Kaswand Plateau esakal
टूरिझम

रंगीबेरंगी फुलांनी कासवंडचे पठार बहरले; 70 एकरांवर सप्तरंगी उधळण, 100 फूट खोल भुलभुलय्या गुहेचंही आकर्षण

Kaswand Plateau : रानफुलांचे वैभव पाहण्यासाठी दूरहून मोठ्या संख्येने पर्यटक (Tourists) भेट देत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

कास प्रमाणेच या ठिकाणी अनेक जातींची अनेक रंगांची फुले येथे पर्यटकांना आकर्षित करत आहेत.

भोसे : महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाचगणीजवळील निसर्गरम्य कासवंडच्या (Kaswand Plateau) पश्चिमेस असणारे सुमारे ७० एकरचं विस्तीर्ण पठार रंगीबेरंगी फुलांनी बहरले आहे. सध्या पठारावर सप्तरंगी फुलांची उधळण झाली आहे. कास पठारावर फुलांचे सौंदर्य पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची पावले आता कासवंडच्या पठाराकडे वळू लागली आहेत.

येथील रानफुलांचे वैभव पाहण्यासाठी दूरहून मोठ्या संख्येने पर्यटक (Tourists) भेट देत आहेत. याबरोबरच विविध प्रकारचे पक्षी, फळे, प्राणी व सरपटणारे जीव येथे आढळून येतात. निसर्गाचा हा अद्‌भुत ठेवा अनुभवण्यासाठी दूरहून पर्यटक येथे येत आहेत.

त्यामुळे या ठिकाणाला पर्यटनस्थळ म्हणून दर्जा द्यावा, यासाठी तत्कालीन सरपंच, पर्यावरणप्रेमी रवींद्र गोळे, विनायक पवार, सखाराम चोरमले, सर्जेराव पवार सातत्याने मागणी करत आहेत. सद्य:स्थितीला पाचगणी परिसरातील डोंगररांगा, पठारे विविध रानफुलांनी बहरू लागली आहेत. येथे रस्त्यासह अन्य विकासकामे करण्यात यावीत, अशी मागणी येथील ग्रामस्थांमधून होत आहे.

Kaswand Plateau

शंभर फूट गुहा...

कासवंड पठाराच्या पूर्व दिशेस जमिनीत शंभर फूट खोल भुलभुलय्या करणारी नैसर्गिक गुहा आहे. त्यासाठी तीन तासांची सफर आहे. या पांडवकालीन गुहेची सफर करण्यासाठी स्थानिक नागरिकदेखील पर्यटकांना मदत करतात; परंतु या गुहांमध्ये जाण्यासाठी योग्य रस्ता नसल्याने पर्यटकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.

कास प्रमाणेच या ठिकाणी अनेक जातींची अनेक रंगांची फुले येथे पर्यटकांना आकर्षित करत आहेत. ही निसर्ग संपदा या आणि मनसोक्त अनुभव, अशा मागणीबरोबरच प्रशासन व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन विविध निधीच्या माध्यमातून हा ठेवा जपण्याबरोबरच पर्यटकांना अनुभवता यावा, यासाठी उपाययोजना कराव्यात.

-रवींद्र गोळे, माजी सरपंच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs Pakistan Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान आशिया कप लढत! रेकॉर्ड्स, स्टॅट्स आणि संभाव्य विजेता कोण?

मोठी बातमी! विभक्त रेशनकार्डधारक सूना ‘लाडकी बहीण’साठी पात्र; पडताळणीचा अहवाल शासनाला सादर, पण ४ लाखांवर लाभार्थी पत्त्यावर सापडल्याच नाहीत

आजचे राशिभविष्य - 14 सप्टेंबर 2025

साप्ताहिक राशिभविष्य : (१४ सप्टेंबर २०२५ ते १९ सप्टेंबर २०२५)

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 सप्टेंबर 2025

SCROLL FOR NEXT