Indian Railways Esakal
टूरिझम

Indian Railways: कमी पैशात प्रवासाची संधी, मिळणार मोफत जेवण आणि राहण्याची सुविधा

मध्य प्रदेश टूर पॅकेज असे या पॅकेज नाव आहे.

सकाळ डिजिटल टीम

IRCTC टूर पॅकेज: भारतीय रेल्वेने तुमच्यासाठी एक खास पॅकेज आणले आहे, या पॅकेज तुम्हाला मध्य प्रदेशातील काही खास पर्यटन ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. तुम्हीही जर का या टूरला जायचा विचार करत असाल तर आता जायचं, हे फिक्स करुन टाका, कारण हे टूर पॅकेज अगदी सामान्य माणसांला परवडेल इतकं स्वस्त आहे. या पॅकेज तुम्हाला अमरकंटक, जबलपूर आणि कान्हा नॅशनल पार्क इ. ठिकाणे पाहता येणार आहे.

या टूर विषयी IRCTC ने काय ट्विट केले आहे ?

IRCTC ने आपल्या अधिकृत ट्विटमध्ये लिहिले आहे की, आम्ही तुम्हाला मध्य प्रदेशचे सौंदर्य पाहण्याची संधी देत आहोत. यासाठी तुम्हाला प्रति व्यक्ती 15650 रुपये खर्च करावे लागतील.

https://www.irctctourism.com/pacakage_description?packageCode=WMR143

चला आता पॅकेज विषयी सविस्तर माहिती बघू या..

मध्यप्रदेश टूर पॅकेज असे या पॅकेज नाव आहे. हे पॅकेज 5 रात्री / 6 दिवस असे असणार आहे.

मुंबई - अमकंटक - कान्हा राष्ट्रीय उद्यान - जबलपूर - मुंबई असा या रेल्वेचा रूट असणार आहे, ही रेल्वे दर मंगळवारी असणार आहे.

तुम्ही कोणत्या ट्रेनने प्रवास करू शकता?

● मुंबईहून जबलपूरला जाण्यासाठी तुम्ही ट्रेन क्रमांक 12188 ने प्रवास करू शकता. त्याच वेळी, परतीसाठी तुम्हाला ट्रेन क्रमांक 12187 ने प्रवास करावा लागेल.

● मोठ्या व्यक्तींकरीता किती भाडे असेल?

या पॅकेजमध्ये तुम्हाला सिंगल ऑक्युपेंसीकरता प्रति व्यक्ती 33950 रुपये खर्च करावे लागतील. याशिवाय डबल ऑक्युपेसीकरता तुम्हाला प्रति व्यक्ती 19,850 रुपये खर्च करावे लागतील. त्याच वेळी, ट्रिपल ऑक्युपेसीकरताप्रति व्यक्ती 15650 रुपये खर्च केले जातील.
● लहान मुलांकरीता किती भाडे असणार आहे?

लहान मुलांच्या भाड्याबद्दल बोलायचे झाले तर चाइल्ड विथ बेडचे भाडे प्रति व्यक्ती 13650 रुपये आहे.
पॅकेजमध्ये काय समाविष्ट केले जाईल?या पॅकेजमध्ये तुम्हाला 3AC तिकीट मिळेल. यासोबतच रेल्वे स्थानकवर ट्रांसफर सुविधाही उपलब्ध होणार आहे. सोबतच तुम्हाला या पॅकेजमध्ये 3 ब्रेकफास्ट आणि 3 डिनरची सुविधा देखील मिळेल. आणि राहण्यासाठी अमरकंटक, कान्हा आणि जबलपूर येथे हॉटेल सुविधा देखील मिळणार आहेत.

या पॅकेजमध्ये काय काय सुविधा असणार आहे?

या पॅकेजमध्ये तुम्हाला 3AC तिकीट मिळेल. यासोबतच रेल्वे स्थानकवर ट्रांसफर सुविधाही उपलब्ध होणार आहे. सोबतच तुम्हाला या पॅकेजमध्ये 3 ब्रेकफास्ट आणि 3 डिनरची सुविधा देखील मिळेल. आणि राहण्यासाठी अमरकंटक, कान्हा आणि जबलपूर येथे हॉटेल सुविधा देखील मिळणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Revenue Court: महसूल न्यायालयाचे कामकाज मराठीतून, नवी 'एसओपी' लागू; प्रकरणांचा झटपट निपटारा होणार!

Nashik Drowning: ३ मुलं डोळ्यासमोर गटांगळ्या खायला लागली, आईने वाचवायला उडी मारली; बुडून चौघांचाही मृत्यू..

Mobile Recharge Hike : लवकरच मोबाईल रिचार्ज महाग होण्याची शक्यता, पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर दुसरा मोठा धक्का

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

मी सागरची गर्लफ्रेंड, हळदीच्या कार्यक्रमात राडा; ८ लाखांचा खर्च, लग्न मोडताच वधुची पोलिसात धाव, नवरदेवाला अटक

SCROLL FOR NEXT