Chandoli Tourism
Chandoli Tourism esakal
टूरिझम

Chandoli Tourism : चांदोली राष्ट्रीय उद्यान पर्यटकांसाठी खुले; तब्बल 3440 पर्यटकांनी लुटला पर्यटनाचा आनंद

शिवाजीराव चौगुले

चांदोली पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना पास देण्याची व्यवस्था जाधववाडी येथील वन्यजीव विभागाच्या नाक्यावर केली आहे.

शिराळा : चांदोली राष्ट्रीय उद्यान (Chandoli National Park) पर्यटकांसाठी (Tourists) १५ ऑक्टोबरपासून खुले झाले. दिवाळी सुटीत अनेक पर्यटकांनी चांदोली धरण, अभयारण्य, गुढे पाचगणी पवनचक्की पठार पाहण्यासाठी पसंती दिली. शालेय सहली सुरू झाल्याने १५ ऑक्टोबर ते ३१ जानेवारीपर्यंत शालेय विद्यार्थ्यांसह अन्य प्रवासी अशा ३ हजार ४४० पर्यटकांनी पर्यटनाचा (Chandoli Tourism) आनंद लुटला.

झोळंबी सडा पाहण्यासाठी २ किलोमीटर, तर चांदोली धरणाचा (Chandoli Dam) दूरवर पसरलेला पाणीसाठा पाहण्यासाठी जनीच्या आंब्यापासून ३ किलोमीटर पाऊलवाट आहे. हा पाऊलवाटेचा थरारही अनुभवला. गतवर्षी मेमध्ये झालेल्या वन्यजीव गणनेत बिबट्यासह १५ वन्य प्रजातींचे दर्शन निसर्गप्रेमींना घडले. त्यात बिबट्या, गवा, सांबर, रानडुक्कर, ससा, पिसोरा, भेकर, अस्वल, वानर, सायाळ, मुंगुस, मोर, रानकोंबडी, शेकरू, उदमांजर व रात्री पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी ३०८ प्राणी आल्याची नोंद झाली आहे.

चांदोली पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना पास देण्याची व्यवस्था जाधववाडी येथील वन्यजीव विभागाच्या नाक्यावर केली आहे. ओळखीसाठी आधार कार्ड, वाहन परवाना, मतदान ओळखपत्र यांपैकी एका पुराव्याची गरज आहे. खासगी बस असेल तर प्रत्येकाचे आधार कार्ड किंवा ओळखीचा अन्य पुरावा असणे गरजेचे आहे. शालेय सहलीसाठी शाळेचे पत्र आवश्यक आहे.

साडेतीन महिन्यांतील पर्यटक

  • प्रौढ व्यक्ती -२३३४

  • लहान मुले सहल -११०६

  • सहलींची संख्या -९

  • खासगी वाहने -३२१

पर्यटन शुल्क

  • बारा वर्षांखालील मुले - प्रत्येकी ५० रुपये

  • प्रौढ व्यक्ती -१०० रुपये

  • गाईड शुल्क -२५० रुपये

  • वाहन प्रवेश- लहान १००, बस १५०

  • छोटा कॅमेरा -५०, मोठा १००

  • वन्यजीव विभागाचे वाहन असल्यास - प्रत्येक मुलांसाठी २०० रुपये (प्रवेश शुल्क ५०, बसशुल्क १००, गाईड ५०). प्रौढ व्यक्ती २५० रुपये (प्रवेश शुल्क १००, बस शुल्क १००, गाईड ५०).

सहलीसाठी ५० ते ७५ टक्के सूट

पर्यटनासाठी आलेल्या शिराळा तालुक्यातील शालेय सहलीसाठी ७५, तर सांगली जिल्ह्यातील शालेय सहलीला ५० टक्के सूट देण्यात आली आहे. जिल्ह्याबाहेरील सहलीसाठी सूट नाही.

पर्यटन गुरुवारी बंद

दीपावली सुटीत पर्यटकांची संख्या अधिक होती. आता मर्यादित असली तरी पुन्हा उन्हाळ्याच्या सुटीत वाढ होईल. दर गुरुवारी पर्यटन बंद असते. त्यामुळे कोणालाही आत सोडले जात नाही. सकाळी सहा ते दुपारी तीनपर्यंत पास दिले जातात. सायंकाळी सहानंतर पर्यटन बंद होते. त्यामुळे पर्यटकांनी इकडे येताना वेळांची खात्री करून प्रवासाचे नियोजन करावे, असे मणदूरचे वनपाल काशिलिंग वादरे यांनी सांगितले.

...इथे हे पाहाल

चांदोली ते झोळंबी हा येण्या-जाण्याचा ३२ किलोमीटरचा मार्ग आहे. दरम्यान, पर्यटकांना विविध वनस्पती, फुले, पाखरे, पक्षी, प्राणी पाहावयास मिळतील. दरम्यान, अनेक ठिकाणी निरीक्षण मनोरे आहेत. त्यावरून चांदोलीचे निसर्गसौंदर्य पाहता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT