Xiaomi 11i Hypercharge 5G
Xiaomi 11i Hypercharge 5G 
विज्ञान-तंत्र

शाओमीचा सर्वात फास्ट चार्जिंग स्मार्टफोन भारतात लॉन्च; वाचा डिटेल्स

सकाळ डिजिटल टीम

Xiaomi 11i Hypercharge 5G : Xiaomi 11i स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे. हा भारतातील सर्वात वेगवान चार्जिंग स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केला जात आहे. Xiaomi 11i स्मार्टफोनमध्ये हायपरचार्ज तंत्रज्ञानाचा वापरले असून ue स्मार्टफोन म्हणजेच 15 मिनिटांत o ते 100% पूर्ण चार्ज होईल Xiaomi च्या या नवीन फोनमध्ये 120W हायपरचार्ज टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, Xiaomi 11i हायपरचार्ज 5G हा भारतातील सर्वात फास्ट चार्जिंग स्मार्टफोन आहे.

Xiaomi 11i हायपरचार्ज 5G ची ही किंमत आहे

Xiaomi 11i हायपरचार्ज 5G ची किंमत 26,999 रुपयांपासून सुरु होत आहे. ही किंमत 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटसाठी आहे. त्याच वेळी, फोनच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 28,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन 12 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजल्यापासून Flipkart, mi.com, Mi Home स्टोअर्स आणि ऑफलाइन रिटेलर्सवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. Xiaomi चा हा नवीन स्मार्टफोन Camo Green, Pacific Pearl, Purple Mist आणि Stealth Black कलर ऑप्शन्समध्ये लॉंच केला आहे

मिळतेय ऑफर

Xiaomi 11i हायपरचार्ज 5G स्मार्टफोन SBI कार्डने खरेदी केल्यावर 2,500 रुपयांची इंस्टट डिस्काउंट मिळेल, Redmi Note फोन असलेले ग्राहक हा नवीन स्मार्टफोन विकत घेत असल्यास तुम्ही फोन एक्सचेंज केल्यास 4,000 रुपयांची एक्सचेंज डिस्काऊंट मिळेल. रिवॉर्ड Mi कूपनसह 500 रुपयांची एडिशनल डिस्काउंट दिला जाईल.

Xiaomi 11i सीरीजसह कंपनीने 120W हायपरचार्ज अॅडॉप्टर कॉम्बो देखील सादर केला आहे, जो 3,999 रुपयांच्या किमतीत स्वतंत्रपणे विकला जाईल. अॅडॉप्टर कॉम्बो Xiaomi 11i हायपरचार्ज 5G स्मार्टफोनसह येतो. त्याची उपलब्धता केव्हा होईल हे Xiaomi ने अद्याप सांगितले नाही.

स्पेसिफिकेशन्स काय आहेत?

Xiaomi 11i HyperCharge 5G स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाचा फुल HD + सुपर AMOLED डिस्प्ले दिला आहे. फोनचा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. Xiaomi च्या या स्मार्टफोनमध्ये 128GB स्टोरेज देण्यात आले आहे. फोनचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येते. फोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक देखील दिला आहे. Xiaomi च्या या फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.

मिळेल 108 मेगापिक्सलचा कॅमेरा

Xiaomi 11i हायपरचार्ज 5G च्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या मागील बाजूस मुख्य कॅमेरा 108 मेगापिक्सेलचा आहे. याशिवाय फोनच्या मागील बाजूस 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटमध्ये 16-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनला 4,500 mAh ची बॅटरी असून, ती 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या स्मार्टफोनचे वजन 204 ग्रॅम आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीच्या अडचणी वाढल्या, स्टब्सपाठोपाठ अक्षर पटेलही बाद

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT