Wi-Fi Router Facts esakal
विज्ञान-तंत्र

Wi-Fi Router Facts: तुमची झोप उडण्याला कारणीभूत असू शकतो Wi-Fi Router ? कसं ते पहा

मग Wi-Fi साठी बेस्ट जागा कोणती?

Pooja Karande-Kadam

Wifi Router Facts: ऑफिस आणि घर दोन्ही ठिकाणचे काम ऑनलाईन असेल तर Wi-Fi घरी बसवलेलाच असतो. मोबाईल नेटवर्क चांगले मिळावे, तसेच वेगवेगळे मोबाईल रिचार्ज करण्यापेक्षा एकच Wi-Fi चा रिचार्ज केलेला परवडतो, असा विचार करूनच जाद्यातर लोकांकडे वायफाय बसवला जातो.

या Wi-Fi मुळे अनेक आजारही होत आहेत. होय, तुम्हाला पटणार नाही. पण हे सत्य आहे. वायफायमुळे अनेक आजारांची लागण आपल्याला होत आहे. वायफाय बसवलेले असलेल्या जागेच्या जवळ तुम्ही झोपत असाल तर तुम्हाला झोप न येण्याचा आजार होऊ शकतो. म्हणजेच, निद्रानाशाचे बळी तुम्ही पडू शकता.

जर तुम्ही घरी वापरलेले Wi-Fi रात्री चालू ठेवत असाल तर तुम्हाला कदाचित त्याबद्दल माहिती नसेल. वायफाय वापरल्यानंतर लोक ते बंद करायला विसरतात. त्याचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होते हे त्यांना माहीत नसते. (Wi-Fi Network)

जर तुमच्या घरातही वायफाय बसवलेले असेल आणि तुम्ही त्याचा राउटर बंद न करता रात्री झोपायला जात असाल तर ते किती धोकादायक ठरू शकते हे तुम्हाला समजले पाहिजे. आज आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तरपणे सांगणार आहोत.

उत्तम कनेक्टिव्हिटी आणि वेगवान इंटरनेट स्पीडसाठी, आपण घरी वायफाय स्थापित करतो, परंतु त्यामुळं धोका होऊ शकतो तुम्हाला माहित आहे का, तुम्ही त्यातून किती आजारी पडू शकता. वायफायमधून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. (Internet Speed)

जर तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे होणा-या रोगांपासून स्वतःचे संरक्षण करायचे असेल, तर तुम्ही वायफाय राउटरचा वापर झाल्यावर ते बंद करा. अनेक लोकांना याबद्दल माहितीच नसते. पण, रात्री तुम्ही Wi-Fi बंद केलात तर तुम्हाला हे गंभीर आजार होणार नाहीत.

जर तुमच्या घरातील वायफाय राउटर रात्रभर चालू राहिल्यास त्यातून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे काही काळानंतर तुमच्या शरीरात अनेक आजार उद्भवू शकतात. हे राउटरमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे होते, ज्याबद्दल बहुतेक लोकांना माहितीही नसते.(Technology)

घरामध्ये रात्रीच्या वेळी Wi-Fi राउटर बराच वेळ चालू असेल तर ज्या ठिकाणी Wi-Fi राउटर बसवले आहे त्या ठिकाणी निद्रानाशाची समस्या उद्भवू शकते ज्यामध्ये व्यक्तीला झोप येत नाही. निद्रानाश हा गंभीर आजार आहे. त्यावर योग्य ते उपचार घेणे गरजेचे आहे.

वायफाय राऊटर रात्रभर सुरू राहिल्यास अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. वास्तविक, वायफाय राउटर चालवल्याने बाहेर पडणाऱ्या रेडिएशनचा तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो. (Health Tips)

‘हे’ आजार कसे टाळावे?

आजच्या काळात प्रत्येकाला चांगली कनेक्टिव्हिटी आणि वेगवान इंटरनेट स्पीड आवश्यक आहे आणि त्याशिवाय तुमची अनेक कामे पूर्ण होऊ शकत नाहीत.

वाईट परिणाम टाळण्यासाठी, आपण त्यांचा वापर मर्यादित करू शकतो. जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच त्यांना ठेवा. रात्री झोपताना वायफाय बंद करण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने, तुम्ही केवळ किरणोत्सर्गाच्या लहरी आणि विद्युत चुंबकीय लहरींपासून स्वतःला वाचवू शकत नाही तर विजेचीही बचत कराल.

मग Wifi साठी बेस्ट जागा कोणती

जर तुमच्या रूमजवळ राउटर बसवणे सक्तीचे असेल तर तुम्ही हे लक्षात ठेवा की वायफाय राउटर तुमच्यापासून किमान 3 फूट दूर आहे. रात्री झोपताना, राउटर बंद करा, जेणेकरून त्याच्या रेडिएशनमुळे झोप न येण्याचा त्रास होणार नाही.

गरज असेल तेव्हाच वायफाय वापरा, जास्त वेळ वायफाय वापरू नका. ड्रॉईंग रूम किंवा व्हरांडा सारख्या कॉमन रूममध्ये वायफाय बसवा जेणेकरून त्याचे रेडिएशन थेट तुमच्यापर्यंत येऊ नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

SCROLL FOR NEXT