Sindhudurg Amboli Ghat Deepak Kesarkar esakal
टूरिझम

Long Weekend: आंबोलीतील 'हे' चार नवे धबधबे पर्यटनासाठी होणार खुले; मंत्री केसरकरांच्या हस्ते आज उद्‌घाटन

तब्बल पाच नव्या धबधब्यांच्या सुशोभीकरणाचे काम घेतले हाती

सकाळ डिजिटल टीम

खुद्द पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते या धबधब्याचे उद्घाटन होणार होते. परंतु, त्यांचा दौरा रद्द झाला असला तरी मंत्री केसरकर यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे.

सावंतवाडी : आंबोली (Amboli Ghat) येथे नव्याने विकसित करण्यात आलेल्या बाहुबली धबधब्याचे (Bahubali Waterfall) आज (दि. १२) शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार आहे.

याबाबतची तयारी युद्धपातळीवर सुरू असून आंबोलीतील पर्यटन वाढावे, यासाठी तब्बल पाच नव्या धबधब्याचे सुशोभीकरणाचे काम हाती आले असून त्यापैकी चार धबधबे लवकरच पर्यटनासाठी खुले करण्यात येणार असल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले.

वर्षा पर्यटनासाठी आंबोली प्रसिद्ध आहे. मात्र, येथील पर्यटन आणखीन वाढावे यासाठी मंत्री केसरकर हे प्रयत्नशील होते. यासाठी त्यांनी पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून आंबोलीतील एकूण पाच धबधब्यांचे सुशोभीकरणाचे काम वन विभागाच्या माध्यमातून हाती घेण्यात आले आहे.

त्या ठिकाणी पायऱ्या बांधण्याबरोबरच रॅली व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आज यापैकी बाहुबली धबधब्याचे उद्घाटन श्री. केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. खुद्द पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते या धबधब्याचे उद्घाटन होणार होते. परंतु, त्यांचा दौरा रद्द झाला असला तरी मंत्री केसरकर यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे. मंत्री केसरकर यांनीच याबाबत माहिती दिली.

जिल्ह्यातील पर्यटन उद्योगाला मोठ्या प्रमाणावर चालना देऊन सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टीने राज्याच्या पर्यटन विभागाने गतीने प्रयत्न सुरू केले आहेत. मंत्री केसरकर यांनी एप्रिलमध्ये विविध शासकीय अधिकाऱ्यांसह सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्याचे हवाई सर्वेक्षण केले होते.

त्यामध्ये पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, संचालक डॉ. बी. एन. पाटील, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालक जोशी आदींचा समावेश होता. त्या सर्वेक्षणातून आंबोलीमधील या विविध पर्यटन प्रकल्पांची मांडणी करून त्याबाबत पाठपुरावा केला होता. त्याचेच फलित म्हणून या नवीन धबधब्याचे उद्घाटन आणि राज्याच्या पर्यटन विभागामार्फत १२ ते १६ ऑगस्ट दरम्यान ‘आंबोली वर्षा महोत्सवा’चे आयोजन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT