AC Cooling Tips 600 Hours rule esakal
विज्ञान-तंत्र

AC Care Tips : एसीचा थंडावा टिकवायचा आहे? मग 600 तासांच्या 'या' नियमाकडे करू नका दुर्लक्ष, नाहीतर होईल मोठे नुकसान

AC Cooling Tips 600 Hours rule : एसीचा प्रभाव टिकवायचा असेल तर दर 600 तासांनंतर सर्व्हिसिंग आवश्यक आहे. वेळेवर देखभाल केल्यास कूलिंग चांगलं राहील आणि अपघातांचा धोका टाळता येईल.

Saisimran Ghashi

AC Cooling Tips : उन्हाळा जसजसा वाढतोय, तसतसे एअर कंडिशनर (AC) वापरण्याचं प्रमाण वाढतंय. मे, जून आणि जुलै महिन्यांमध्ये भारतात उष्णतेचा कहर असतो आणि याच काळात AC ही अनेक कुटुंबांची गरज बनते. पण अनेक वेळा या एसीचा वापर करताना आपण एक महत्त्वाची गोष्ट दुर्लक्षित करतो AC सर्व्हिसिंगचं वेळेवर महत्त्व.

AC दर 600 तासांनी का सर्व्हिस करावा लागतो?

तज्ज्ञ सांगतात की, एसीचा उत्तम परफॉर्मन्स आणि दीर्घकालीन टिकाऊपणा टिकवायचा असेल, तर प्रत्येक 600 ते 700 तासांनंतर त्याची सर्व्हिसिंग करणे अत्यंत आवश्यक आहे. हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल, कारण ९०% पेक्षा अधिक वापरकर्त्यांना हाच वेळेचा मोजमाप माहितच नसतो!

विनासर्व्हिसिंग दीर्घकाळ चाललेले एसी,

  • कमी कूलिंग करू लागतात

  • जास्त वीज घेतात

  • गॅस लिकेज, फिल्टर ब्लॉकेज, आणि कॉम्प्रेसरवर अनावश्यक ताण निर्माण करतात

  • आणि काही वेळा गंभीर अपघातांचंही कारण ठरू शकतात

काही महत्त्वाच्या खबरदारी आणि टीप्स

  1. सतत वापर टाळा, AC सलग 10–12 तास चालू ठेवणे टाळा. यामुळे कॉम्प्रेसरवर ताण येतो.

  2. गॅस लिकेज तपासा,600 तासांनंतर गॅस लिकेजची शक्यता वाढते, त्यामुळे तपासणी आवश्यक आहे.

  3. फिल्टर नियमितपणे स्वच्छ करा, फिल्टर स्वच्छ ठेवल्यास हवा नीट फिरते आणि कूलिंग योग्य राहते.

  4. बाह्य युनिट सावलीत ठेवा, आउटडोअर युनिट थेट उन्हात ठेवू नका, त्याने ओव्हरहीटिंग होतं.

  5. 24°C वर तापमान सेट करा ही ऊर्जेची बचत आणि आराम यांचा उत्तम समतोल आहे.

AC ही फक्त लक्झरी नव्हे, तर गरज बनली आहे. पण ती सुरक्षितपणे आणि कार्यक्षमतेने चालवायची असेल, तर वेळेवर सर्व्हिसिंग करणे गरजेचे आहे. एसीचा खर्च जास्त असतो, पण जर तुम्ही त्याची योग्य काळजी घेतली नाही, तर तो खर्च वाया जाण्याची शक्यता जास्त असते.
AC वापराची 600–700 तासांची मर्यादा लक्षात ठेवा आणि उन्हाळ्यात गारवा आणि सुरक्षितता दोन्ही सुनिश्चित करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदानाआधीच भाजपचा दबदबा; १०० उमेदवारांची बिनविरोध निवड

Pune RTO : नवले पूल अपघातानंतर आरटीओ ॲक्शन मोडवर! २० चालकांच्या डोळ्यांत दोष, कायमस्वरूपी तपासणी केंद्राची मागणी

Latest Marathi News Live Update: दिल्लीला पुन्हा स्मॉगचा विळखा! AQI 429, ‘Severe’ श्रेणीत शहर ठप्प

India VS South Africa: वनडे मालिकेसाठी रिषभ पंत, राहुल कर्णधारपदाच्या शर्यतीत; शुभमन गिल तंदुरुस्त होण्याची शक्यता फारच कमी

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचे संकट, थंडीची लाट ओसरली; हवामान विभागाचा अंदाज

SCROLL FOR NEXT