X Audio Video Calls eSakal
विज्ञान-तंत्र

X Audio Video Calling : आता अँड्रॉईड यूजर्सनाही वापरता येणार 'एक्स'वरील ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंग फीचर! कंपनीची मोठी घोषणा

एक्सने दिलेल्या माहितीनुसार, सध्या केवळ प्रीमियम एक्स यूजर्सना हे फीचर उपलब्ध असणार आहे. या यूजर्सना आपलं अ‍ॅप अपडेट करून हे फीचर मिळू शकेल.

Sudesh

इलॉन मस्कने एक्स, म्हणजेच ट्विटरला एव्हरिथिंग अ‍ॅप बनवायचं ठरवलं आहे. यामुळेच काही दिवसांपूर्वी यामध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंग फीचर लाँच केलं होतं. पूर्वी हे फीचर केवळ आयओएस यूजर्ससाठी उपलब्ध होतं. मात्र आता अँड्रॉईड यूजर्सनाही हे फीचर मिळणार आहे. टप्प्या-टप्प्याने सर्व यूजर्सना हे उपलब्ध होईल.

एक्सने दिलेल्या माहितीनुसार, सध्या केवळ प्रीमियम एक्स यूजर्सना हे फीचर उपलब्ध असणार आहे. या यूजर्सना आपलं अ‍ॅप अपडेट करून हे फीचर मिळू शकेल. यानंतर सेटिंग्समध्ये जाऊन ते कॉलिंगचं फीचर सुरू करू शकतील.

आपल्याला कोण कॉल करू शकतं यावर यूजर्सचा कंट्रोल राहणार आहे. यासाठी तीन ऑप्शन असणार आहेत. कॉन्टॅक्ट्समधील लोक, आपण ज्यांना फॉलो करतो ते लोक, किंवा व्हेरिफाईड यूजर्स अशा तीन पर्यायांपैकी एक पर्याय तुम्ही निवडू शकता. सोबतच 'एनीवन' हा पर्यायही उपलब्ध आहे, ज्यामुळे कोणताही एक्स यूजर तुम्हाला फोन करू शकेल.

नवीन बेसिक प्लॅन

एक्सने याच महिन्यात आपल्या यूजर्ससाठी एक नवा बेसिक प्लॅन लाँच केला होता. हा प्लॅन व्हेरिफाईड ऑर्गनायझेशनसाठी वापरण्यात येत होता. यामध्ये 200 डॉलर्स प्रति महिना किंवा 2000 डॉलर्स प्रति वर्ष असे दोन पर्याय उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT