भारतातील सर्वात मोठी टू व्हीलर कंपनी होंडा मोटारसायकल आणि स्कूटर इंडिया (Honda Motorcycle and Scooter India) आपल्या सर्वात लोकप्रिय बाईक शाईन (Shine) वर मोठी ऑफर ठेवली आहे. कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यसाठी Zero Down Payment आणि No Cost EMI ऑफर ठेवली आहे. होंडा शाईन (Honda Shine) ही भारतात सर्वात जास्त विक्री होणारी बाईक आहे.
कंपनीची ही बाईक एक कोटीहून अधिक लोकांनी खरेदी केली आहे. दिवाळीनिमित्त तुम्ही झिरो डाउन पेमेंट करून बाईक खरेदी करू शकता. होंडा टू व्हीलरची भारतातील विक्री 5.18 लाख आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी बाईकची विक्री 7.6% वाढली आहे. याशिवाय कंपनीच्या इतर बाईकवर पण मोठ्या ऑफर आहेत.
कंपनीच्या इतर मॉडेल्सवरही ऑफर
शाईन व्यतिरिक्त होंडाच्या इतर वाहनांवरही ऑफर उपलब्ध आहेत. होंडा स्कूटर (Honda Scooty) वर कॅशबॅक ऑफर देखील उपलब्ध आहे. कंपनी 50,000 रुपयांपर्यंतच्या पेमेंटवर 5,000 रुपयांचा कॅशबॅक ऑफर आहे. 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत ही ऑफर योजना आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.