प्रवास
प्रवास Sakal
टूरिझम

कसा असावा प्रवास?

देवयानी एम.

मी आजचा लेख हरिद्वार, उत्तराखंडमधून लिहीत आहे. हर की पौरी येथील गंगा नदीच्या घाटावर बसून हजारो भक्त गंगेची जगप्रसिद्ध आरती मनोभावे करताना दिसतात. घंटानाद, धूप-लोबान, रोषणाई, पुजाऱ्यांच्या हातात मोठमोठाले दिवे... मग ‘गंगा मैय्या की जय... पतितपावन गंगा मैय्या की जय...’ असा जयजयकार सर्वत्र ऐकू येतो. काही जण गंगेत न्हाऊन घेतात, काही पूजा करतात, काही नदीच्या प्रवाहात दिवे सोडतात. आजूबाजूला अनेक मंदिरं, झगमगती दुकानं, भगव्या कपड्यातील साधू आणि खळखळणारा गंगेचा प्रवाह! सर्वत्र जिवंतपणा! जसं एकदातरी आयुष्यात हिमालय पाहावा असं म्हणतात, तसं एकदातरी गंगा मातेचं दर्शन नक्की घ्यावं.

आपण टुरिस्ट म्हणून अनेक ठिकाणी जातो. जगात कुठेही गेलो तरी आपलं आतलं एक विश्व घेऊन जातो. कामाचे विचार, प्रॉब्लेम्स, घरच्या कटकटी, इतर प्रेशर्स आणि मुख्य म्हणजे फोन हे तर आपली पाठ कधीच सोडत नाहीत. मी पुण्याहून देहरादून आणि तिथून हरिद्वार अशी गेले. विमानात म्हणा किंवा टॅक्सीमध्ये ९० टक्के लोक अखंड फोनवर काहीतरी बघत होते, ऐकत होते, गेम्स खेळत किंवा बोलत होते. प्रवास म्हणजे कुठेतरी फक्त पोहोचणे असं नाही. प्रवासाच्या प्रक्रियेचं महत्त्वं आपण विसरतो!

तुमच्या रोजच्या ओळखीच्या आयुष्यापासून काही काळ तुम्ही लांब जाता तेव्हा तिथला अनुभव पूर्णपणे घेता का? रंगात रंग मिसळल्यासारखं जिथं जातो तिथलेच होऊन गेलो तर खरा त्या जागेचा अनुभव घेतला असं म्हणता येईल. ट्रिपला जायचं असेल तर आधी निघण्याची घाई, मग पोहोचण्याची घाई, मग तिथे साईट सिइंगसारखं एका जागेहून दुसऱ्याजागी जाण्याची घाई, फोटो काढण्याची घाई, मग परत येण्याची घाई! जिथे शरीराने आहोत तिथे मनाने आहोत का, हे अधूनमधून तपासूया. शाळेत उपस्थिती लावायचो म्हणजे आम्ही ‘present’ आहोत हे सांगायचो, पण आपण खरोखर ‘present’ मध्ये असतो का?

अनेक जण देवदर्शनासाठी मंदिरात, तीर्थक्षेत्री जातात, कोविड असूनही गणपती उत्सवात दगडूशेठ गणपतीला प्रचंड गर्दी. आनंद शोधायलाही आपण कुठे कुठे जातो, आपण कितीही लांब गेलो, देवदर्शनाला गेलो तरी जे हवं ते मिळालं असं कित्येकदा वाटत नाही. आपण जेव्हा स्वतःजवळ येऊ, पूर्णपणे 'present' मध्ये म्हणजे प्रत्येक क्षण स्वतःशी ‘connected’ राहू, तेव्हा मिळेल खरा आनंद आणि तिथे होईल खरं देव दर्शन.

ट्रॅव्हलिंग आपल्या सगळ्यांनाच आवडतं. पण प्रवास कसा असावा?... तर जो आतलाही प्रवास घडवेल असा!

नवीन प्रांताचा निसर्ग, तिथली संस्कृती, लहेजा, तिथला इतिहास, माणसे, हवा, पाणी, अन्न, त्या भूमीची स्पंदनं हे सगळं खरंतर आपल्याला स्वतःचा विसर पडणारं असतं. आपलं व्यक्तिमत्त्व लवचिक आणि तरल असलं की या सगळ्या गोष्टींचा पुरेपूर अनुभव घेता येऊ शकतो.

माणसाचा मेंदू प्रगत आहे, कारण तो अनेक प्रकारचे अनुभव घेऊ शकतो. बाह्य विश्वाचा अनुभव, आतल्या विश्वाचा अनुभव... ज्या ठिकाणी असाल तिथल्या कणाकणाचा अनुभव घ्या आणि कुठेही न जाता रोज थोडा वेळ

का होईना स्वतःच्या अस्तित्वाचा अनुभव घ्या!

अशाने बाहेरच्या आणि आतल्या अशा दोनही प्रवासाचा संपूर्ण आनंद मिळवता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

SCROLL FOR NEXT