Karnala Bird Sanctuary
Karnala Bird Sanctuary 
टूरिझम

भटकंती : पक्ष्यांचे आश्रयस्थान (कर्नाळा पक्षी अभयारण्य)

सकाळवृत्तसेवा

लॉकडाउनच्या काळात सर्वांनी एक सुखद अनुभव घेतला तो विविध पक्ष्यांचे आवाज ऐकण्याचा. आपल्याला विविध प्रकारचे पक्षी आवडतात, मात्र शहरी भागात आपल्याला हा अनुभव घेता येत नाही. गेल्या काही महिन्यांतून ती अनुभूती घेता आली. अर्थात, त्यामुळे अनेकांच्या मनात पक्षिप्रेम निर्माण झाले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आता ‘न्यू नॉर्मल’ होत असताना एखाद्या छोटेखानी पक्षी अभयारण्याची सैर करायला काय हरकत आहे? मुंबईपासून अवघ्या ६० किलोमीटर अंतरावर पाताळगंगेच्या खोऱ्यात आपटे-कल्हाया, रानसई -चिंचवण गावाच्या पंचक्रोशीत कर्नाळा पक्षी अभयारण्य वसलेले आहे. 

कर्नाळा किल्याच्या आसपासचा परिसर पक्ष्यांच्या वैविध्यासाठी प्रसिद्ध आहे व या परिसरालाच ‘कर्नाळा अभयारण्य’ म्हणून सरंक्षित केले आहे. महाराष्ट्रातील हे पहिले पक्षी अभयारण्य आहे. पनवेलपासून १२ किलोमीटर अंतरावर हे अभयारण्य आहे. कर्नाळ्याच्या या अभयारण्यात विविध प्रकारचे सुमारे २२२ जातीचे पक्षी आढळतात. त्यापैकी १६१ जातीचे पक्षी या अभयारण्यात राहतात. अन्य पक्षी स्थलांतरित आहेत. 

सुमारे १२.११ चौरस किलोमीटरच्या परिसरात हे पक्षी अभयारण्य उभारले आहे. या ठिकाणी आपण केव्हाही आलात तरी पाचपन्नास निरनिराळे पक्षी आढळतात. मलबार, व्हिसलिंग थ्रश, कोकीळ, फलाय कॅचर, भोरड्या, तांबट, कोतवाल, पांढऱ्या पाठीची गिधाडे, दयाळ शाहीनससाणा, टिटवी, बगळे, मोर, बुलबुल, दयाळ, भारद्वाज, तितर, गरुड, घार, पोपट, सुतारपक्षी, कोतवाल, बहिरी ससाणा, शहाबाज आदी पक्ष्यांचे सहजतेने दर्शन होते.  

या अभयारण्यात तीन थरांचे जंगल आढळते. तळातील भागात दिंडा, वावडिंग, कारवी अशी झुडपे आहेत. मध्य भागात पांगारा, बहावा, तामण, यांचे प्रमाण जास्त आहे, तर उंचावरच्या भागात जांभूळ, साग, आंबा, आईन हे वृक्ष आढळतात. पक्ष्यांव्यतिरिक्त भोकरे, रानमांजर, माकडे, ससे इत्यादी प्राणीही आढळतात. या अभयारण्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे परिसरात निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष आहेत. गर्द झाडीत पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज ऐकण्याची मजाच काही और असते. आणि हो, तुम्हाला पक्षी पाहून कंटाळा (येणार नाहीच.) आला तर जवळच प्रसिद्ध कर्नाळा किल्ला आहे. पक्ष्यांच्या सहवासाबरोबर तुम्हाला किल्ल्याचीही भ्रमंती करता येईल.

कसे जाल? 

  • जवळचे रेल्वे स्थानक : पनवेल
  • पनवेल बसस्थानकावरून सकाळी ५ ते रात्री ८ या दरम्यान दर अर्ध्या तासाने बसेसची सोय आहे. (अनलॉकमुळे बससेवा सुरू झाली की नाही याची एकदा खात्री करणे आवश्‍यक आहे.)
  • पनवेलमध्ये जेवणाची सोय होऊ शकते.
  • सोबत डबा असल्यास निसर्गाच्या सान्निध्यात भोजनाचा आस्वाद घेता येईल.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT