Samsung Galaxy A52s 5G  Google
विज्ञान-तंत्र

Year Ender 2021 : 2021 वर्षात सर्वाधिक विक्री झालेले स्मार्टफोन

सकाळ डिजिटल टीम

कोरोनामुळे मागचे वर्ष सर्वच उद्योगांसाठी कठीण होते स्मार्टफोन कंपन्यांना देखील या वर्षात अनेक संकटांचा सामना करावा लागला, स्मार्टफोनचे उत्पादन प्रभावित झाले, पण या सर्व आव्हानांना न जुमानता, काही स्मार्टफोन्स दमदार विक्री झाले. आज आपण 2021 मध्ये भारतातील सर्वाधिक विक्री होणार्‍या स्मार्टफोनबद्दल जाणून घेणार आहोत. काउंटरपॉईंटच्या रिपोर्टनुसार, Redmi 9A हा 2021 मध्ये भारतातील सर्वाधिक विकला गेलेला स्मार्टफोन ठरला आहे.

Redmi 9A

Redmi 9A हा भारतात सर्वाधिक विकला जाणारा फोन आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी, 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा या स्मार्टफोनमध्ये मिळतो, तसेच यामध्ये 6.53 इंचाचा डिस्प्ले दिला आहे. लाँच तारीख - 30 जून 2020 आणि किंमत - सुमारे 6,999 रुपये

Redmi 9 Power

हा फोन 6.53 इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसर सह येतो. फोनमध्ये 6000mAh बॅटरी आहे तसेच त्याच्या मागील बाजूस क्वाड कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सल्सचा आहे. फोनमध्ये 6.53 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळतो. लाँच तारीख - डिसेंबर 2020 आणि किंमत - 11,999 रुपये

Samsung Galaxy M42 5G

याच्या मागील पॅनलवर क्वाड-कॅमेरा सेटअप दिलेला आहे, ज्यामध्ये 48-मेगापिक्सेल कॅमेरा आणि समोर 20-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा मिळतो. तसेच हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 750G ऑक्टा कोर प्रोसेसरवर काम करतो. यात 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज आहे. लाँच तारीख - एप्रिल 2021 आणि किंमत - 21,999 रुपये

OnePlus Nord 2

या यादीतील हा तीसऱ्या क्रमांकाचा फोन असून यामध्ये मागील पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सेल आहे. तर 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन Snapdragon 750G चिपसेट सह येतो. लाँच तारीख - जुलै 2021 आणि किंमत 27,999 रुपये

Vivo V20

V20 स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 44 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा मिळतो. तर याच्या मागील पॅनलवर 64-मेगापिक्सलचा नाईट कॅमेरा आहे. तसेच हा फोन 33W फ्लॅश चार्जिंगसह येतो. या फोनमध्ये 2021 एडिशनचा स्नॅपड्रॅगन 730 चिपसेट दिला आहे. लाँच तारीख - डिसेंबर 2021 आणि किंमत - 22,999 रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

SCROLL FOR NEXT