narsobawadi temple history esakal
टूरिझम

Datta Jayanti 2024 : आदिलशाहने बांधलेल्या नरसोबावाडीच्या दत्तमंदिराला कळस का नाही?

Nrusinhawadi Datta Mandir History: फक्त नरसोबावाडीचे हे मंदिरच नाही तर दोन गावेही आदिलशहाने दिली भेट

Pooja Karande-Kadam

Datta Jayanti 2024 :

कोल्हापूरच्या पवित्र भूमीवर अनेक देवी देवतांचे पदस्पर्श झाले आहेत. त्यामूळे कोल्हापूर जिल्ह्यात अनेक पवित्र तिर्थस्थान निर्माण झाली आहेत. त्यापैकी एक म्हणजे कोल्हापूरातील शिरोळ तालूक्यात असलेले श्री क्षेत्र नृसिंहवाडी होय.

दत्तात्रेयांचा दुसरा अवतार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नृसिंहसरस्वती स्वामींनी आपल्या तीर्थाटनात नृसिंहवाडीत वास्तव्य करून ही भूमी पानव केली आहे. या नृसिंहवाडीला दत्तमाहात्म्याचे अधिष्ठान लाभले आहे. त्यामूळेच आज ही वाडी दत्त महाराजांची राजधानी म्हणून म्हणून ओळखली जाते. (Datta Jayanti)

नरसोबाच्या वाडीतील घुमट असलेले मंदिर बादशहा आदीलशहाने बांधले आहे, असे सांगितले जाते. याबद्दल नृसिहवाडीतील जाणकार नागरीकांकडून सांगण्यात येते की, या नरसोबाच्या मंदिराला कळस नाही. त्याचे एक खास कारण आहे.

विजापूरचा राजा आदिलशहाच्या मुलगी अंध होती. त्याकाळात श्री दत्त महाराजांची महती आदिलशहाच्या कानावर गेली. वाडीतील दत्तस्थान पवित्र आणि जागृत आहे असेही त्याला समजले.

आदिलशहा मुस्लिम धर्माचे असूनदेखील आपल्या मुलीसाठी काहीही करायला तयार होते. आपल्या मुलीसाठी आदिलशहा दर्शनासाठी या तीर्थक्षेत्री आला आणि त्याने दत्त महाराजांकडे त्यांच्या मूलीची दृष्टी परत मागितली. त्या नदीकाठी असलेल्या वनात पूर्वी केवळ श्रींच्या पादुका होत्या. ज्यावेळी त्या पादुकांवर आदीलशहाच्या मूलीने मस्तक ठेवले तेव्हा तिची दृष्टी परत मिळाली.

त्यामूळे खूश होऊन आदिलशहाने मंदिराचे बांधकाम मशिदीसारखे करून दिले. त्यामुळे या मंदिराला कळस नाही तर तिथे गोल घुमट आहे.  एवढेच नाही तर मंदिरासमोर असलेले  औरवाड आणि गौरवाड ही गावेही त्याने मंदिरासाठी दिली. आजही ती गावे मंदिरासाठी राखीव असून तिथे मंदिराची अधिकृत जमिन आहे.

नरसोबाच्या वाडीला नृसिंह सरस्वतींच्या पादुका आहेत. इतर मंदिरात असते तशी दत्त महाराजांची मूर्ती या मंदिरात नाही. इथे असलेल्या दत्त पादुकांची दररोज महापूजा होते. दुध, दही, तूप, मध साखर या पवित्र जिन्नसांचे पादुकांना दररोज स्नान घालण्यात येते. त्यानंतर फुलांनी अत्यंत सुरेख अशी सजावट करून त्यावर शाल पांघरली जाते. ही महापूजा भाविकांना दूर बसून पाहता येते.दत्तप्रभूंचे दुसरे अवतार म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा नृसिंहसरस्वतींच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्राला दत्तभक्तांमध्ये दत्तप्रभूंची राजधानी म्हणून स्थान आहे.

वाडितल्या या मंदिराचा कळस घुमटासारखा आहे

या मंदिरात पहाटे तीनपासून ते रात्रौ दहा वाजेपर्यंत दत्तभक्तीचा जागर येथे सुरू असतो. काकड आरती होते. पंचामृत अभिषेक, महापूजा, पवमान पठन, धूपदीप आरती, दत्तगजरात होणारा पालखी सोहळा आणि शेजारती असा नित्यक्रम असतो.

या मंदिराबाबतची आख्यायिका

 १३७८ मध्ये कारंजा येथे नृसिंहसरस्वतींचा जन्म झाला. १३८८ मध्ये त्यांनी संन्यास दीक्षा घेतल्यानंतर ते तीर्थाटनास निघाले. त्यादरम्यान १४२१ साली त्यांचा मुक्काम औंदुबरी क्षेत्री होता. तर १४२२ मध्ये कृष्णा पंचगंगा संगमानजीकच्या नृसिहवाडी गावात होता. नृसिंहसरस्वतींनी येथे तब्बल बारा वर्षे तपश्चर्या केली.

या पवित्र संगमस्थळी तपसाधना केल्यानंतर १४३४ मध्ये त्यांनी येथे औदुंबर वृक्षातळी मनोहर पादुका आणि अन्नपूर्णा जान्हवीची स्थापना केली आणि आपण येथे वास करू अशी ग्वाही भक्तजनांना दिली व गाणगापुरी प्रस्थान केले. नृसिंहसरस्वतींच्या पावन वास्तव्यामुळेच या क्षेत्राला नृसिंहवाटिका म्हणून ओळखले जाऊ लागले. हीच आजची नृसिंहवाडी अथवा नरसोबाची वाडी होय.

प्रसिद्ध आहे दक्षिणद्वार सोहळा

कृष्णा पंचगंगेच्या तिरावर असलेल्या या मंदिरात महापुराचे पाणी पादुकांना स्पर्श करते, तेव्हा त्या प्रचंड वेगवान पाण्याच्या प्रवाहात दक्षिणद्वाराचं पुण्य घेण्यासाठी भाविक मोठय़ा संख्येने येतात. मंदिरात पाणी शिरले तरी पुराच्या पाण्यातून जात सारे नित्य सोपस्कार पार पाडले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT