Elon Musk X Subscription Plans eSakal
विज्ञान-तंत्र

Elon Musk X : 'एक्स'चे दोन नवे सबस्क्रिप्शन प्लॅन लाँच, 244 रुपयांपासून होणार सुरू! मिळतील भन्नाट फीचर्स

X Subscription Plans : यातील एक प्लॅन बेसिक आहे, तर दुसरा प्रीमियम प्लस असणार आहे.

Sudesh

X New Plans : इलॉन मस्कने 'एक्स' (आधीचे ट्विटर) अ‍ॅप विकत घेतल्याला एक वर्ष पूर्ण झालं आहे. यानिमित्ताने एक्सचे दोन नवीन सबस्क्रिप्शन प्लॅन लाँच करण्यात आले आहेत. यातील एक प्लॅन बेसिक आहे, तर दुसरा प्रीमियम प्लस असणार आहे. बेसिक प्लॅन हा दरमहा 244 रुपयांपासून सुरू होत आहे.

एक्सच्या नवीन बेसिक (X Basic Plan) आणि प्रीमियम+ (X Premium + Plan) प्लॅनमध्ये विविध प्रकारचे पर्याय उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे यूजर्सना आपल्या आवडीनुसार आणि गरजेनुसार योग्य प्लॅन निवडता येईल. एक्सचा आधीपासूनच एक प्रीमियम प्लॅन उपलब्ध आहे. तर प्रीमियम प्लस प्लॅनमध्ये काही अतिरिक्त फीचर्स देण्यात येतील.

बेसिक प्लॅन

एक्सचा बेसिक प्लॅन घेतलेल्या यूजर्सना ब्लू-टिक मिळणार नाही. मात्र, यूजर्सना पोस्ट एडिट करणे, मोठ्या पोस्ट करणे (4,000 कॅरेक्टर लिमिट) आणि 20 मिनिटांपर्यंत मोठे व्हिडिओ अपलोड करणे असे फीचर्स मिळतात. यासोबतच, टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन, इनक्रिप्टेड डीएम, लाईक्स-सबस्क्रिप्शन हाईड करणे आणि इतर काही फीचर्स मिळतात. याची किंमत 244 रुपये प्रति महिना आहे. तर, याचा वार्षिक प्लॅन हा 2,590 रुपयांना उपलब्ध आहे. (Elon Musk)

प्रीमियम प्लस प्लॅन

प्रीमियम प्लस हा एक्सचा सगळ्यात महागडा सबस्क्रिप्शन प्लॅन असणार आहे. हा एक अ‍ॅड-फ्री प्लॅन आहे. यामध्ये यूजर्सना एक्सवर स्क्रोल करताना कोणत्याही जाहिराती दिसणार नाहीत. यासोबतच, कंटेंट क्रिएटर्सना मीडिया स्टुडिओ आणि अ‍ॅनालिटिक्स असे फीचर्स यात मिळतील. यात पोस्ट अनडू, ब्लू टिक, पोस्ट एडिटिंग आणि प्रीमियम प्लॅनमधील सर्व फीचर्स मिळतील.

या प्लॅनची किंमत दरमहा 1,300 रुपये असणार आहे. तसंच, एकाच वेळी 13,600 रुपये भरुन याचा वार्षिक प्लॅनही घेता येईल. दरम्यान, एक्सचा पहिला प्रीमियम प्लॅन हा आधीप्रमाणेच 650 रुपये प्रति महिना या दरात उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT