Jammu Kashmir Tour
Jammu Kashmir Tour Sakal
टूरिझम

उन्हाळी सुट्ट्यांच्या बुकिंग्सना सुरूवात; पर्यटनासाठी नागरिक उत्सुक

सकाळ वृत्तसेवा

पर्यटनासाठी बहुतेक पर्यटक विमानाने किंवा स्वतःच्या गाडीने प्रवास करतात. परंतु, लवकर बुकींग केले तर, विमान तिकिटे स्वस्तात मिळत असल्यामुळे सध्या हॉटेलबरोबरच विमान तिकिटांचे बुकींगही वाढले आहे.

पुणे - पर्यटनासाठी (Tourism) हक्काचा हंगाम (Season) म्हणजे उन्हाळी सुट्ट्या. (Summer Vacation) गेली दोन वर्षे कोरोनामुळे (Corona) या हंगामामाच बेरंग झाला होता. मात्र आता कोरोनाचे सावट कमी होत असल्याने आणि लसीकरणाची जोड मिळाल्याने पर्यटन व्यवसाय (Tourism Business) बहरू लागला आहे. आगामी एप्रिल-मे महिन्यातील सुट्ट्यांसाठी नागरिक जम्मू-काश्मीर, शिमला, कुलू-मनाली अशा विविध पर्यटन स्थळांचे बुकिंग (Booking) करत आहेत. तसेच श्रीलंका, मालदीव यांसारख्या परदेशी स्थळांवरही पर्यटकांच्या उड्या पडू लागल्या आहेत.

विद्यार्थ्यांच्या परीक्षा मार्च-एप्रिल महिन्यात संपल्यानंतर अनेक कुटुंब पर्यटनाला जाण्याचे बेत आखतात. या महिन्यांमध्ये देशात उन्हाळा असल्याने पर्यटक थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाण्यास प्राधान्य देतात. यंदाही हाच ट्रेंड कायम असल्याचे दिसून येत आहे. उत्तर भारतातील जम्मू-काश्मीर, शिमला, कुलू-मनाली, नैनिताल या नेहमीच्या ठिकाणांना मागणी तर आहेच. मात्र त्याशिवाय ईशान्य भारतातील स्थळांनाही पर्यटकांची पसंती मिळत असल्याचे निरीक्षण पर्यटक व्यावसायिकांनी नोंदवले. यात विशेषकरून आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय या ठिकाणांना सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे. तसेच दक्षिण भारतातील उटी, मुन्नार, पेरियार, कोडाईकेनाल या थंड हवेच्या ठिकाणांनाह पसंती मिळत आहे.

पर्यटनासाठी बहुतेक पर्यटक विमानाने किंवा स्वतःच्या गाडीने प्रवास करतात. परंतु, लवकर बुकींग केले तर, विमान तिकिटे स्वस्तात मिळत असल्यामुळे सध्या हॉटेलबरोबरच विमान तिकिटांचे बुकींगही वाढले आहे. विमान कंपन्यांनी जाहीर केलेल्या आकर्षक योजनांचाही पर्यटक लाभ घेत आहेत. तसेच हॉटेल चालकांनीही पर्यटकांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध सवलती जाहीर केल्या आहेत. त्याचा लाभ घेत नागरिक नियोजित स्थळांच्या हॉटल्सचे बुकिंग ऑनलाइन पद्धतीने करत आहेत.

‘कोरोनाचे सावट ओसरत आहे. त्यामुळे पर्यटनोत्सुक नागरिकांची चौकशी करण्यासाठी आणि बुकिंग करण्यासाठी ऑफिसमधली वर्दळ वाढली आहे. मागचे दोन वर्षे नागरिक घरातच होते. आता त्यांना बाहेर पडायचे आहे. तसेच लसीकरण मोठ्या प्रमाणावर पूर्ण होत आहे. त्यामुळे पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढू लागली आहे. मे-जूनसाठी सध्या मोठ्या प्रमाणात बुकींग होत आहेत.’

- अखिलेश जोशी, गिरीकंद ट्रॅव्हल्स

‘साधारण एप्रिल महिन्यापासून उन्हाळी हंगामाची सुरूवात होते. जूनपर्यंत हा हंगाम सुरू असतो. इतरवेळी देखील नागरिक पर्यटनाला बाहेर पडतात. मात्र या काळात मुलांच्या परिक्षा संपून त्यांना सुट्ट्या असल्यामुळे नागरिकांना सहकुटुंब फिरायला जाता येते. त्यामुळेच या हंगामात पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळतो. त्यासाठीची लगबग सध्या सुरू असल्याचे पर्यटन कंपन्यांत होत असलेल्या बुकींगवरूनही स्पष्ट होत आहे.’

- विवेक गोळे, भाग्यश्री ट्रॅव्हल्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT