YouTube Shorts Gets 3-Minute Limit, New Remix and Search Features esakal
विज्ञान-तंत्र

Youtube Shorts Update : आता तुम्हीही बनू शकता यूट्यूबर; शॉर्ट्समध्ये भन्नाट अपडेट; आता तब्बल 3 मिनिटांचे व्हिडिओ बनवता येणार

YouTube Shorts Gets 3-Minute Limit, New Remix and Search Features : १५ ऑक्टोबरपासून यूट्यूब शॉर्ट्सच्या व्हिडिओ लिमिट वाढवून तब्बल 3 मिनिटांपर्यंत केले जाणार आहेत.

Saisimran Ghashi

Youtube Shorts Time Limit Extended : आपल्या सर्वांना आवडणारे यूट्यूब शॉर्ट्स आता आणखी मजेदार होणार आहेत.याआधी फक्त 1 मिनिटाचा व्हिडिओ अपलोड करता येत होता, पण आता यूट्यूबने मोठी घोषणा केली आहे. १५ ऑक्टोबरपासून यूट्यूब शॉर्ट्सच्या व्हिडिओ लिमिट वाढवून तब्बल 3 मिनिटांपर्यंत केले जाणार आहेत. याचा फायदा क्रिएटिव लोकांना होणार आहे कारण आता ते त्यांच्या कल्पना अधिक चांगल्या प्रकारे मांडू शकणार आहेत.

फक्त इतकंच नाही तर यूट्यूब शॉर्ट्समध्ये आणखी काही अपडेट्स येत आहेत. आता शॉर्ट्सच्या फीडमध्ये कमेंट्सचा प्रीव्ह्यू दिसणार आहे. त्याचबरोबर यूट्यूबवरून क्लिप्स घेऊन त्यांचा वापर शॉर्ट्समध्ये करता येणार आहे. त्यामुळे आता मजेदार रीमिक्स बनवणे सोपे होईल. याशिवाय, कमी शॉर्ट्स बघण्यासाठीचा पर्यायही आला आहे. तुम्हाला जास्त शॉर्ट्स बघायची नसतील तर थ्री-डॉट मेन्यूमधून हा पर्याय निवडू शकता.

याशिवाय, गुगलने त्यांच्या सर्च फीचर्समध्येही एआयचा (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापर वाढवण्याची घोषणा केली आहे. यामध्ये एआयने वेब रिझल्ट्स चांगल्या प्रकारे ऑर्गनाइज करणे, गुगल लेन्सची क्षमता वाढवणे आणि एआय ओवरव्ह्यूजमध्ये लिंक्स व जाहिराती दाखवणे यांचा समावेश आहे. आता सर्च करताना गाणे ओळखण्यासाठी नवीन फीचरही येतोय आहे, ज्यामुळे वेगळ्या ऍपवर न जाता गाणे शोधता येईल.

हे फीचर विशेषत: चौकोनी किंवा त्यापेक्षा उंची असणाऱ्या व्हिडिओसाठी उपलब्ध असेल. १५ ऑक्टोबरपूर्वी अपलोड केलेले व्हिडिओ या बदलावांमुळे प्रभावित होणार नाहीत.

हे अपडेट्स हळूहळू सगळ्यांना मिळणार आहेत. काही अपडेट्ससाठी वापरकर्त्यांनी स्वतःहून निवड करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT