Nalsarovar Tapas Bird Sakal
टूरिझम

नलसरोवरातला तापस

गुजरातमधील अहमदाबादच्या दक्षिणेस ६० किमीवर सानंदजवळ १२१ चौ. किमीचे पक्षीविविधतेने परिपूर्ण असलेले पाणथळ अभयारण्य म्हणजेच नलसरोवर.

डॉ.सुधीर गायकवाड इनामदार

गुजरातमधील अहमदाबादच्या दक्षिणेस ६० किमीवर सानंदजवळ १२१ चौ. किमीचे पक्षीविविधतेने परिपूर्ण असलेले पाणथळ अभयारण्य म्हणजेच नलसरोवर.

साडेनऊला आम्ही नलसरोवरला पोहोचलो. तिथे काही ओळखीचे मित्र भेटले. ‘बिटर्न’ कुठे दिसतोय विचारल्यावर आता होता, नुकताच उडाला म्हणाले. आम्ही हिरमुसलो, पण आमच्यासोबतच्या अकबरने धीर दिला. तिथेच थांबून वाट पाहायचे ठरवले. १५-२० मिनिटांत अकबरने आम्हाला विरुद्ध बाजूला बोलावले. समोर बिटर्न एका फांदीवर होता. आमची चाहूल लागताच हा तापस प्रजातीचा पक्षी वेळूच्या बनात शिरला. शांतपणे काही काळ वाट पाहिल्यावर तो हळूच बाहेर आला आणि अर्धा तास आम्ही या दुर्मिळ पक्ष्याचे मनसोक्त छायाचित्रण केले. त्यानंतर अकबर आम्हाला सारस क्रौन्च दाखवायला शेतात घेऊन गेला...

गुजरातमधील अहमदाबादच्या दक्षिणेस ६० किमीवर सानंदजवळ १२१ चौ. किमीचे पक्षीविविधतेने परिपूर्ण असलेले पाणथळ अभयारण्य म्हणजेच नलसरोवर. किमान २५० प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद येथे करण्यात आलेली आहे. येथील सूर्योदय व सूर्यास्त पाहणे आणि छायाचित्रित करणे एक अविस्मरणीय अनुभव असतो. गुडघाभर पाण्यातून छोट्या होड्यांमध्ये बसून वेळूच्या वनांतून विहार करणे व वेळूमध्ये लपलेले पक्षी कॅमेऱ्यात टिपणे असा अनुभव क्वचितच इतरत्र कुठे मिळेल. येथे वर्षभर विविध प्रजातींचे पक्षी पाहावयास मिळतात. पावसाळा संपता संपता मार्गस्थ स्थलांतरित पक्षी (पॅसेज मायग्रंट्स) व हिवाळ्यात हजारोंच्या संख्येने स्थलांतरित पक्षी येथे मुक्काम करतात. त्याव्यतिरिक्त अनेकदा येथे वाट चुकलेले स्थलांतरित पक्षीही दिसतात.

२०११ मध्ये प्रथमच नलसरोवरला जाण्याचा योग आला. त्या वेळी खरे तर ‘लिटिल रण ऑफ कच्छ’ला गेलो होतो व तिथला मुक्काम आवरल्यावर परत येताना एका सत्राकरिता नलसरोवरला गेलो. तिथे पोहोचल्यावर अनेक मार्गदर्शक धावत आमच्याकडे आले; आम्ही त्यापैकी अकबरसोबत जाणे पसंत केले. अकबरचा प्रामाणिकपणा, मेहनत करण्याची तयारी व बोलण्याची अदब यामुळे लगेच त्याच्यावर विश्वास बसला व मैत्रीसुद्धा झाली. तेव्हापासून नियमितपणे नलसरोवर येथे काही नवीन पक्षी दिसला, तर हमखास फोन करून सांगत असतो. त्याच्याकडून मिळणाऱ्या माहितीमुळेच नलसरोवरचा लळा लागला आणि सलग सहा वर्षे ग्रुप घेऊन अकबरसोबत नलसरोवर पिंजून काढले.

सूर्योदयाच्या वेळेस बोटीतून नलसरोवरात प्रवेश करून दुपारपर्यंत पक्षी छायाचित्रण करायचे. त्यानंतर सरोवरातच एखाद्या टापूवर बसून काठियावाडी पद्धतीचे जेवण करणे व त्यानंतर तिथे अंथरलेल्या चटईवर मोकळ्या आभाळाखाली आराम करणे यासारखे दुसरे सुख नाही. दुपारनंतर अकबर आम्हाला मोकळ्या शेतात किंवा पाणवठ्यावर घेऊन जातो. तिथे वेगळ्या प्रजातींचे पक्षी दिसतात. संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत येथे छायाचित्रण करून सूर्यास्ताला पुन्हा सरोवर गाठायचे. कारण नलसरोवरइतका अप्रतिम सूर्यास्त क्वचितच इतरत्र पाहायला मिळतो.

२०१९ च्या ऑगस्ट महिन्यात संध्याकाळी दवाखान्यात पेशंट तपासताना अचानक अकबरचा फोन आला. म्हणाला, ‘‘सर छोटा तापस (लिटिल बिटर्न), सारस क्रौन्च (सारस क्रेन) दिसतोय.’’ खरे तर जून ते सप्टेंबर या कालावधीत आम्ही डॉक्टर दवाखान्यात व्यग्र असतो, पण छोटा तापस हा अत्यंत दुर्मिळ पक्षी काश्मीरला सहसा दिसतो. इतरत्र खात्रीपूर्वक कुठे दिसेल ते सांगता येणार नाही. त्यामुळे नलसरोवर गाठायचे ठरवले. सतत काही दिवस नियमितपणे अकबरला फोन करून, शनिवारी रात्री निघून रविवारी सकाळी पोहोचायचे, दिवसभर फोटोग्राफी करायची व रविवारी रात्रीच्या ट्रेनने परतायचे ठरवले. सोबत माझे मित्र डॉ. सुधीर देवरूखकर व प्राणी शास्त्रज्ञ डॉ. चेतन पोंक्षे येण्यास तयार झाले.

पहाटेच अहमदाबादला पोहोचलो. आधीच बुक केलेल्या हॉटेलवर उतरून पटकन तयार होऊन नलसरोवरच्या दिशेने निघालो. वाटेत अकबरला फोन करून तापस दिसतोय का याची खात्री केली. कारण गेले काही दिवस तिथे पक्षीप्रेमींनी प्रचंड गर्दी केली होती. त्यात एखादा तरी नवखा माणूस निघतो, जो नकळत पक्ष्याच्या खूप जवळ जायचा प्रयत्न करतो व त्यामुळे पक्षी उडून जातो. लवकर या, रविवार असल्यामुळे पहाटेपासूनच खूप गर्दी आहे, असे अकबर म्हणाला. आमच्या मनात धाकधूक होती ती इतक्या लांबचा प्रवास करून आल्यानंतर तापस दिसेल की नाही याची.

साडेनऊला अकबरने बोलावलेल्या ठिकाणी पोहोचलो. सकाळचे सत्र आटोपून बरीच मंडळी निघून गेली होती. काही ओळखीचे लोक, काही मित्रदेखील तिथे भेटले. बिटर्न कुठे दिसतोय विचारल्यावर आत्ता होता, नुकताच उडाला म्हणाले. आम्ही हिरमुसलो. अकबर मात्र खात्रीपूर्वक दिसेल म्हणाला. आम्ही तिथेच थांबून वाट पाहायचे ठरवले. साधारणतः १५-२० मिनिटांत अकबरने आम्हाला ज्या बाजूला आम्ही उभे होतो त्याच्या विरुद्ध बाजूला बोलावले. समोर बिटर्न एका फांदीवर होता. आमची चाहूल लागताच वेळूच्या बनात शिरला. तापस प्रजातींचे सर्वच पक्षी अत्यंत लाजरे असतात. शांतपणे काही काळ वाट पाहिल्यावर मात्र महाशय हळूच बाहेर आले. त्यानंतर जवळजवळ अर्धा तास आम्ही त्या अत्यंत दुर्मिळ पक्ष्याचे मनसोक्त छायाचित्रण केले. आमची परतीची ट्रेन रात्रीची होती, त्यामुळे आमच्या हातात बराच वेळ होता. अकबर आम्हाला सारस क्रौन्च दाखवायला शेतात घेऊन गेला. हिरव्यागार शेताच्या पार्श्वभूमीवर सारसांचे आम्हाला अप्रतिम छायाचित्रण करता आले. लाल मनोली (रेड मुनिया) व इतरही काही पक्ष्यांचे छायाचित्रण करून संध्याकाळी अकबर व नलसरोवरचा निरोप घेतला.

sudhir_gaikwad03@yahoo.co.in

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT