Shirala Flower Season esakal
टूरिझम

Shirala : निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य! कास पठारासारखीच डोंगर पठारावर बहरली रानफुलं; माळरानावर पसरला विविधरंगी फुलांचा सडा

माळरानावर विविधरंगी फुलांचा सडा पसरला

बाजीराव घोडे-पाटील

पर्यटक निसर्गप्रेमींसाठी ही पर्वणी असून अनेक हौशी निसर्गप्रेमी या माळरानांना भेट देत आहेत.

कोकरूड : कास पठाराप्रमाणेच (Kaas Plateau) सध्या शिराळा (Shirala) पश्चिम भागात सह्याद्रीच्या डोंगर पठारावर विविधरंगी रानफुले बहरली असून अनेक हौशी निसर्गप्रेमी येथे भेट देत आहेत. सध्या या भागात ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे.

या फुलांचा फुलण्याचा हंगाम सुरू असून माळरानावर विविधरंगी फुलांचा सडा पसरला आहे. त्यामुळे परिसर अत्यंत नयनरम्य व आल्हाददायक दिसू लागला आहे. निसर्ग आणि पर्यावरणाच्या विविधतेने शिराळा तालुक्यातील जंगल समृद्ध आहे.

चांदोली धरण, चांदोली राष्ट्रीय उद्यान, गुढे पाचगणी पठार, झोळंबी पठार, उदगिरी पठार, कोकरूड येथील गवळोबा पठार, विविध प्रकारच्या वनस्पती, लता-वेलींनी घनदाट असलेले जंगल पावसाळ्यात हिरव्या, पिवळ्या, लाल, गुलाबी रंगांनी बहरून गेले आहे.

तेरडा, कुरडू, मखमल, सोनकी, नीलिमा, जांभळी, मंजिरी, गेंद आदी फुले माळरानावर मुबलक बहरत असून अतिशय विलोभनीय असे दृश्य डोंगर-पठारावर पाहायला मिळत आहे. पिवळे, हिरवे, लाल, केशरी, निळे असे विविध रंग माळरानावर व झाडी-झुडपात दिसून येत आहेत. पर्यटक निसर्गप्रेमींसाठी ही पर्वणी असून अनेक हौशी निसर्गप्रेमी या माळरानांना भेट देत आहेत. शिराळा तालुक्यातील जंगलात बहरलेला हा निसर्ग ठेवा कॅमेऱ्‍यात टिपून घेण्यासाठी अनेक निसर्गप्रेमी माळरानांना आवर्जून भेट देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT