gujaratdhordo
gujaratdhordo  sakal
टूरिझम

Tourism News: गुजरातच्या या गावाला UNWTO कडून मिळाला 'बेस्ट टुरिझम व्हिलेज'चा पुरस्कार, वाचा खासियत

Aishwarya Musale

गुरुवार, 19 ऑक्टोबर रोजी, भारताच्या पर्यटन मंत्रालयाने ट्विटर पोस्टद्वारे घोषित केले की गुजरातच्या धोर्डो गावाला संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेने सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्काराने सन्मानित केले आहे. ही माहिती देताना पर्यटन मंत्रालयाने म्हटले आहे की, धोर्डो गावाला मिळालेला हा सन्मान त्याचे अनुकरणीय योगदान दर्शवतो, त्यामुळे या गावाशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊया.

धोर्डो गावाबद्दल खास गोष्टी

धोर्डो हे गाव गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात आहे. हे गाव कच्छच्या रणात वसलेले आहे, जे भारतातील सुंदर नैसर्गिक ठिकाणांपैकी एक आहे. दिवसा हे गाव सुंदर दिसतं पण रात्री इथलं दृश्य आणखीनच मनमोहक दिसतं. धोर्डो गाव आपल्या सौंदर्याने दरवर्षी लाखो पर्यटकांना आकर्षित करते. दरवर्षी या गावात वार्षिक रण उत्सवही आयोजित केला जातो.

धोर्डो वार्षिक रणोत्सव म्हणजे काय?

धोर्डो गाव वार्षिक रण उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. हा एक सांस्कृतिक उत्सव आहे जो प्रदेशातील पारंपारिक कला, संगीत, नृत्य आणि हस्तकला दर्शवतो. हा वार्षिक उत्सव आणि त्याचे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक दरवर्षी येतात.

या वार्षिक उत्सवादरम्यान, टूरिस्ट सांस्कृतिक कार्यक्रम, लोकनृत्य आणि संगीत, उंट सवारी, पारंपारिक हस्तकला आणि स्वादिष्ट पारंपारिक आणि स्थानिक पाककृतींचा आनंद घेतात.

दरवर्षी धोर्डो वार्षिक रणोत्सव ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होतो आणि फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत चालतो. सामान्य रण उत्सव फक्त तीन दिवस चालतो, धोर्डो येथे आयोजित रण उत्सव 100 पेक्षा जास्त दिवस चालतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar NCP : अरुणाचलमध्ये अजित पवारांचे तीन उमेदवार विजयी; राष्ट्रीय पक्ष होण्याच्या दिशेने वाटचाल

Exit Poll Result: खरंच ४०० पार! देशात यापूर्वी झालं होतं शक्य; कसं अन् कधी वाचा सविस्तर

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवालांनी केलं तिहार कारागृहात आत्‍मसमर्पण; म्हणाले, 'मी या हुकूमशाहीविरुद्ध...'

Gautam Gambhir: 'मला टीम इंडियाचा प्रशिक्षक व्हायला आवडेल, कारण...', अखेर गंभीरने मौन स्पष्टच सांगितलं

Fact Check: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधी बँकॉकला जाणार? बोर्डिंग पासचा व्हायरल झालेला फोटो 'Edited'

SCROLL FOR NEXT