Owl Sakal
टूरिझम

व्याघ्र प्रकल्पातील दोन रात्री

कोयना-चांदोली अभयारण्यात रात्रीची भटकंती करणे म्हणजे कुठल्या वेळी कुठले वन्यजीव समोर येतील आणि आश्‍चर्यचकित करतील याचा नेम नसतो.

अवतरण टीम

कोयना-चांदोली अभयारण्यात रात्रीची भटकंती करणे म्हणजे कुठल्या वेळी कुठले वन्यजीव समोर येतील आणि आश्‍चर्यचकित करतील याचा नेम नसतो.

- डॉ. सुधीर गायकवाड इनामदार

कोयना-चांदोली अभयारण्यात रात्रीची भटकंती करणे म्हणजे कुठल्या वेळी कुठले वन्यजीव समोर येतील आणि आश्‍चर्यचकित करतील याचा नेम नसतो. हाच अनुभव घेण्यासाठी आम्ही कोयना गाठले आणि अनेक थरारक अनुभवांचे साक्षीदार झालो.

उत्साही वन्यजीव अभ्यासकाला नवीन व अपरिचित जंगल भ्रमण करण्यात जो आनंद मिळतो, त्याला तोड नाही. आम्हीही याला अपवाद नाही. अपरिचित अरण्ये फिरून त्यातील वन्यजीवांचे छायाचित्रण करणे हा आमचा आवडता छंद. त्यातही सह्याद्रीचे डोंगर व खोरे पादाक्रांत करणे फार कठीण. इतिहासात जावळीच्या खोऱ्याबद्दल वाचले होते. तो परिसर फिरून वन्यजीव छायाचित्रण करावे, असे अनेक दिवसांपासून वाटत होते.

चांदोली व कोयना मिळून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प होतो. दोन्ही अभयारण्ये अतिशय घनदाट व दुर्लक्षित. त्यामुळेच अपरिचित. आताशा कुठे तिथे काही तरुण वन्यजीव मार्गदर्शक तयार होत आहेत. तीन महिने माहिती मिळवली. विकास माने, संग्राम कांबळे व त्यांच्या टीममधील सागर जाधव, नरेश शेलार व स्वानंद पाटील हे तरुण जणू व्रत घेतल्यासारखेच कोयना अभयारण्य व चांदोली अभयारण्य पिंजून काढत असतात. तेथील वन्यजीवांची नोंद ठेवतात. विकासासोबत चर्चा करून दौऱ्याची आखणी केली व जाण्याचे आम्ही निश्चित केले.

रात्री आराम बसने सकाळी ७ ला कोयनानगरला पोहोचलो तेव्हा संग्राम व विकास आम्हाला न्यायला गाड्या घेऊन हजर होते. अर्ध्या तासात तयार होऊन नाश्ता केला व तिथून आमच्या मॅरेथॉन सत्राला सुरुवात झाली. अतिशय गर्द व घनदाट जंगल. जवळजवळ निर्मनुष्य. दुपारी जेवायला व त्यानंतर एक तास आराम केल्यानंतर पुन्हा रात्री १२ वाजेपर्यंत जंगल पालथे घातले. अनेक पक्ष्यांचे छायाचित्रण केले. संध्याकाळी एका पाणवठ्याजवळ आम्ही सर्व गुपचूप पक्ष्यांची वाट पाहत बसलो असताना अचानक समोर एक मोठे अस्वल आले. अगदी १५ मीटर अंतरावर. यापूर्वी अनेकदा जंगलात अस्वले पाहिली होती; पण ती सर्व जिप्सीमध्ये बसून. जमिनीवर बसून इतक्या जवळ मोठे अस्वल प्रथमच पाहत होतो. ते अस्वलही आम्हा सर्वांना तिथे पाहून बुचकळ्यात पडले व आमचे निरीक्षण करू लागले. ती संधी साधून आम्ही त्याची छायाचित्रे टिपून घेतली. इतक्यात त्या अस्वलाने स्वतःला सावरले व आम्हाला तिथून निघून जाण्याकरिता चेतावणीवजा इशाराच दिला. दोनतीन वेळा हवेत मान उंचावून हुंकार दिला. तो इशारा समजून काही अघटित होण्यापूर्वीच तिथून पळ काढला व गाडीत जाऊन बसलो.

एक रोमहर्षक अनुभव घेऊन आम्ही तिथून बाहेर पडलो. लांब जाऊन एका मोकळ्या माळरानावर सोबत आणलेला चहा व नाश्ता घेतला. थोडा वेळ चर्चा करून व रात्रीच्या फोटोग्राफीची कॅमेरा सेटिंग्स सर्वांना समजावून काळोख होताच घुबडांच्या छायाचित्रणास निघालो. येथे पांढुरके शिंगळा घुबड (पॅलिड स्कोप्स आऊल), प्राच्य शिंगळा घुबड (ओरिएण्टल स्कोप्स आऊल), कंठेरी शिंगळा घुबड (इंडियन स्कोप्स आऊल), हुमा घुबड (इंडियन ईगल आऊल) व तपकिरी वन घुबड (ब्राऊन वूड आऊल) दिसू शकते असे संग्राम म्हणाला. जंगलाच्या सीमेवर असलेल्या फार्महाऊस परिसरात आम्ही पोहोचलो व तपकिरी वन घुबडाचा कॉल वाजवला. केवळ दोन मिनिटेच. तोच ते घुबड आमच्या समोरच्या झाडाच्या फांदीवर येऊन बसले. ५०-५५ सें.मी.चे हे मोठे आणि आकर्षक तपकिरी रंगाचे घुबड. गडद तपकिरी डोळ्यांभोवती पांढुरके वलय. पुढील अर्धा तास एका झाडावरून जवळच्याच दुसऱ्या झाडावर असे करत करत आम्हाला छायाचित्रणाची अप्रतिम संधी दिली. तिथून पुढे तासभर रातव्यांचे छायाचित्रण करून रात्री १२.३० वाजता मुक्कामी पोहोचलो.

थकल्यामुळे लगेच झोप लागली. दुसऱ्या दिवशीचे सत्र मात्र प्रचंड मोठे होते. सकाळी ८ वाजता निघालो ते रात्री २.३० वाजता परतलो. सलग १७-१८ तास कोयनेचे अभयारण्य पालथे घातले. विकास, संग्राम व त्यांच्या साथीदारांनी न थकता न कंटाळता व्रत घेतल्यासारखे आम्हाला ते अभयारण्य व त्यातील पक्षी दाखवले. त्या रात्री कंठेरी शिंगळा घुबडाचे केलेले छायाचित्रण कधीही विसरणे शक्य नाही. त्याने दिलेल्या विविध पोजमुळे कोयनेत आल्याचे समाधान झाले.

तीन दिवसांच्या त्या छोटेखानी दौऱ्यात आम्ही ६६ पक्ष्यांची छायाचित्रे टिपली. त्यासोबत अस्वल, रानमांजर, गवा, कांडेचोर, शेकरू, ससा असे अनेक वन्यजीवांचे छायाचित्रण/ निरीक्षण करून आमच्या कोयना-चांदोली अभयारण्याच्या दौऱ्याची सांगता केली.

sudhir_gaikwad03@yahoo.co.in

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT