From Festive Feasts to Fading Memories: A Rural Summer Tale esakal
टूरिझम

Summer Holidays : उन्हाळ्यातील रसाळी जेवणाच्या उरल्या फक्त आठवणी आता अंगतपंगत नाहीच; धावपळीच्या जीवनात लोप पावत चालली प्रथा

Summer : आता अंगतपंगत नाहीच; धावपळीच्या जीवनात लोप पावत चालली प्रथा

सकाळ डिजिटल टीम

Holidays : उन्हाळ्याची चाहूल लागली, की बाळगोपाळांना सुट्यांची मेजवानी असतेच. मामाच्या गावाता जाण्याची उत्सुकता, उन्हाळाभर रसाळीच्या भोजनावळीच्या पंगती उठविण्याची हौस. मित्रमंडळी पाहुण्यांना आवडीने आमंत्रण देऊन रस व पुरणपोळीच्या जेवणाच्या पंगती उठविण्याची परंपरा असायची. पण, आता उन्हाळ्यातील रसाळीच्या जेवणाच्या फक्त आठवणीच उरल्या आहेत.

सध्याच्या धावपळीच्या जीवनात रसाळीच्या जेवणाच्या परंपरेसोबत आत्मीयतेची गोडीसुद्धा लोप पावत चालली आहे. पूर्वी उन्हाळा आला की, ग्रामीण भागांत मित्रमंडळी पाहुण्यांना रसाळीची अर्थात आमरसाच्या जेवणाची आग्रहाची आमंत्रणे दिली जायची. पुरणपोळी व रसाचा आस्वाद घेतला जायचा.

अलीकडे धावपळीच्या जीवनात ही आमंत्रणे दुर्मिळ झाल्याचे चित्र आहे, असे म्हणण्यापेक्षा अलीकडच्या काळात ही प्रथाच लोप पावत चालल्याचे चित्र दिसून येत आहे. ग्रामीण भागात आंबे उतरण्याच्या अर्थात काढणीच्या काळात मित्रमंडळीसह पाहुण्यांना निमंत्रणे मिळायची, शहरातूनही मंडळी गावात दाखल व्हायची.

यानिमिताने सर्व जण एकत्र येऊन गप्पा मारायचे, सुख-दुःख सांगितली जायची, परंतु अलीकडे धावपळीच्या काळात कुणाला वेळ नसल्याने अशी आमंत्रणे दुर्मिळ झाली आहेत. आता अनेकांना रसाळी हा शब्दच माहीत नसेल, इतकी ही प्रथा दुर्मिळ झाली आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांत सर्वांनी एकत्र येऊन आमरसाचे जेवण करणे म्हणजे रसाळी, सोबत कुरडया, पापड्या आणि अनेक पदार्थांवर हसत-हसत आनंदी वातावरणात ताव मारणे होय. काका, मामा, मावशी, आत्या, त्यांची मुले, वडिलांचे मित्र, स्नेही, शेजारी यांच्याकडे उन्हाळा संपेपर्यंत रसाची जेवणे अगदी थाटामाटात व्हायची.

आपुलकीने जाणे व्हायचे, सुख-दुःखे सहज सांगितली जायची, मदत केली जायची, मदत मिळायची, विचारांची देवाणघेवाण व्हायची, पण आता फक्त आठवणीच उरल्या आहेत.

गावरान आंबे अन् विविध पदार्थ

जुन्या काळात सर्वांकडे गावरान आंबेच असायचे. ग्रामीण भागात रसाची फक्त चव घेताच कोणाच्या शेतातील आंबा आहे, हे खात्रीने सांगितले जायचे. दुपार झाली की, कुरडया, पापड व इतर अनेक पदार्थांनी भरलेले ताट असायचे, आग्रहाने जेऊ घातले जायचे. आजच्या बफेमध्ये हा आग्रह दिसणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नव्या मतदार नोंदणीसाठी महत्त्वाची बातमी! आता नोंदणीवेळी जुळवावी लागणार २४ वर्षांपूर्वीची वंशावळ; प्रशासनाला शोध सोलापुरातील ६ लाख मतदारांचा, वाचा...

Riddhi Thakkar: ‘लेट्स एक्सप्लोर बस्तर...’ २० बाइकरचा ग्रुप, सफरीचं स्वप्न ठरलं अखेरचं, अचानक काळाचा घाला; मुंबईच्या रिद्धीचा दुर्दैवी अंत

Khutbav Accident : नियतीचा खेळ, मृत्यूतही साधला मेळ; रक्षाबंधनापूर्वी बहीण-भावावर काळाचा घाला, पारगावात हळहळ

Talegaon Dabhade News : रस्ता नसल्याने ज्येष्ठाला उपचारासाठी झोळीतून नेण्याची वेळ

मोठी बातमी! मराठा समाजातील १.८१ लाख तरुण रोजगार मागणारे नव्हे रोजगार देणारे; ७ वर्षांत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून १८७४ कोटी

SCROLL FOR NEXT