Tourism news
Tourism news 
टूरिझम

हनिमूनसाठी शिमल्याचा प्लॅन करताय?, मग ही बातमी वाचा, माहिती पडेल उपयोगी

सकाळ डिजिटल टीम

तुम्ही नवविवाहित असाल आणि एखाद्या हिल स्टेशनवर हनिमून साजरा करण्याचा विचार करत असाल तर, ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. तुमच्यासाठी शिमला हे सर्वोत्तम ठिकाण आहे. साधारणत: या काही दिवसांत तुम्ही शिमल्याला जाऊ शकता. कारण हे एक रोमॅंटिक ठिकाण आहे. एकमेकांना वेळ देण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी हे एक परफेक्ट ठिकाण आहे.

या दिवसांत तुम्ही पार्टनरसोबत शिमला सहलीचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी आहे. जरी शिमला काही लोकांसाठी महाग आणि काहींसाठी स्वस्त आहे. तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये शिमला सहलीची योजना आखायची असेल, तर आम्ही तुम्हाला काही मार्ग सांगत आहोत, ज्यामुळे तुमचा प्रवास आणि बजेट अनुकूल राहिल.

ऋतू लक्षात ठेवा

एका जोडप्यासाठी शिमल्याच्या प्रवासाची किंमत अनेक घटकांवर अवलंबून असते. ऋतूनुसार तुम्ही हे प्लॅनिंग करु शकता. तुम्ही जर गर्दीच्या हंगामात शिमल्याला जाणार असाल तर ही सहल खूप महाग होण्याची शक्यता असते. याउलट तुम्ही ऑफ सीझनमध्ये या ठिकाणी गेला तर पर्यटकांची संख्या कमी असते. त्यामुळे प्रत्येक वस्तूंच्या किंमतही कमी असतात. जुलै-ऑगस्टमध्ये गेलात तर यावेळी स्थानिक वाहतूक आणि हॉटेल्स खूप स्वस्त असतात.

दिल्ली ते शिमला बसने प्रवास

दिल्ली ते शिमला या एकेरी प्रवासासाठी तुम्हाला सुमारे 900 रुपये मोजावे लागतील. तुम्ही नवी दिल्ली आणि चंदीगड मार्गे शिमल्याला जाऊ शकता. पर्यटक इथून टॅक्सी, बस किंवा ट्रेनने शिमलाला जाऊ शकतात. प्रवासाचा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही शिमलासाठी लक्झरी बसनेही आधीच बुक करून ठेऊ शकता.

दिल्ली ते शिमला रेल्वेने प्रवास

कालका आणि शिमला दरम्यान एक लोकप्रिय टॉय ट्रेन धावते. शिमला हे दिल्लीशी ट्रेनने चांगले जोडलेले आहे. परंतु तुम्हाला चंदीगडच्या कालका स्टेशनवर कनेक्टिंग ट्रेनची वाट पहावी लागेल. कारण या मार्गांवर नॅरोगेज ट्रॅक आणि टॉय ट्रेन्स धावतात. एका अंदाजानुसार, दिल्ली ते कालका या 2 व्यक्तींसाठी ट्रेनचे भाडे सुमारे 1800 रुपये आहे.

खाण्यापिण्याचे बजेट

दिल्लीच्या तुलनेत शिमल्यात खाणेपिणे थोडे महाग आहे. हिल टाऊनमधील इंडियन कॉफी हाऊस आणि बरिस्ता येथे कॉफी आणि चहाचा आनंद घेता येतो. मॉल रोडवर एजी ऑफिसजवळ तारा नावाचं छोटंसं हॉटेल आहे, तिथे गरमागरम आणि आंबट सूप मिळतं. येथे दोन लोकांच्या खाण्यापिण्याचा खर्च दररोज 2000 रुपये येतो.

शिमल्यात साइट सीनची किंमत

कुफरी, माशोबरा आणि नालदेहरासह स्थानिक स्थळे एका छोट्या कारने कव्हर करण्यासाठी दररोज सरासरी खर्च सुमारे 1800-2000 रुपये असेल.

शिमल्यात खरेदीसाठी झालेला खर्च

  • प्रवास खर्च - 3600 रु

  • निवास (2 रात्री + 3 दिवस) - 7570 रुपये

  • खाण्यापिण्याचा खर्च (3 दिवस 2 लोक) - 3000 रुपये

  • साइट सीनची किंमत - 2000 रुपये

  • साहसी उपक्रमांवर खर्च - 2500 रुपये

  • एकूण किंमत - 18, 670 रुपये

एका अंदाजानुसार, जोडप्यांसाठी शिमला प्रवासाचा एकूण खर्च 18, 670 पर्यंत येऊ शकतो. आशा आहे की हे तुम्हाला शिमल्याच्या बजेट ट्रिपच्या नियोजनात खूप मदत करेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priyanka Gandhi: "पंतप्रधान प्रचाराला आले की, लहान मुलासारखे रडतात," प्रियंका गांधींचा नंदुरबार हल्लाबोल

Latest Marathi News Live Update: संभाजीनगरमध्ये ठाकरे गट आणि मनसे आमनेसामने; दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी

Kareena Kapoor Khan: मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने करीना कपूरला बजावली नोटीस, नेमकं प्रकरण काय?

GT vs CSK : शतक ठोकल्यानंतर BCCIने गिलवर घेतली मोठी ॲक्शन! एका चुकीमुळे झाले लाखोंचे नुकसान

Akash Gorkha : पुण्याच्या आकाशची स्वप्नवत कामगिरी ; युवा आशियाई मुष्टियुद्ध,भारताची ४३ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT