Rajur Sakal
टूरिझम

श्रीक्षेत्र राजूरला पर्यटनस्थळाचा ‘अ’ दर्जा, संस्थानकडून २० एकरांत विकसित होणार कृषी पर्यटन केंद्र

राजूर हे गणपतीच्या साडेतीन पीठांपैकी एक पूर्णपीठ असून येथे वर्षभर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक व भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते.

सकाळ वृत्तसेवा

तुषार पाटील

भोकरदन तालुक्यातील प्रसिद्ध असणारे तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र राजूरला महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक व पर्यटन विभागाकडून अ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाला आहे. ता.१९ यासंदर्भात शासनाकडून परिपत्रक जाहीर करण्यात आले.

राजूर हे गणपतीच्या साडेतीन पीठांपैकी एक पूर्णपीठ असून येथे वर्षभर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक व भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. आता महाराष्ट्रातील पंढरपूर, शिर्डी, शेगावच्या धर्तीवर राजूरचा विकास होणार आहे.

माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता. राजूरवासीयांमध्ये यामुळे आनंदाचे वातावरण आहे. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत श्रीक्षेत्र राजूर येथे बालउद्यान आणि विविध विकासकामांकरिता १० कोटी रुपयांचा निधी मिळालेला आहे. राजूर येथे मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असून रावसाहेब दानवे यांनी हे गाव दत्तक घेतले होते. रेल्वेमंत्री असताना येथे टॉय ट्रेन मंजूर करण्यात आली.

टॉय ट्रेनच्या ट्रॅकचे कामदेखील पूर्णत्वास आले आहे. मंदिर परिसरात असणाऱ्या रत्नालय तलावाच्या बाजूला संस्थानची २० एकर जमीन असून येथे आधुनिक कृषी पर्यटन केंद्र विकसित होणार आहे. या कृषी पर्यटन केंद्रामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे. शिर्डी, शेगावच्या धर्तीवर मराठवाड्यात अत्याधुनिक सुविधा असणारे एकमेव कृषी पर्यटन केंद्र लवकरच येथे साकारणार असून, त्याचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.

राजूर गावाची लोकसंख्या ६०००

दरवर्षी येणारे पर्यटक व भाविक ७० ते ८० लाख

विदेशी पर्यटक ६०० ते ७००

शिर्डी, शेगावच्या धर्तीवर राजूरची ओळख निर्माण होणार याचा आनंद आहे. राजूर परिसरातील खेड्यांचा देखील यामुळे विकास होणार असून राजूर गावाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल.

— कैलास पुंगळे, माजी जि. प. सदस्य, राजूर

राजूरला अ वर्गाच्या दर्जा मिळाल्यामुळे आता राज्य शासनाकडून मिळणाऱ्या निधीमध्ये मोठी वाढ होणार आहे. शिवाय केंद्र शासनाकडून देखील राजूरसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होईल. केंद्र शासनाच्या विविध योजना आणण्यासाठी मी पाठपुरावा करेल.

— रावसाहेब दानवे, सचिव, राजूर संस्थान

राजूर गणपती देवस्थानाला अ दर्जा प्राप्त झाल्यामुळे साहजिकच मोठा निधी येणार आहे. त्यामुळे अगोदर भाविकांची समस्या सोडवून त्यांना सुविधा देण्यात याव्यात. तसेच संकष्टी चतुर्थी व अंगारकी चतुर्थीला भाविकांची होणारी गैरसोय दूर करावी.

— अनिल सोनवणे, नागरिक, राजूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport Rules: प्रवाशांना दिलासा! विमानतळावरील अतिरिक्त शुल्कांवर सरकारचा मोठा निर्णय; नियम लवकरच बदलणार?

Neeraj Chopra CWG26: नीरज चोप्राने पाकिस्तानी अर्शद नदीमवर कुरघोडी केली, पण ८४ मीटरचे पात्रता अंतर गाठण्यात अपयशी; फायनलमध्ये पोहोचला की नाही?

सलमान खानने विकला कोट्यवधींचा फ्लॅट; तरीही हातात पडला फक्त 'एवढाच' नफा!

Latest Marathi News Live Update : नागपूरमध्ये आज पुन्हा पावसाला सुरुवात

Mumbai News: आरामदायी गाड्यांवर महापालिकेची उधळपट्टी! पदाधिकाऱ्यांवरील २ कोटी १६ लाखांचा खर्च वाया, नव्या गाड्या सहा महिन्यांत आवडेनाशा

SCROLL FOR NEXT