Banarasi Food esakal
टूरिझम

Banarasi Food:  पान, रबडी, मलाईयो आणि बरंच काही; बनारसला गेलात तर या पदार्थांची चव चाखायला विसरू नका!

बनारसची रबडी अन् पान नाही तर हे पदार्थही आहेत स्पेशल!

सकाळ डिजिटल टीम

उत्तर प्रदेशमधील बनासर हे शहर पानांसाठी प्रसिद्ध आहे. पण, तिथे केवळ पानच मिळतात असं नाही. तर, तिथे इतरही गोष्टी फेमस आहेत. बनारसचा उल्लेख करताच मंदिरे आणि घाटांची चित्रे डोळ्यासमोर येऊ लागतात. येथील संस्कृतीने नेहमीच जगभरातील लोकांना आकर्षित केले आहे. त्याचबरोबर इथलं जेवणही अप्रतिम आहे.

बनारसमध्ये इतके पदार्थ उपलब्ध आहेत की ते एका दिवसात खाणे शक्य नाही. आज असे काही पदार्थ पाहूयात ज्याचा आस्वाद तुम्ही वन डे प्रवासात घेऊ शकता.

बनारसी पान

खईके पान बनारस वाला हे गाणं आलं आणि बनारसचं पान अधिकच फेमस झालं. अमिताभ बच्चन यांच्या डॉन चित्रपटातील हे गाणं आहे. तुम्ही बनारसमध्ये आहात आणि पान खात नाही, हे कसे होऊ शकते. तिथे पान खाण्यासाठी गामा पान भंडार (गौडोलिया), कुबेर पान भंडार (चर्च), केशव तांबूल भंडार (रविदास गेट लंका), आणि दीपक तांबूल भंडार (विश्वनाथ गली सिंग गेट) हे काही उत्तम पर्याय आहेत.

बनारसी पान

थंडगार लस्सी

तुम्ही बनारसला आलात आणि इथली लस्सी चाखली नाही तर तुमचा प्रवास अपूर्ण आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट्सपासून ते रस्त्यावरच्या छोट्या दुकानांपर्यंत सर्वत्र लस्सी सहज मिळेल. शहरातील प्रसिद्ध दुकानांबद्दल बोलायचे झाले तर, पहलवान ब्लू लस्सी शॉप (कुंज गली), शिवप्रसाद लस्सी भंडार (शास्त्री चौक रामनगर) ही काही मोठी नावे आहेत.

लस्सी

मलाई

वाराणसी अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. यापैकी एक बनारसी मिठाई देखील आहे. वर्षातून फक्त 3 महिने उपलब्ध असलेली मलई तोंडात गेल्यावर लवकर विरघळते. हिवाळ्यातील तीनच महिने ही मिठाई मैदगीन, बन्सफाटक, लंका, दशवमेघ, गौडोळ्या, गिरिजाघर येथील दुकाने दिसतात.

malai

बाटी चोखा

बाटी चोखा हे बनारसचे आणखी एक प्रसिद्ध पदार्थ आहे. मैदा, देशी तूप, सत्तू, कांदा, लसूण, आले, कोथंबीर, मीठ, यांच्या मदतीने बनवले जाते. एक वनस्पती, वांगी, टोमॅटो आणि मोहरीचे तेल इत्यादींच्या मदतीने ते चवीनुसार तयार केले जाते. जर तुम्हालाही बाटी चोखा आवडत असेल तर तुम्ही बाटी चोखा रेस्टॉरंटमध्ये जाऊ शकता.

बाटी चोखा

रबडी

तूम्हाला जेवणानंतर काहीतरी गोड खाण्याची सवय असेल. तर बनारसमध्ये गेल्यावर रबडी ट्राय करू शकता. बनारसी रबडी दही, साखर, ममलाई, बर्फ इत्यादींच्या मदतीने बनवली जाते. बनारसमधील चर्चजवळील कुबेर पान भंडार, गामा पान भांडार आणि राजाई सरदार स्वीट्सची रबडी बेस्ट मानली जाते.

बनारसी रबडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

SCROLL FOR NEXT