Jamboti Waterfalls  esakal
टूरिझम

Jamboti Waterfalls : धबधब्याजवळील पार्टी सरकारी कर्मचाऱ्यांच्या चांगलीच आली अंगलट; आठ जणांविरुध्द गुन्हा दाखल

खानापूर तालुक्यातील धबधबे पर्यटकांना करतात आकर्षित

सकाळ डिजिटल टीम

बेळगाव : निर्बंध लागू असताना ही नियमांचे उल्लंघन करीत जांबोटीजवळील (Jamboti Falls) भटवाडा येथील धबधब्याजवळ केलेली पार्टी हेस्कॉमच्या (Hescom) कर्मचाऱ्यांचा चांगलीच अंगलट आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांसह विरोधात गुन्हा दाखल करण्याची सूचना त्यांनी केली आहे. त्यानुसार आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. खानापूर तालुक्यातील धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात. मात्र, पर्यटनासाठी आलेले तरूण आणि तरूणी हुल्लडबाजी करत असल्याने आणि अपघाताच्या घटना घडत असल्याने तालुक्यातील विविध धबधब्यांवर जाण्यास वन खात्याने निर्बंध घातले आहेत.

नियमांचे उल्लंघन करून धबधब्यावर पोहोचल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला होता. तरीही रविवारी हेस्कॉमचे कर्मचारी व इतर लोक भटवाडा परिसरात एका ठिकाणी पार्टीचे आयोजन केले होते. मद्य प्राशन करून त्यांची हुल्लडबाजी सुरू होती. त्यामुळे स्थानिकांनी याची माहिती वन खात्याच्या अधिकाऱ्यांना दिली.

त्यानंतर वन खात्याचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले व त्यांनी पार्टी करण्यासाठी आणलेले साहित्य जप्त केले. तसेच नियमाचे उल्लंघन केल्याबाबत कारवाई करणार असल्याची माहिती देताच इस्कॉनच्या कर्मचाऱ्यांनी आम्ही अधिकारी आहोत, असे सांगत उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर वन खात्याने चार जणांविरोधात वाइल्ड लाईफ कायद्याच्या सातव्या कलमांतर्गत जांबोटी विभागीय वन खात्याच्या कार्यालयात गुन्हा नोंदवला होता.

तर इतर चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला नव्हता. मात्र हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांवर तक्रार दाखल केली नव्हती. मात्र निर्बंधित वनक्षेत्रात पार्टी केल्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पार्टीसाठी आलेल्या वाहनावर हेस्कॉम असे लिहिल्याचे व्हिडिओमधून स्पष्टपणे दिसून आले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी या प्रकरणाची दखल घेत वन खात्याच्या अधिकाऱ्यांना इतर चौघासोबत हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांवरील गुन्हा दाखल करण्याची सूचना वन खात्याच्या अधिकाऱ्यांना केली आहे.

वेगवेगळ्या मार्गाने धबधब्यापर्यंत

धबधब्यांवर पर्यटक येऊ नये, यासाठी अनेक ठिकाणी चेक पोस्ट उभारले आहे. तरीही वेगवेगळ्या मार्गाने अनेकजण धबधब्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात. तसेच आपण अधिकारी आहोत किंवा अधिकाऱ्यांची ओळख सांगत चेक पोस्ट वरून पुढे जाण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे चेक पोस्टवर कडक तपासणी करणे आवश्यक आहे असे मत व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT