Eagle Sakal
टूरिझम

शाही गरूडाची नजाकत

पक्षी छायाचित्रणाला सुरुवात करणाऱ्या प्रत्येकाला आपल्या जवळच्या वनराईव्यतिरिक्त काही ठराविक वन प्रदेशांमध्ये जाण्याची इच्छा असते.

अवतरण टीम

पक्षी छायाचित्रणाला सुरुवात करणाऱ्या प्रत्येकाला आपल्या जवळच्या वनराईव्यतिरिक्त काही ठराविक वन प्रदेशांमध्ये जाण्याची इच्छा असते.

- डॉ. सुधीर गायकवाड इनामदार

‘लिटिल रण ऑफ कच्छ’ला अनेक हिवाळी स्थलांतरित पक्ष्यांचे छायाचित्रण करत फिरताना दूर एका बांधावर एक शिकारी पक्षी दिसला शाही गरुड (ईस्टर्न इंपिरिअल ईगल). आम्ही सतर्क झालो. लांबूनच त्याची काही छायाचित्रे घेतली. हळूहळू पुढे जाऊन छायाचित्रे टिपत गेलो. गरुड थोडा पाठमोरा झाला, ती संधी साधून आम्ही त्याच्या जवळ पोहचलो. त्याने आमच्याकडे नजर वळवायच्या आधीच थांबलो. तो बिथरणार नाही याची काळजी घेतली. त्याने नजर वळवली. तीच संधी साधली आणि जमिनीवर आडवे पडून शाही गरुडाला कॅमेऱ्यात कैद केले.

पक्षी छायाचित्रणाला सुरुवात करणाऱ्या प्रत्येकाला आपल्या जवळच्या वनराईव्यतिरिक्त काही ठराविक वन प्रदेशांमध्ये जाण्याची इच्छा असते. सुरुवातीच्या काळात काही ठराविक वन प्रदेशच माहीत असतात व त्यापैकी एक म्हणजे ‘लिटिल रण ऑफ कच्छ’ हा प्रदेश जवळजवळ सर्वच नव्याने वन्यजीव छायाचित्रण करणाऱ्या छायाचित्रकारांना माहीत असतो. गुजरातच्या कच्छ जिल्ह्याचा हा एक भाग आहे. हा विस्तीर्ण प्रदेश १९७३ मध्ये अभयारण्य म्हणून घोषित झाला, तिथे असणाऱ्या वन गाढव यांच्या संरक्षणार्थ व सवंर्धनार्थ. मैलोन् मैल पसरलेल्या सपाट, क्षितिजाला भिडणाऱ्या पांढुरक्या जमिनी अगदी ऑक्टोबरपर्यंत खाडीच्या खाऱ्या पाण्यात भिजलेल्या असतात. त्यानंतर जसे पाणी ओसरू लागते, तसे या जमिनी सुकून कोरड्या होतात. त्यावर लवणाचा पांढरा थर साचतो. या संपूर्ण प्रदेशात बाभूळ, खैर आदीची खुरटी झुडुपे व त्यांच्या आडोशाला राहणारे विविध पक्षी, कीटक, सरपटणाऱ्या जीवांसह कोल्हा, तरस इत्यादी स्तनधारी वन्यजीव दिसू शकतात. येथे पक्षी निरीक्षण करणे विशेषतः शिकारी पक्षी दुर्बिणीतून पाहणे म्हणजे एक पर्वणीच असते. या शिकारी पक्ष्यांचा रुबाब काही औरच असतो. सावजावर अचानक झडप घालून त्यांची शिकार करणे व शिकार केलेले भक्ष्य आपल्या मजबूत पंजांमध्ये पकडून उडून जाणे, हे सर्वच चित्तथरारक असते.

‘लिटिल रण ऑफ कच्छ’मध्ये बाज, घार, गरुड, गिधाड, भोवत्या, ससाणा असे अनेक प्रजातींचे शिकारी पक्षी (रॅपटर्स) पाहता येतात. अशा या विस्तीर्ण पसरलेल्या सपाट प्रदेशात फिरताना सोबत दुर्बीण असली तर हे शिकारी पक्षी खूप लांबूनही दिसू शकतात; मात्र त्यांचे छायाचित्र टिपण्याकरिता मोठे कसब लागते. कारण मोकळी जमीन व छोटी खुरटी झुडुपे, मोठ्या झाडांचा अभाव, त्यामुळे तुम्हाला लपायला आडोसा नसतो. हे पक्षी तुम्हाला दुरूनही पाहू शकतात. सतर्क होऊन उडून जातात.

२०११ ला प्रथमच या ‘लिटिल रण ऑफ कच्छ’ला जाण्याचा योग आला. त्यानंतर मात्र दरवर्षी २०१६ पर्यंत वर्षातून एकदोन वेळा सतत तेथे छायाचित्रणाकरिता जात राहिलो. आखूड कानाचे घुबड (शॉर्ट इयर्ड आऊल) हा येथे आढळणारा विशेष पक्षी. त्याच्या छायाचित्रणाकरिता वन्यजीवप्रेमी दूरदूरून येत असतात. हुब्बरा बस्टर्ड हा दुर्मिळ पक्षी हिवाळ्यात येथे काही दिवसांकरिता स्थलांतर करून येतो. या विस्तीर्ण प्रदेशात जिप्सीचालक मात्र कसे काय मार्गक्रमण करतात व त्यांना दिशा कळतात हे मला अजूनही न सुटलेले कोडे आहे. कारण येथे ठराविक असे रस्ते नसतात. केवळ मोकळ्या जमिनींवर जिप्सी चालवायची असते. २०१४ मध्ये हिवाळ्यात ‘लिटिल रण् ऑफ कच्छ’ला छायाचित्रणाकरिता ग्रुप घेऊन गेलो होतो. अनेक हिवाळी स्थलांतरित पक्ष्यांचे छायाचित्रण करत फिरताना दूरवर एका बांधावर एक शिकारी पक्षी दिसला. शाही गरुड (ईस्टर्न इंपिरिअल ईगल). आमचा चालक म्हणाला तसे आम्ही सतर्क झालो. लांबूनच त्याची काही छायाचित्रे टिपली. आमच्या फोटोग्राफी भाषेत त्याला रेकॉर्ड शॉट्स म्हणतात. थोडे पुढे जाऊ या, असे ड्राइव्हरला बोललो. थोडे पुढे जाऊन पुन्हा काही छायाचित्रे टिपली. अजून पुढे जाता येईल का याचा अंदाज घेतला. गरुड थोडा पाठमोरा झाला तशी संधी साधून आम्ही पुन्हा थोडे पुढे सरकलो. त्याने आमच्याकडे नजर वळवायच्या आधीच पुन्हा थांबलो. थोडे स्थिर व शांत राहून गरुड बिथरला नाही याची खात्री झाल्यावर पुन्हा काही छायाचित्रे टिपली. एव्हाना आम्ही बऱ्यापैकी त्याच्या जवळ पोहोचलो होतो. त्याने पुन्हा दुसरीकडे नजर वळवली. ती संधी आम्ही पुन्हा साधली व अजून थोडे पुढे सरलो. सर्वांना पटकन खाली उतरवून जिप्सीच्या आडोशाला राहायला सांगितले. त्यामुळे आम्ही त्या शाही गरुडाला दिसत नव्हतो. थोडे स्थिर झाल्यावर सर्वजण जमिनीवर आडवे पडून ग्राऊंड लेव्हलची छायाचित्रे टिपली. समाधानकारक छायाचित्र मिळाल्यानंतर आम्ही इतर पक्षी शोधायचा निर्णय घेतला.

मोकळ्या रानात पक्ष्यांची फोटोग्राफी कशी करावी, याचे प्रात्यक्षिक त्या दिवशी सर्वांनी शिकून घेतले. एका दुर्मिळ शिकारी पक्ष्याचे इतक्या जवळून छायाचित्र टिपण्याचा तो पहिलाच प्रसंग होता व त्यामुळे कायम स्मरणात राहिला.

sudhir_gaikwad03@yahoo.co.in

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT