Cheap Water Heater
Cheap Water Heater esakal
विज्ञान-तंत्र

Cheap Water Heater: महागडं गीजर कशाला हवंय? नळाला लावा हे डिवाइस, सेकंदात येईल गरम पाणी; किंमत...

सकाळ डिजिटल टीम

Winter Cheap Water Heater: थंडीच्या दिवसांत सगळ्यात जास्त गरम पाण्याची आवश्यकता भासते. मग ते अंघोळीला असो किंवा फ्रेश होण्याासाठी. महागड्या गॅसवर घरातील प्रत्येकासाठी पाणी तापवणेही न परवडणारेच ठरते. आणि त्यात फारही वेळही जातो. अशा वेळी अनेकांना असं वाटतं की आपल्या घरात गीजर असावं. मात्र मध्यमवर्गीयांमध्ये प्रत्येकाला महागडं गीजर घेणं शक्य नाही. तेव्हा जाणून घ्या गीजरसारखंच काम करणाऱ्या या स्वस्त डिवाइसबद्दल.

विना सेटअप अन् स्वस्त दरात

तुम्हाला नळाच्या हिटरसाठी जास्त खर्च येणार नाही. तुम्ही कुठल्याही ई-कॉमर्स साइट किंवा ऑफलाइन मार्केटमधून इस्टंट वॉटर हिटर खरेदी करू शकता. या वॉटर हिटरची किंमत केवळ १५०० रुपये किंवा त्यापेक्षाही कमी असू शकते. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला वेगळं टँक लावायचीही गरज पडणार नाही. या इस्टंट वॉटर हिटरला तुम्ही थेट बाथरूममधल्या नळाला लाऊ शकता. असंच एक गॅजेट अॅमेझॉनवर देखील उपलब्ध आहे. त्याची किंमत १३०० रुपये आहे. (Electronic Gadgets)

काही सेकंदात करेल पाणी गरम

या प्रोडक्टबाबत कंपनीने देखील दावा केलाय की यातून थंड किंवा गरम पाणी काढल्या जाऊ शकतं. तुम्ही पाण्याला मिक्स करू शकणार नाही. गरम पाण्यासाठी मॅक्झिमम 2.4 प्रति मिनीट तर थंड्या पाण्यासाठी 3 प्रति मिनीट लागतात. तेव्हा तुम्ही भांडी, ब्रश, कपडे धुण्यासाठी आणि भाज्या धुण्यासाठीही गरम पाण्याचा वापर करू शकता.

या डिवाइसला नळाला लावल्यानंतर इलेक्ट्रिसीटीला कनेक्ट करावे लागेल. जेव्हा तुम्हाला गरम पाणी हवं असेल तेव्हा तुम्ही स्विच ऑन करू शकता. कंपनीचा दावा आहे की, काही सेकंदात नळामध्ये गरम पाणी यायला लागतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

ED : ‘ईडी’वर अंकुश! न्यायप्रविष्ट प्रकरणांत आता थेट अटक होणार नाही

Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

Sugar : केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’; ९० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता

अग्रलेख : ‘आप’ भी...?

SCROLL FOR NEXT