thattekad forest
thattekad forest Sakal
टूरिझम

मुक्काम पोस्ट थत्तेकड

अवतरण टीम

थत्तेकडचे जंगल अप्रतिम आहे व थोडेसे परिश्रम घेतल्यास त्यात विविध दुर्मिळ प्रजातींचे पक्षी दिसू शकतात. अनेक प्रकारची दुर्मिळ घुबडे येथे आहेत.

- डॉ. सुधीर गायकवाड इनामदार

केरळमधील थत्तेकड म्हणजे पक्षीमित्रांची पंढरीच. येथे लापणात बसून समोरील फांदीवर येऊन बसणाऱ्या पक्ष्यांना आपल्या कॅमेऱ्यात टिपण्याची सोय आहे. त्यामुळे ज्यांना चालण्याचा कंटाळा व फारसे श्रम न घेता पक्ष्यांची छान छायाचित्रे हवीत त्यांच्यासाठी थत्तेकड उत्तम ठिकाण आहे. येथील लापणात विविध ३५-४० प्रकारचे पक्षी सहज दिसतात. त्यामुळे थत्तेकड हे पक्ष्यांची छायाचित्रे टिपणाऱ्या छायाचित्रकारांचे आवडीचे ठिकाण आहे.

थत्तेकडचे जंगल अप्रतिम आहे व थोडेसे परिश्रम घेतल्यास त्यात विविध दुर्मिळ प्रजातींचे पक्षी दिसू शकतात. अनेक प्रकारची दुर्मिळ घुबडे येथे आहेत. रात्रीची जंगल भ्रमंती आवडत असेल तर थत्तेकडला रात्री जंगलात भटकताना अनेक दुर्मिळ पशू-पक्षी दिसू शकतात. त्यामुळे जेव्हा जेव्हा थत्तेकडला जाण्याचा प्रसंग येतो, तेव्हा तिथे रात्री आम्ही जंगलात फिरतो. येथे मोठ्या कानाचा रातवा, वन मानव (लॉरिस), उंदीरतोंड्या हरिण, काही दुर्मिळ घुबडे आम्ही छायाचित्रित केली आहेत.

थत्तेकडचा २०१६ ला चार दिवसांचा दौरा होता. पहिल्या दिवशी केवळ लापणात बसून फोटोग्राफी केल्यावर दुसऱ्या दिवशी जंगलात फिरून मलबार ट्रोगॉन (मलबारी कर्णा) शोधण्याचे ठरले. हा अतिशय सुंदर, परंतु लाजरा पक्षी. कायम फांद्यांच्या आड सावलीत लपून बसणारा. त्यामुळे दृष्टीस पडणे कठीण. त्या सकाळी आम्हाला ट्रोगॉन काही दिसला नाही; परंतु अजून दोन दिवस शिल्लक असल्यामुळे चिंता नव्हती. त्या दिवशी संध्याकाळी अजून एका वेगळ्या लापणात बसून फोटोग्राफी केली व दुसऱ्या दिवशी सकाळी सलीम अली अभयारण्य, थत्तेकड येथे पोहोचून तिथे ट्रोगॉन शोधण्याचे ठरवले. थोडा वेळ आमच्या गाईडसोबत फिरल्यानंतर त्याने आम्हाला एका पाणवठ्याशेजारी थांबवून स्वतः एकटा शोध घेण्यास गेला. आम्ही त्या पाणवठ्यातील काही पक्ष्यांचे छायाचित्रण करू लागलो. इतक्यात लगेचच आमचा गाईड धनेश धावतच आला आणि पटकन चला म्हणाला. त्याच्या मागे ट्रायपॉडवर लावलेला कॅमेरा घेऊन आम्ही अक्षरशः धावतच सुटलो. तीन-चार मिनिटे धावल्यावर त्याने उजवीकडे बोट दाखवले. तिथे उंच व मोठी जाड खोडे असलेली झाडे होती. त्यातील एका खोडाकडे त्याने पाहण्यास सांगितले; परंतु तिथे काहीच दिसत नव्हते. कारण जे काही होते ते त्या जाड खोडाच्या मागच्या बाजूस गेले होते. टक टक टक टक असा मोठा आवाज मात्र येत होता. ते झाड अवघ्या २०-२५ फुटांवर असल्यामुळे आवाज स्पष्ट व मोठा होता. हा नक्कीच कुठला तरी सुतार पक्षी हे आम्ही जाणले. ‘व्हाईट बेलिड वूडपेकर’ (पांढऱ्या पोटाचा सुतारपक्षी) असे धनेश म्हणाला आणि त्याचवेळी तो पक्षी सरकत सरकत पुढच्या बाजूस आला. आपली मजबूत चोच त्या झाडाच्या खोडावर आपटून खोडावर असणारे कीटक टिपण्यात गुंग होता आणि असे करताना टक टक टक टक असा येणारा आवाज आम्ही आमच्या कानात साठवून ठेवत होतो.

भारतात आढळणाऱ्या ३४ प्रकारच्या सुतारपक्ष्यांमध्ये हा दोन नंबरचा मोठा. या सुतार पक्ष्यांची गंमत अशी की त्याच्या चोचीत वात नाड्या (नर्व्हस) नसतात. त्यामुळे चोचीला संवेदना किंवा वेदना होत नाहीत. हे पक्षी जोरजोरात खोडांवर चोचीने टोचे मारू शकतात.

आमचा आमच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. एक अत्यंत दुर्मिळ सुतार पक्षी आमच्यासमोर अगदी थोड्याच अंतरावर होता. हा भारताच्या पूर्व व दक्षिण-पश्चिम घाटातच दिसू शकतो. ४८-४९ सेंमी आकाराचा हा पक्षी संपूर्ण ब्लॅक असतो; मात्र पोटाकडचा भाग व्हाईट असतो. डोके व गालाकडचा भाग लाल भडक असतो. दिसला तर लगेच लक्ष वेधून घेतो.

तो आपल्याच नादात खोडावर वर खाली सरकून टोचे मारत होता व तीच संधी साधून आम्ही मात्र त्याचे मनसोक्त निरीक्षण, तसेच छायाचित्रण व व्हिडिओ शुटींग केले. १०-१२ मिनिटे आम्हाला छायाचित्रणाची संधी मिळाली. इतक्यात काही लोक मोठमोठ्याने बोलत तिथून जाऊ लागले व त्या आवाजाने त्याची तंद्री भंग पावली व तो भुर्रकन उडून जंगलात अदृश्य झाला. ते अविस्मरणीय क्षण कॅमेऱ्यात टिपून आम्हीदेखील ट्रोगॉनच्या शोधात पुढे निघालो.

थत्तेकडमध्ये असे अनेक पक्षी खुणावत असतात. येथील सफर निसर्गप्रेमींना आश्‍चर्यचकित करणारा आनंद देऊन जाणारे असते. कधी अचानक कुठला पक्षी दिसेल आणि त्या प्रवासाच्या संधीचे साेने होईल, हे सांगता येत नाही. येथे असे अनेक पक्षी-प्राणी दिसतात आणि आपल्यालाच धक्का देऊन थक्क करतात. तसाच ‘व्हाईट बेलिड वूडपेकर’ आम्हाला दिसला आणि त्याची फोटोग्राफी करताना अपार आनंद देऊन गेला.

sudhir_gaikwad03@yahoo.co.in

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT