफर देणं परवडतं कसं?

तर एक्सचेंज ऑफर डील केवळ ग्राहकांसाठीच नाही तर ई-कॉमर्स कंपनी आणि उत्पादकांसाठीही फायदेशीर असते. या डीलनुसार, बिलावर सवलत मिळवण्यासाठी जुना फोन नवीन फोनसाठी एक्सचेंज करू शकतो. जेव्हा तुम्ही जुन्या फोनचे तपशील भरता, तेव्हा ई-कॉमर्स वेबसाइट तुम्हाला तुमच्या फोनच्या किमतीची रक्कम सुचवते आणि त्यानंतर तुम्ही सवलत म्हणून त्याचा लाभ घेऊ शकता. यानंतर, कंपनी तुमचा जुना फोन घेऊन वेगवेगळ्या कारणांसाठी वापरते.

या एक्सचेंज ऑफरमध्ये अॅमेझाॅन किंवा फ्लिपकार्ट यांचा जास्त मोठा फायदेशीर भाग असतो. त्यांची स्पेशल ऑफर या सर्व किंमतींना मागे टाकत असते. त्यामुळे जर तुम्ही फोन विकायला उत्सुक असाल तर या दोन प्लॅटफॉर्मना प्राधान्य द्या.

शेवटी आपली वस्तू विकताना आपल्याला योग्य दाम कोण देतं हे या सर्वात महत्त्वाचे. त्यामुळे नीट विचार करुन योग्य ठिकाणी आपण फोनच्या विक्रीसाठी पोचणं महत्त्वाचं..भले तो फोन वापरलेला असला तरीही!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT