Owl Sakal
टूरिझम

ध्यानस्थ मासेमार घुबड!

ताडोबाचे नाव काढताच अंगावर रोमांच उभे राहतात. इतक्यांदा ताडोबाला जाऊन आलोय तरीही प्रत्येक वेळेस जाताना पहिल्यांदाच जात असतानाची जी उत्सुकता असते, तशीच दरवेळी वाटते.

अवतरण टीम

ताडोबाचे नाव काढताच अंगावर रोमांच उभे राहतात. इतक्यांदा ताडोबाला जाऊन आलोय तरीही प्रत्येक वेळेस जाताना पहिल्यांदाच जात असतानाची जी उत्सुकता असते, तशीच दरवेळी वाटते.

- डॉ. सुधीर गायकवाड इनामदार

ताडोबा येथील देवडोहमधील वाघीण छोट्या पिल्लांसह पाणवठ्यात दिसल्याची खबर कानावर होती. या भागात आम्ही वाघिणीला शोधत असतानाही काहीच दिसत नव्हते. आमचे गाईड अचानक ‘आऊल’ असे दबक्या आवाजात म्हणाले. पाणवठ्याच्या पलीकडील बाजूस बांबूच्या वनात एका फांदीवर ते शांतपणे डोळे मिटून ध्यानस्थ बसले होते. जणू काही तपश्चर्येला बसल्यासारखे...

ताडोबाचे नाव काढताच अंगावर रोमांच उभे राहतात. इतक्यांदा ताडोबाला जाऊन आलोय तरीही प्रत्येक वेळेस जाताना पहिल्यांदाच जात असतानाची जी उत्सुकता असते, तशीच दरवेळी वाटते. ताडोबाचे असंख्य अनुभव, आठवणी गाठीशी असल्या तरीही दर खेपेस ताडोबात काहीतरी नवीन पाहावयास मिळते. त्याचमुळे ताडोबाला जायला आम्ही सदैव तयार असतो.

ताडोबा म्हटले की माया, सोनम, लारा, गीता, मोना मटकासुर, देवडोह, बजरंग, छोटी तारा हे आठवतात. ही नावे कुठल्या नट-नट्यांची नाहीत, तर ही आहेत ताडोबातील वाघांची. प्रत्येकाचे प्रभाग ठरलेले. त्यामुळे कुठल्या भागात गेल्यावर कुठला वाघ दिसेल याचा जरी अंदाज असला, तरी तो वाघ तिथे दिसेल का याची उत्सुकता असते. ताडोबा म्हणजे जणू एक राज्यच, ज्याचा अधिपती वाघ आहे. बिबटे, हरणं, चौशिंगे, रान मांजर, सांभर, नीलगायी, असंख्य विविध पक्षी आणि ताडोबा म्हणजे अनिल भाऊ तिवाडे, गणेश जेंगटे. या सर्वांनाच भेटण्याची इच्छा आणि उत्सुकता वाघांना पाहण्याइतकीच असते.

अशीच २०१६ च्या उन्हाळ्यात ताडोबाची सफर ठरली. ग्रुप तयार झाला. एक महिना आधीपासूनच कुठले कुठले वाघ नियमित दिसत आहेत, त्याची माहिती घेऊ लागलो. ग्रुपमध्ये चर्चा होऊ लागली. माया दिसत आहे, सोनम दिसत आहे, छोटी तारा दिसत आहे, गब्बर दिसत आहे, या बातम्यांनी उत्साह शिगेला पोहोचला. हा हा म्हणता जायचा दिवस उजाडला. पहाटेच्या विमानाने नागपूर व तिथून ताडोबा मोहर्लीला पोहोचायला दुपारचे १२ वाजले. एम.टी.डी.सी.चे कार्यकुशल व्यवस्थापक महादेव हिरवे हे मित्रच होते. कामात तत्पर, त्यांनी पटापट राहण्याची व्यवस्था केली. जेवल्यावर दुपारची सफारी केली. छोटी तारा व माया या वाघिणींचे दर्शन झाले. सर्वच खुश होते. अनिलभाऊ, पिल्ले कुठे दिसत आहेत का? असे विचारताच उद्या देवडोहला प्रयत्न करू, असे ते म्हणाले.

आम्ही गेलो त्या आधीच्या आठवड्यात देवडोहमध्ये वास्तव्याला असणारी देवडोह वाघीण अगदी छोट्या पिल्लांसह पाणवठ्यात दिसली होती. ऐन उन्हाळ्यातही गर्द झाडी असलेला हा भाग, जिप्सीतून नुसता फेरफटका मारला तरीही रोमहर्षक अनुभव येतो. येथे पायवाटेवरून थोडे खाली नैसर्गिक पाणवठा आहे. अनेकदा मे महिन्यातसुद्धा येथे पाणी असते. हा भाग मुख्य रस्त्यापासून बराच आत असल्यामुळे फारसे पर्यटक येथे येत नाहीत. आता मात्र येथे फारच थोडे पाणी शिल्लक होते.

अनिलभाऊ व गणेशाने वाकून पाहिले व अंदाज घेतला; परंतु वाघिणीची काहीच चिन्हे दिसत नव्हती. त्यामुळे जिप्सी वळवून दुसऱ्या बाजूला आम्ही पाहू लागलो. येथेही काहीच दिसत नव्हते. अचानक आऊल असे अनिलभाऊ दबक्या आवाजात म्हणाले. पाणवठ्याच्या पलीकडील बाजूस बांबूच्या वनात एका फांदीवर हे शांतपणे डोळे मिटून ध्यानस्त बसले होते. जणू काही तपश्चर्येला बसल्यासारखे. त्याला पाहून ‘वाईस ओल्ड आऊल’ हे विशेषण आठवले व ते किती तंतोतंत खरे आहे, हेही जाणवले. मोठाल्या आकाराचे ते आकर्षक मासेमार घुबड होते. तसे ताडोबात पंचधारा भागातही एक मासेमार घुबड वर्षानुवर्षे सर्वांना परिचित आहेच, ते अनेकदा तेथील पाणवठ्यात जमिनीवर बसलेले दिसते. कधी फांद्यांच्या दाटीवाटीत दिसते; परंतु बहुतांश वेळा अंधाऱ्या जागीच. हे देवडोहतील घुबड मात्र छान उजेडात बसले होते व तेही खालच्या फांदीवर. आमची कुजबुज सुरू होती; पण त्याचा परिणाम त्या घुबडावर तिळमात्र होत नव्हता. थोड्या वेळाने शांतता झाल्यावर मात्र त्याने हळूच एक डोळा उघडून आमच्याकडे पाहिले. आम्ही त्याची छायाचित्रे टिपण्यात मग्न होतो. नंतर तो दोन्ही डोळे उघडून आमचे निरीक्षण करू लागला. २०-२५ इंचाचे हे मोठे घुबड. पंख पसरल्यावर चक्क ५०-५५ इंच इतका आकार होतो. कानांवर पिसांचा झुपका असतो, त्यामुळे दोन मोठे कान असल्याचा भास होतो. सहसा हे इतर घुबडांसारखे पटकन उडून जात नाही व प्रथमदर्शनी पाहिल्यावर ध्यानस्थ व्यक्ती असल्याचा भास नक्की होतो.

पाऊण तास त्याची छायाचित्रे टिपून आम्ही पुढे निघायचा निर्णय घेतला. सफारी संपायला अजून अवकाश होता. पुढे जामुनझोरा पाणवठ्यात रान गवे, चौशिंगा यांचे दर्शन घडले. त्यांची छायाचित्रे टिपली व रिसॉर्टच्या मार्गी रवाना झालो. इतकी वर्षे झाली तरी आजही देवडोह परिसरात ते क्षण व छायाचित्रित केलेले ते मासेमार घुबड समोर बसल्याचा भास होत आहे. वन्यजीव छायाचित्रणादरम्यान काही क्षण असे कायम लक्षात राहतात.

sudhir_gaikwad03@yahoo.co.in

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT