Interesting Hotel  esakal
टूरिझम

Interesting Hotel : झोपलात तेव्हा एका देशात अन् बेडवरून खाली पडलात तर दुसऱ्या देशात, ही काय भानगड आहे?

हॉटेलचा बार स्वित्झर्लंडमध्ये आहे आणि बाथरूम फ्रान्समध्ये

Pooja Karande-Kadam

Interesting Hotel :

आपल्या जगात अनेक अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला आश्चर्यचकीत करतात. काही देशांच्या परंपरा आपल्याला बुचकळ्यात टाकतात. तर, काही देशांच्या सिमा आपल्याला काहीतरी नवं असल्याची जाणिव करून देतात.

आज आम्ही तुम्हाला अशा एका जागेची माहिती देणार आहोत. ज्याबद्दल तुम्ही कधीच ऐकले नसेल. समजा तुम्ही एका हॉटेलवर गेला आहात. तिथल्या रूममधील बेडवर झोपलात तेव्हा तुम्ही एका देशात होता अन् चुकून झोपेत बेडवरून खाली पडलात. तेव्हा तुम्ही दुसऱ्या देशात गेला असाल. होय, असं खरंच घडतं. ते ठिकाण कोणतं हे आपण जाणून घेऊयात.

हे हॉटेल स्वित्झर्लंडमध्ये आहे. हे हॉटेल मोकळ्या जागेत बांधले आहे. फ्रान्स आणि स्वित्झर्लंडच्या सीमेवर ला क्युअर भागात हे हॉटेल आहे. या हॉटेलचा एक भाग स्वित्झर्लंडमध्ये आहे आणि दुसरा फ्रान्समध्ये आहे, त्यामुळे या हॉटेलचा पत्ता देखील दोन आहे. स्वित्झर्लंडमधील लोकांना या हॉटेलमध्ये राहायचे असेल तर त्यांना स्वित्झर्लंडनुसार पत्ता शोधावा लागेल. फ्रान्सच्या लोकांचेही असेच आहे.

स्वित्झर्लंडमधील बार आणि फ्रान्समध्ये स्नानगृह

अर्बेझ हॉटेलची खासियत जाणून अनेकांना आश्चर्य वाटेल. या हॉटेलमधून फ्रान्स आणि स्वित्झर्लंडची बॉर्डर आहे. हॉटेलमध्ये प्रवेश करताच लोक एका देशातून दुसऱ्या देशात जातात. तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की या हॉटेलचा बार स्वित्झर्लंडमध्ये आहे आणि बाथरूम फ्रान्समध्ये आहेत.  (Tourism News)

बाथरूममधून दिसतात दोन्ही देश

या हॉटेलमध्ये कोणी गेल्यास बाथरूममध्ये जाताना दोन्ही देश पाहता येतात. तो लिव्हिंग रूमच्या खिडकीतून स्वित्झर्लंड आणि बाथरूमच्या खिडकीतून फ्रान्स पाहू शकतो. या हॉटेलची प्रत्येक खोली दोन भागात विभागलेली आहे. खोलीतील दुहेरी बेड अशा प्रकारे व्यवस्थित केले आहेत की अर्धे फ्रान्समध्ये आणि अर्धे स्वित्झर्लंडमध्ये आहेत. तसेच, खोलीतील उशा देखील दोन देशांनुसार भिन्न आहेत.

दोन देशात असं विभागलं गेलंय हे हॉटेल

हॉटेलचा इतिहास

हे हॉटेल 1862 मध्ये बांधण्यात आले होते. पूर्वी येथे एक डिपार्टमेंटल स्टोअर होते, असे म्हटले जाते की 1921 मध्ये ज्युल्स-जीन अर्बेझ नावाचा एक व्यक्ती ही जागा खरेदी करण्यासाठी आला होता आणि त्यानंतर त्याने येथे हॉटेल बांधले. कालांतराने हे हॉटेल फ्रान्स आणि स्वित्झर्लंड या दोन्ही देशांमध्ये लोकप्रिय झाले.

दोन्ही देशांचे झेंडे असे आपल्याला पहायला मिळतात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

सकाळी वडिलांकडे मिसळपाव मागितला, खाल्ल्यानंतर ३३ वर्षीय तरुणीनं नवव्या मजल्यावरून मारली उडी

SCROLL FOR NEXT