Yamaha Offers eSakal
विज्ञान-तंत्र

Yamaha Offers : गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर घरी आणा दुचाकी! यामाहा देतंय आकर्षक ऑफर्स; कॅशबॅकही उपलब्ध

Ganesh Festival Offers : यामाहा या दुचाकी बनवणाऱ्या कंपनीने देखील गणेशोत्सवानिमित्त आकर्षक ऑफर्स दिल्या आहेत.

Sudesh

सध्या गणेशोत्सवामुळे सगळीकडे खरेदीची लगबग सुरू आहे. कित्येक जण नवीन गोष्टी खरेदी करण्यासाठी या शुभ मुहूर्ताची वाट पाहत असतात. यामुळे कंपन्यादेखील या काळात विविध प्रकारच्या ऑफर्स देत असतात. यामाहा या दुचाकी बनवणाऱ्या कंपनीने देखील गणेशोत्सवानिमित्त आकर्षक ऑफर्स दिल्या आहेत.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

यामाहा इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या 150 CC FZ मॉडेल आणि 125 हायब्रिड स्कूटर्सवर नवीन ऑफर्स दिल्या जात आहेत. यातील विशेष कॅशबॅक ऑफर्स या मुंबईत 150 CC FZ मॉडेल्स आणि Ray ZR 125 CC हायब्रिड स्कूटरवर उपबल्ध आहेत. तर उर्वरित महाराष्ट्रात 150 CC FZ आणि फॅसिनो 125 CC हायब्रिड स्कूटरवर या ऑफर्स लागू होतील.

काय आहेत ऑफर्स?

वर उल्लेख केलेल्या नवीन दुचाकींच्या खरेदीवर फ्लॅट 3,000 रुपये कॅशबॅक दिला जात आहे. सोबतच, या गाड्यांच्या डाऊन पेमेंटवर (सुरुवातीची भरावयाची रक्कम) देखील मोठा डिस्काउंट दिला जात आहे. आता केवळ 7,999 रुपये भरुन तुम्ही या गाड्या बुक करू शकता.

कमी व्याजदर

तुम्ही जर कर्ज काढून दुचाकी घेत असाल, तर यामाहा यासाठी देखील विशेष ऑफर देत आहे. केवळ 7.99 टक्के एवढ्या कमी व्याजदरावर तुम्ही नवीन दुचाकी घेऊ शकणार आहात.

यामाहाच्या इतर गाड्या

यामाहाच्‍या सध्‍याच्‍या उत्‍पादन पोर्टफोलिओमध्‍ये YZF-R15 V4 (155 सीसी), YZF-R155 V3 (155 सीसी), MT-15 V2 (155 सीसी), FZS फाय व्‍हर्जन 4.0 (149 सीसी), FZS-फाय व्‍हर्जन 3.0 (149 सीसी), FZ-फाय व्‍हर्जन 3.0 (149 सीसी), FZ-एक्‍स (149 सीसी) अशा दुचाकींचा समावेश आहे.

सोबतच, ऐरॉक्‍स 155 (155 सीसी), फॅसिनो 125 फाय हायब्रिड (125 सीसी), Ray ZR 125 फाय हायब्रिड (125 सीसी), रे झेडआर स्ट्रीट रॅली १२५ फाय हायब्रिड (125 सीसी) या स्कूटर मॉडेल्‍सचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT