kapshi black kite
kapshi black kite sakal
टूरिझम

जवाई धरण परिसरातील कापशी घार

अवतरण टीम

जवाई धरण परिसर अतिशय विलोभनीय होता. पाणवठ्याभोवती सर्वत्र फुललेली मोहरीची शेती व त्यांच्या कडेने अनेक पक्ष्यांचे थवे आम्ही टिपले.

- डॉ. सुधीर गायकवाड इनामदार

जवाई धरण परिसर अतिशय विलोभनीय होता. पाणवठ्याभोवती सर्वत्र फुललेली मोहरीची शेती व त्यांच्या कडेने अनेक पक्ष्यांचे थवे आम्ही टिपले. तिथेच एका झाडाच्या फांदीवर कापशी घार बसलेली दिसली. आमच्या हालचालीने सावध होऊन ती तिथून उडाली; पण पुढच्याच झाडावर जाऊन स्थिरावली. थोडे थांबून, झाडांच्या आडोशाने आम्ही पुन्हा पुढे सरसावलो आणि तिची मनसोक्त छायाचित्रे टिपून आम्ही रिसॉर्टवर परतलो.

राजस्थानातील जवाई बांध हा प्रदेश खरेतर बिबट्यांकरिता प्रसिद्ध. अरावली पर्वत रांगांचाच हा भाग. उंच खडकाळ आणि ओके-बोके डोंगर. मध्येच खुरटी झुडपे. आसपास बऱ्याचशा छोट्या छोट्या गुहा आणि यांतील काही गुहांमध्ये असलेले बिबट्यांचे वास्तव्य. डोंगराच्या पायथ्याशी असलेली जमीन, मात्र जवाईच्या बांधामुळे हिरवीगार व सुपीक.

आम्ही डिसेंबरमध्ये गेलो तेव्हा वाटेच्या दुतर्फा मोहरीची (सरसो) शेती फुलली होती. त्यामुळे निसर्गाने हिरव्या गालिच्यावर पिवळ्या रंगाची जणू उधळण केल्याचा भास होत होता. त्या परिसरात ३५ बिबटे असल्याचे समजले. आम्ही जाण्याचे ठरवले तेव्हा या मोहरीच्या फुलण्याचे अजिबात माहीत नव्हते; परंतु या काळात स्थलांतरित पक्षी येथे दिसण्याची शक्यता असल्याची खात्री होती. उदयपूरला संध्याकाळी विमानाने पोहोचून तिथून साडेतीन तासांवर असलेल्या जवाईला पोहोचायला रात्र झाली. वाटेत असलेल्या अनेक ढाब्यांपैकी एके ठिकाणी नाश्ता केला. सकाळी साडे पाचला सफारी सुरू झाली. प्रचंड थंडी होती. तापमान फक्त तीन डिग्री. रस्त्याच्या दोन्ही बाजूस टॉर्च मारत ड्रायव्हर बिबट्याचा शोध घेत होता. थोड्याच वेळात ओबडधोबड रस्ता सोडून त्याने चक्क उभ्या डोंगरावर जिप्सी हाकण्यास सुरुवात केली. केवळ अशक्यप्राय वाटणारी अशी ती सफर आम्ही अनुभवत होतो.

काही वेळातच आम्ही माथ्यावर पोहोचलो. बिबट्याचे दर्शन काही घडले नव्हते. साडेआठ वाजता एक सपाट भाग पाहून आम्ही जिप्सी थांबवली व सोबत आणलेला चहा व नाश्ता केला. एव्हाना चांगलेच उजाडले होते. सफर पुन्हा सुरू झाली. एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर असे भ्रमण सुरू होते. वाटेत खुरट्या झुडपांवर काही स्थलांतरित पक्षी दिसत होते. येथेच एका छोट्या झाडाच्या फांदीवर आम्हाला पर्शियन विटियर टिपता आला. आता बिबट्या दिसण्याची वेळ संपली आहे, आता ते गुहेत जाऊन बसले असतील, म्हणून आपण जवाई धरण परिसरात पक्षी बघायला जाऊ म्हणत ड्रायव्हर तीव्र उतार घेत जिप्सी खाली घेऊ लागला. आम्ही जीव मुठीत धरून तो थरार अनुभवत होतो.

जवाई धरण परिसर अतिशय विलोभनीय होता. पाणवठ्याभोवती सर्वत्र फुललेली मोहरीची शेती व त्यांच्या कडेने व पाणवठ्यात मोठा पाणकावळा, तिरंदाज, काळा करकोचा, चक्रवाक, भुवई बदक, लाल डोक्याचा ससाणा असे अनेक पक्षी दिसले. त्यांचे तसेच मोहरीच्या पार्श्वभूमीवर छायाचित्रे टिपता टिपता सकाळचे सत्र संपुष्टात आले. परतताना एका लांब असलेल्या झाडाच्या फांदीवर कापशी घार बसलेली दिसली. ही घार यापूर्वी मी अनेकदा अनेक ठिकाणी पाहिली होती; पण दरखेपेस तारेवर बसलेली. येथे मात्र झाडाच्या फांदीवर होती. ही संधी दवडायची नाही असे ठरवले. जिप्सीतून उतरून पायीच निघालो. थोडे पुढे गेल्यावर फोटो काढले. पुन्हा पुढे सरसावलो. पुन्हा छायाचित्रे टिपली. घार मात्र अजूनही आपल्याच शिकारीत मग्न होती. त्यामुळे आमच्याकडे लक्ष नव्हते. आम्ही सर्व पुन्हा थोडे पुढे सरसावलो. आमच्या हालचालीने सावध होऊन ती तिथून उडाली; पण पुढच्याच झाडावर जाऊन स्थिरावली. थोडे थांबून, झाडांच्या आडोशाने आम्ही पुन्हा पुढे सरसावलो. आत्ता आम्हाला अँगलदेखील छान मिळाला होता. तिची मनसोक्त छायाचित्रे टिपून आम्ही रिसॉर्टवर परतलो. संध्याकाळच्या सफारीची तयारी करायची होती. त्या संध्याकाळी व दुसऱ्या दिवशीदेखील बिबट्यांचे दर्शन झाले. छायाचित्रणही अप्रतिम झाले.

दौऱ्याची सांगता करताना एक गम्मत आठवली. काही वर्षांपूर्वी पहिल्यांदाच जेव्हा या कापशी घारीचे छायाचित्र कच्छ येथे टिपले व कम्प्युटरवर पाहिले तेव्हा तिचे लाल डोळे पाहून आम्हाला आमचे सेटिंग चुकले असे वाटले व ‘रेड आय रिडक्शन’ करून डोळे सफेद करून फेसबुकवर पोस्ट केले. माझा मित्र डॉ. श्रीश क्षीरसागरने ते पाहिले व सांगितले, ‘‘अरे फोटो छान आहे; पण डोळा सफेद कसा? याचा डोळा लाल असतो.’’ ती घटना आठवली की अजूनही हसू येते व टिपलेल्या छायाचित्रांचा बारकाईने अभ्यास करण्याची तेव्हापासून सवयच लावून घेतली.

sudhir_gaikwad03@yahoo.co.in

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal News : जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांना मोठा दिलासा! अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर

Rohit Sharma IPL 2024 : सुट्टी नाही! मेगा लिलावासाठी रोहितला खेळावेच लागणार... माजी विकेटकिपरने कोणते संकेत दिले?

Alyad Palyad: ‘अल्याड पल्याड’ चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार सिद्धयोगी साधूची भूमिका; लूकनं वेधलं लक्ष

ICICI Bank: NRI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; UPI संदर्भात नवीन घोषणा, जाणून घ्या प्रक्रिया

Latest Marathi News Update: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना दोन महिन्यांसाठी अंतरिम वैद्यकीय जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT