Adventure Bikes India 2025 esakal
विज्ञान-तंत्र

Yezdi Adventure 2025 : बाईक प्रेमींनो तयार व्हा! लॉन्च होतीये 'Yezdi Adventure 2025', आकर्षक डिझाइन अन् नवे फीचर्स, किंमत फक्त..

Yezdi Adventure 2025 Bike Launch Price Details : येझ्दी अ‍ॅडव्हेंचर 2025 बाईक 4 जून रोजी लॉन्च होणार आहे. नवीन डिझाइनसह ही बाईक अ‍ॅडव्हेंचरप्रेमींसाठी खास ठरणार आहे.

Saisimran Ghashi

June Adventure Bike Launch Details: अ‍ॅडव्हेंचर बाईकप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. क्लासिक लिजेंड्स कंपनीने त्यांच्या लोकप्रिय "येझ्दी अ‍ॅडव्हेंचर" या मॉडेलचा 2025 चा अवतार अखेर 4 जून 2025 रोजी लॉन्च करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. आधी ही बाईक 15 मे रोजी मार्केटमध्ये येणार होती, मात्र भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या राजकीय तणावामुळे लॉन्च पुढे ढकलण्यात आला होता.

सध्या परिस्थिती स्थिर झाल्याने कंपनीने पुन्हा नव्या जोमात तयारी केली असून, येझ्दीच्या या अ‍ॅडव्हेंचर टूरिंग बाईकचा अपडेटेड अवतार बाईकप्रेमींना आकर्षित करण्यास सज्ज आहे. लॉन्च इन्व्हाइटसोबत शेअर करण्यात आलेल्या टीझर फोटोमध्ये नवीन मॉडेलच्या हेडलॅम्पचा अंदाज घेता येतो.

गोलसर आणि थोडा विसंगत असलेल्या हेडलॅम्पच्या डिझाइनला पाहून हे लक्षात येते की, ते कदाचित BMW R 1250 GS या आता बंद झालेल्या बाईकपासून प्रेरित असू शकते. काही अंशी हे डिझाइन यंत्रणा पॅनल (इन्स्ट्रुमेंट क्लस्टर) असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.

तांत्रिक बाबतीत ही बाईक पूर्वीप्रमाणेच राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. मागील वर्षीच कंपनीने इंजिनसह काही हार्डवेअर बदल केले होते. बाईकला 334cc क्षमतेचं, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन मिळत. सहा गिअरच्या गिअरबॉक्ससह ही बाईक 21 इंच पुढचा आणि 18 इंच मागचा स्पोक व्हील कॉम्बिनेशन वापरते.

टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क आणि मोनॉशॉक रिअर सस्पेन्शनमुळे राइडचा अनुभव उत्कृष्ट मिळतो. दोन्ही चाकांवर सिंगल डिस्क ब्रेक असून, स्विचेबल ABS ही सुरक्षा प्रणालीसुद्धा आहे. बाईकचं वजन 187 किलो असून, 15.5 लिटरचा इंधन टाकी क्षमतेसह ती लॉन्ग राइडसाठी योग्य ठरते.

सध्या बाजारात असलेली येझ्दी अ‍ॅडव्हेंचरची किंमत 2.16 लाख ते 2.20 लाख (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. अपडेटेड मॉडेल काहीसे अधिक महाग असण्याची शक्यता आहे.

जर तुम्ही अ‍ॅडव्हेंचर बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि ट्रेकिंग किंवा लॉन्ग राइडिंगचा अनुभव घ्यायचा असेल, तर येझ्दी अ‍ॅडव्हेंचर 2025 हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. विशेषतः नव्या डिझाइन अपडेटसह ही बाईक अधिक आकर्षक आणि युनिक दिसण्याची शक्यता आहे.

4 जूनला होणाऱ्या अधिकृत लॉन्चमध्ये बाईकचे सर्व फीचर्स, रंग पर्याय आणि अंतिम किंमत समोर येईल. त्यामुळे बाईकप्रेमींसाठी हा एक बेस्ट दिवस ठरणार आहे!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ट्रम्प यांच्या दाव्यावरून गोंधळ, १ विधेयक मंजूर, न्यायमूर्तींना पदावरून हटवण्याचा प्रस्ताव अन्...; संसदेत पहिल्या दिवशी काय घडलं?

Latest Maharashtra News Updates : राज्यात सत्ताधाऱ्यांसाठी कायदा वेगळा आहे का? - वडेट्टीवार

बापरे! इतके सुंदर पाय मी आयुष्यात पाहिले नाहीत... सचिन पिळगाववकरांनी मधुबाला यांच्या पायाबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत

Mahadev Munde Case: ''महादेव मुंडेंच्या न्यायासाठी जिल्हा बंद करणार'' मनोज जरांगेंचा इशारा, ज्ञानेश्वरी मुंडेंची घेतली भेट

Jagannath Hendge case update: 'न्याय द्या, नाही तर..'हेंगडे कुटुंबीयांनी सरकारला दिला कडक इशारा..

SCROLL FOR NEXT